Skip to main content

Posts

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

कालनिर्णय 2024

  आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा HAPPY NEW YEAR CLICK ABOVE TO DOWNLOAD CALENDAR 2024
Recent posts

School Evaluation: 'नॅक'च्या धर्तीवर होणार शाळांचे मू्ल्यांकन

केंद्राच्या नॅक समितीच्या धर्तीवर शाळांचीही तपासणी करण्यासाठी शाळा मानक प्राधिकरण काम करणार आहे. त्यानुसार शाळा मानक प्राधिकरण स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2N3JHuq

CUET 2022: कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात

शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. ही नोंदणीची प्रक्रिया ३० एप्रिल २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट cuet.samarth.ac.in वर जाऊन नोंदणी करू शकतील. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4dxcRkJ

एलिमेंटरी, इंटरमिजिएट नोंदणीसाठी मुदतवाढ

एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेसाठी अद्याप काही केंद्रांनी नोंदणी केलेली नाही; तसेच परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी केंद्र नोंदणी, विद्यार्थी नोंदणी, परीक्षक, समालोचक आणि उपमुख्य समालोचक नोंदणी आणि परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JqIyTRN

IIT Madras: ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनाही करता येणार BSc डेटा सायन्ससाठी अर्ज

आयआयटी मद्रासमध्ये होणाऱ्या बीएससी डेटा सायन्स अभ्यासक्रमासाठी अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी देखील प्रवेश घेऊ शकणार आहेत. जेईई अॅडव्हान्स २०२१ परीक्षेसाठी पात्र झालेले शिकाऊ उमेदवार थेट मे २०२२ अभ्यासक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DAXZCwt

MPSC Result 2022: महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवार मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र असतील. यासोबतच आयोगाने मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले जाणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया ५ ऑक्टोबर रोजी सुरू झाली आणि १ जानेवारी २०२२ रोजी संपली. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण २९० पदांची भरती केली जाणार आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mUtf1W0

मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमधील नामफलक आता मराठीत

मुंबई विद्यापीठाच्या अलीकडेच पार पडलेल्या अधिसभेत युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यापीठाने परिपत्रक जारी केले आहे. महाविद्यालयाच्या नावाचे फलक आता मराठी भाषेत झळकणार आहेत. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UBroH9y

आर्किटेक्चर प्रवेशासाठी आता PCM आवश्यक, सर्व महाविद्यालयांना लागू होणार निर्णय

बॅचलर ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये पीसीएस हा अनिवार्य विषय घेणे आवश्यक आहे. आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पीसीएम अनिवार्य करण्याचा निर्णय सर्व महाविद्यालयांना लागू असणार आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Z1KgATN

Pariksha Pe Charcha 2022: परीक्षेला उत्सवी वातावरणात सामोरे जा - पंतप्रधान

विद्यार्थ्यांचा मनातील परीक्षेची भिती, परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी-पालकांशी संवाद साधला. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनालाही पंतप्रधान मोदींनी भेट दिली. सुमारे १५ लाख विद्यार्थी आणि अडीच लाख शिक्षकांनी देशभरातून या कार्यक्रमाला हजेरी लावली. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8JsAFKi

नवीन वैद्यकीय शिक्षण प्रणाली अंतर्गत विद्यार्थ्यांना 'हे' काम करणे अनिवार्य

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आपले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना डॉक्टर हिप्पोक्रॅटिक ओथऐवजी महर्षी चरक यांच्या नावाने शपथ घ्यावी लागणार आहे. यासोबतच शिक्षण घेत असलेल्या संस्थेच्या जवळचे गाव दत्तक घ्यावे लागणार आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nE2PVHd

Pariksha Pe Charcha 2022: पंतप्रधानांकडून विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षेच्या टिप्स

'परीक्षा पे चर्चा-५' कार्यक्रमांतर्गत एक एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन कार्यक्रम दाखविण्यात यावा, याबाबत शाळांना शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथून विद्यार्थ्यांची संवाद साधणार आहेत. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/y1TL4CU

School Summer Vacation: राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी २ मेपासून

दरवर्षी एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना सुटी लागते. मात्र, शिक्षकांना एक मेपर्यंत शाळेत हजेरी लावणे सक्तीचे असते. यातच यंदा एप्रिल महिन्यात शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी वर्ग भरवण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावरून राज्यभरातून नाराजीचा सूर उमटत आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी २०२२ची उन्हाळी सुटी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालनालयाकडून शालेय शिक्षण विभागाकडे करण्यात आले आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/yREckWL

