Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

"बुद्धं सरणं गच्छामि !"

🙏 भन्ते अश्वजित मो. ९६७३२९२२९७ *"बुद्धं सरणं गच्छामि !"*        बुद्धधम्मातील सर्वात पवित्र, सर्वात महत्त्वाची आणि सर्वश्रेष्ठ असलेल्या त्रिशरण पंचशीलातील पहिले शरण म्हणजे *'बुद्धं सरणं गच्छामि!'* असे आहे. याचा अर्थ असा आहे की, मी बुद्धाला शरण जातो. म्हणजेच बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की, मी बुद्धांची शिकवण अंगिकारतो. मग बुद्धांची शिकवण काय आहे? तर बुद्धांची शिकवण म्हणजे *'सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा ।* *सचित्त परियोदपनं, एतं बुद्धान सासनं ।।'*  सब्ब म्हणजे सर्व, पाप म्हणजे अकुशल कर्म, उपसंपदा म्हणजे संपादित करणे, जमा करणे, गोळा करणे, सचित्तपरियोदपनं म्हणजेच आपल्या चित्ताला शुद्ध ठेवणे. हेच बुद्धांचे शासन आहे, हीच बुद्धांची शिकवण आहे. असा त्याचा अर्थ होतो. यातील पहिली शिकवण आहे की, मी पापकर्म करणार नाही. तर पापकर्म कोणकोणते आहेत? तर पापकर्म दहा प्रकारचे आहेत. कायेने होणारे तीन पापकर्म, वाणीने होणारे चार पापकर्म आणि मनाने होणारे तीन पापकर्म. असे एकूण दहा पापकर्म मी करणार नाही