पालिका आयुक्तांची मंजुरी; आठवी ते बारावीच्या वर्गाना परवानगी
मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांमधील किलबिल पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मुंबईतील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे.
राज्य सरकारने येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली. मात्र पालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय पालिका आयुक्तांनी घ्यावा असेही राज्य सरकारने म्हटले होते. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने सोमवारी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता. त्याला पालिका आयुक्तांनी बुधवारी मंजुरी दिली. त्यानंतर शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी याबाबतचे परिपत्रक काढले.
मुंबईत, राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर टाळेबंदी लागू झाली आणि सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने मार्च २०२० मध्ये घेतला.
सुरक्षिततेचे नियम पाळून शाळा
राज्य सरकारच्या निर्णयातील सुरक्षेचे सर्व नियम पाळून शाळा सुरू कराव्यात असे शिक्षण विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे. पालिकेच्या, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व बोर्डाच्या शाळांना हे परिपत्रक लागू आहे. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास आवश्यकतेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवावे. शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपयायोजनांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
संख्या
पालिका माध्यमिक शाळा
(आठवी ते दहावी) २४३
विद्यार्थी ४४,५२८
पालिका प्राथमिक शाळा ५३८
(आठवीचा वर्ग असणाऱ्या)
आठवीचे विद्यार्थी २२,८३३
पालिकेच्या एकूण शाळा ७८१
एकूण विद्यार्थी ६७३६१
खासगी शाळा, शासनाच्या शाळा, इतर बोर्डाच्या आठवी ते बारावीच्या शाळा १७७२
विद्यार्थी ४,४६, १४१
मुंबईतील आठवीत २५५३
बारावीचे वर्ग असणाऱ्या सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या एकूण शाळा
एकूण विद्यार्थी ५,१३,५०२
The post मुंबईतील शाळाही ४ ऑक्टोबरपासून appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3ms5Nij

Comments
Post a Comment