Cyber Security: यूजी आणि पीजीमध्ये शिकविणार सायबर सुरक्षेचा अभ्यासक्रम

यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांमध्ये आगामी सत्र २०२२-२३ पासून सायबर सुरक्षेचा अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे. देशात दिवसागणिक वाढणारे सायबर हल्ले, हॅकींग, सायबर सुरक्षेसंदर्भातील प्रश्न पाहता या अभ्यासक्रमाची नितांत गरज आहे. सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ तयार करण्याची गरज ओळखून यामध्ये सायबर सुरक्षेच्या कायदेशीर, सामाजिक, आर्थिक पैलूंचीही जाणीव करून दिली जाणार आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2h8G5bV

Pariksha Pe Charcha: 'परीक्षा पे चर्चा'साठी शाळांमध्ये व्यवस्था करा; शिक्षण विभागाच्या सूचना

पंतप्रधान मोदी नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथून विद्यार्थ्यांची संवाद साधणार आहेत. सहावी ते बारावी वर्गातील विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहे. हा कार्यक्रम सर्व शाळेत आयोजित करून विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावा, असे निर्देश जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी आणि महानगर पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3YWbZTj

RRB NTPC परीक्षेचा निकाल, कटऑफ आणि स्कोअर कार्ड जाहीर

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डातर्फे आरआरबी एनटीपीसी सीबीटी १ परीक्षेचा अंतिम निकाल, कटऑफ आणि स्कोअरकार्ड जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ODB8Vyi

RTE प्रवेशासाठी चुरस; एक लाख जागांसाठी तीन लाख अर्ज!

आरटीई प्रवेशांसाठीची या शैक्षणिक वर्षाची सोडत बुधवारी जाहीर करण्यात आली. प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी ही सोडत जाहीर केली. यामध्ये या वर्षी एक लाख एक हजार ९७७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. सोडतीत आपला क्रमांक लागला आहे की नाही, याचीही माहिती येत्या सोमवारपासून दिली जाणार आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ehD1OIS

Scholarship to Study Abroad:'या' शिष्यवृत्तींमधून मिळेल परदेशात विनामूल्य शिक्षण

परदेशात जाऊन शिक्षण घ्यावे अशी असंख्य विद्यार्थ्यांची इच्छा असते पण आर्थिक परिस्थितीमुळे हे शक्य होत नाही. पण अशा अनेक स्कॉलरशिप आहेत, ज्यामुळे तुम्ही परदेशात जाऊन सहजपणे आपले शिक्षण पूर्ण करु शकता. परदेशामध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करु इच्छिणाऱ्यांसाठी काही स्कॉलरशिपबद्दल माहिती देण्यात आली आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Hk8QmXt

दहावीचा विज्ञान-तंत्रज्ञान - २ विषयाचा पेपर फुटला? अवघ्या ५०० रुपयांना मिळाली प्रश्नपत्रिका

राज्यात इयत्ता दहावीची परीक्षा सुरू आहे. बुधवारी ३० मार्च रोजी विज्ञान-तंत्रज्ञान २ या विषयाची परीक्षा होत आहे. याच्या एक दिवस आधी मंगळवारी उशिरा कोल्हापूरातील जयसिंगपूर येथून प्रश्नपत्रिकांच्या कस्टडीची जबाबदारी असणाऱ्या एका शाळेतून पेपर फुटल्याचे सांगण्यात येत आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/avonGy7

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात प्रवेश देण्याची पंतप्रधानांकडे मागणी

२४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धात तेथे अडकलेल्या सुमारे २० हजार भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यात आले आहे. प्रदीर्घ काळ सुरु असलेले युद्ध आणि उध्वस्त युक्रेनियन शहरे पाहून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या करिअरची चिंता वाटू लागली आहे. यासंदर्भात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bpTghq8

सीयूईटी वर्षातून दोनवेळा? UGC चे अध्यक्ष म्हणाले...

केंद्रीय विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना सीयूईटी परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आयोजित करते. संस्थेने ही परीक्षा वर्षातून दोनवेळा घेण्यासंदर्भात विचार सुरू केला आहे, अशी माहिती यूजीसीचे अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qkDHpNu

विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा; परीक्षा संपताच शाळांना सुट्टी

शाळांच्या उन्हाळी सुट्टीचा गोंधळ अखेर मिटला आहे. शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घ्याव्यात आणि तोपर्यंत शाळा सुरू ठेवाव्यात असे फर्मान शिक्षण विभागाने काढले होते. पण त्यावर शिक्षण आयुक्तांनी नव्या सूचना दिल्या आहेत. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/q12a8kI

पुण्यात नोकरीची मोठी संधी, येत्या दोन महिन्यांत पालिकेत 'या' पदांवर भरती,

पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण, पुढच्या दोन महिन्यांमध्ये पालिकेत भरती सुरू होणार आहे, यासंबंधी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी माहिती दिली आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2oH3zt5

