अनिल देशमुखांच्या स्वीय सचिवाचा न्यायालयात आरोप
मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) कारवाई करताना प्रकरणातील संशयित मंत्री आणि नोकरशहांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे यांनी जामिनासाठी मागणी करताना केला आहे.
पालांडे यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जानुसार, त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला त्याच दिवशी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याउलट देशमुख यांना मात्र नोटिशीला उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला. पालांडे यांना ही नोटीस देण्यात आली. मात्र त्यानंतर लगेचच त्यांना अटक करण्यात आली. सीबीआय वा ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्य़ात पालांडे यांच्या नावाचा आरोपी म्हणून समावेश नसतानाही त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि समाज सेवा शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन पाटील यांनी दिलेला जबाब वगळता आपल्याला पैसे मिळाल्याचा एकही पुरावा नाही, असा दावाही पालांडे यांनी केला आहे. देशमुख आणि पालांडे दोघांच्याही घरी एकाच वेळी ईडीने छापा टाकला. त्यावेळी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला. आपल्याला मात्र अटक करण्यात आली. हा भेदभाव का, असा प्रश्नही पालांडे यांच्यातर्फे सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी उपस्थित करण्यात आला.
मग वसुलीचा प्रश्न येतोच कु ठे? पालांडे यांना २६ जूनला अटक करण्यात आली होती. ईडीने या प्रकरणी आरोपपत्रही दाखल केले आहे. देशमुख यांचे आरोपपत्रात आरोपी म्हणून समावेश नसला तरी त्यांनी वाझे यांच्यासह आणखी दोन पोलिसांना मुंबईतील बार व रेस्टॉरंट मालकांकडून १०० कोटी रुपयांची वसुली केल्याच्या आरोपाची चौकशी केली जात आहे. करोनाच्या पाश्र्वभूमीवर लागू टाळेबंदीत सगळे बंद होते. अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असताना वसुली कशी काय के ली जाऊ शकते, असा प्रश्न पालांडे यांच्यातर्फे उपस्थित करण्यात आला.
The post कारवाईबाबत ‘ईडी’कडून भेदभाव appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/2ZsCmVe

Comments
Post a Comment