जामियातले यूजी प्रवेश CUET च्या आधारे

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील काही अभ्यासक्रमांचे प्रवेश सीयूईटीद्वारे करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी अभ्यासक्रम आणि अन्य तपशीलासंदर्भातील अपडेट जाणून घेण्यासाठी विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट www.jmi.ac.in आणि http://jmicoe.in नियमित पाहावी. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/OhwDlU4

ICAI CMA फाउंडेशन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

ICAI CMA फाउंडेशन परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट - icmai.in वर परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक पाहू शकतात. CMA फाउंडेशन परीक्षा 2022 चे वेळापत्रक तपासण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी थेट लिंक देखील उपलब्ध आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/IahzqjO

ISC ICSE बोर्ड परीक्षा 2022: परीक्षेपूर्वी बोर्डाने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे; 'या' गोष्टी लक्षात ठेवा

ISC ICSE बोर्ड परीक्षा 2022: ISC ICSE काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने परीक्षेपूर्वी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DrwvWIO

UPSC ESE Final Result 2021: यूपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर

UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२१ द्वारे एकूण २२५ रिक्त जागा भरल्या जाणार होत्या. निवडलेल्या उमेदवारांचे रोल नंबर आयोगाने जारी केलेल्या निकाल PDF मध्ये दिले आहेत. कार्तिकेय कौशिक हा उमेदवार अव्वल आला आहे. राधेश्याम तिवारी दुसऱ्या आणि देवेश कुमार देवंगन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये झालेल्या लेखी परीक्षा आणि मुलाखती झाल्या होत्या. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hEqnROt

इंजिनीअरिंगचे शिक्षण मातृभाषेतून घेण्याला प्रतिसाद

पुढील २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी इच्छुक अभियांत्रिकी कॉलेजांसाठीचे प्रस्ताव आज, २९ मार्चपासून एआयसीटीईच्या (AICTE) पोर्टलवर स्वीकारण्यात येणार आहेत. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Ijd7hq9

एका नामांकित कंपनीच्या भरती प्रक्रियेत राज्य मंडळाच्या शिक्षणाला नकार!

मुंबई, ठाण्यात सीबीएसई, आयसीएसई शाळांची संख्या वाढत असताना राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना धोका निर्माण झाला आहे. यातच भारतातील एका नामांकित कंपनीने त्यांच्याच एका उपकंपनीच्या ठाण्यातील पोखरण रस्ता क्र. २ येथील शाखेत भरती प्रक्रिया सुरू केली. ही भरती करताना किमान शैक्षणिक पात्रतेत पदवीधर ही अट दिली आहे. याचबरोबर कंसात बारावीपर्यंतचे शिक्षण आयसीएसई किंवा सीबीएसई मंडळातील शाळांमधून होणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ba7IhkT

करोना काळात पालक गमावलेल्या पुणे विद्यापीठाच्या ५०७ विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

पुणे विद्यापीठाची अर्थसंकल्पीय सिनेट येत्या ३० मार्चला होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिनेट सदस्य संतोष ढोरे यांनी करोनामुळे पालक गमावलेल्या किती विद्यार्थ्यांना आर्थिक सवलत मिळाली, सवलत दिलेल्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयनिहाय यादी, सरकारकडून मिळालेला निधी, विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या योजना याबाबत प्रश्न विचारले आहेत. करोनामुळे पालक गमावलेल्या ५०७ विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्कमाफी देण्यात आली. एक हजार १३८ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dsay9Ug

CUET 2022: केंद्रीय विद्यापीठांमधील UG अभ्यासक्रमांच्या सीईटीचे अर्ज २ एप्रिल पासून

केंद्रीय विद्यापीठांतील पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेच्या (सीयूईटी) अर्ज प्रक्रियेला दोन एप्रिलपासून सुरुवात होणार आहे, असे राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनटीए) जाहीर केले. देशभरातील कोणत्याही केंद्रीय विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईयूटी एकल खिडकी सुविधा देणार आहे. सीयूईटी-२०२२ कॉम्प्युटर आधारित चाचणी (सीबीटी) स्वरूपात घेतली जाईल. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dVGWI3t

Airforce Jobs: पदविकाधारकांना वायुसेनेत संधी

'एमएसबीटीई'मार्फत राज्यभरात इंजिनीअरिंग, फार्मसी व हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या विषयांचे पदविका अभ्यासक्रम राबविले जातात. या पदविकाधारक विद्यार्थ्यांना आता भारतीय वायुसेनेतही रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JFuod8X

मराठवाडा विद्यापीठ सत्र परीक्षा होणार ऑफलाइन

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन झाल्या परंतु पदवी, पदव्युत्तर परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. आता परिस्थिती पूर्ववत सुरू झाल्याने ऑफलाइन तासिकांसह परीक्षाही ऑफलाइन घेण्यात येणार आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून नवीन नियमावली तयार करण्यात येत आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ekjXof3

Sainik School: राज्यात 'या' जिल्ह्यात तिसरी सैनिकी शाळा सुरू होणार

सातारा सैनिकी शाळा ही पहिल्या काही शाळांपैकी एक होती. परंतु पाच वर्षांपूर्वी काही राज्यांत दोन शाळा सुरू करण्याचे नियोजन झाले. त्यातच महाराष्ट्रातील चंद्रपूर सैनिकी शाळेचा समावेश होता. यानुसार सातारा, चंद्रपूरपाठोपाठ आता राज्याला अहमदनगर येथे आणखी एक अशी सैनिकी शाळा मिळणार आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lVwSYZk

ssc result : दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल रखडण्याची शक्यता, विद्यार्थ्यांची चिंता वाढली

दहावी आणि बारावीचे परीक्षांचे निकाल उशिराने लागण्याची चिन्हे आहेत किंवा रखडण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना पडून असल्याचं समोर आलं आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5EuRtJA

MHT CET 2022: कोणत्या अभ्यासक्रमाची सीईटी कधी? जाणून घ्या

सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) तंत्रशिक्षण विभागातील आठ विषय, उच्च शिक्षण विभागाचे आठ आणि कला शिक्षण विभागाचा एक विषय अशा १७ विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सीईटीकडून जाहीर करण्यात आलेल्या अंदाजित वेळापत्रकानुसार सीईटीच्या परीक्षा ३ जूनपासून सुरू होत आहेत. उच्च शिक्षण विभागाच्या परीक्षा ३ ते १० जूनदरम्यान होणार आहेत. तर, तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ११ ते २८ जूनदरम्यान घेण्यात येणार आहेत. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/skUn4dy

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर संस्थेत भरती, ६० हजारपर्यंत मिळेल पगार

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर संस्थेत टेक्निशियन मॅकेनिकल, टेक्निशियन इलेक्ट्रिकल, टेक्निशियन इन्स्ट्रुमेंटेशन या पदाच्या १११ रिक्त जागा भरण्यात येत आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ४ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदभरतीचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/J1R9DiH

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण; MUHS चा निर्णय

युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले हजारो विद्यार्थी अर्धवट शिक्षण सोडून भारतात परतले आहेत. महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना मदत करण्याची सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आरोग्य विद्यापीठाला केली होती. त्यानुसार या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास साहित्य तयार करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत सांगण्यात आले. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eKJ52un

NIOS दहावी, बारावी थ्योअरी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, 'येथे' करा डाऊनलोड

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगतर्फे दहावी आणि बारावी परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन परीक्षेचे प्रवेशपत्र पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगच्या दहावी, बारावीच्या थ्योअरी परीक्षा ४ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहेत. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WG3wO1C

पालिका शाळेत सीबीएसई, आयसीएसई प्रवेशसंख्येत वाढ

मुंबई महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल, सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळांना पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पालिकेच्या शिक्षण विभागावरील पालकांचा वाढता विश्वास पाहून मुंबई पब्लिक स्कूल, सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३साठी नर्सरी व ज्युनिअर केजीची एक तुकडी वाढवण्याची मागणी महापालिका शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी शिक्षण विभागाकडे केली होती. या मागणीला पालिकेच्या शिक्षण विभागाच्या सहआयुक्तांकडून हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/edXL4FE

एसएससी जीडी कॉन्स्टेबल निकाल जाहीर, 'येथे' तपासा

स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे जीडी कॉन्स्टेबल परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२१ दरम्यान घेण्यात आली होती. याआधी जानेवारी महिन्यात निकाल लागणे अपेक्षित होते, मात्र तो लांबल्याने आता निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/v60RWz5

चीनमधील शिक्षण भारतात ग्राह्य नाही; UGC, AICTE ने दिला इशारा

चीनमध्ये विद्यार्थ्यांना अद्याप प्रवासास मुभा देण्यात आली नाही. यामुळे येथील विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देशात प्रॅक्टिस करण्यासाठी मुभा देता येणार नाही, असे राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. यातच आता अन्य शाखांमध्ये पदवी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने इशारा दिला आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/soZVj6W

दिव्यांग उमेदवारांनाही IPS, RPF आणि DANIPS साठी अर्ज करता येणार

दिव्यांग उमेदवारांनाही आता आयपीएस, आरपीएफ आणि डिएएनआयपीएससाठी अर्ज करता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश काढून यासंदर्भात निर्णय दिला आहे. नॅशनल प्लॅटफॉर्म फॉर द राइट्स या स्वयंसेवी संस्थेने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/POhfJv6

पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात; निर्णयाने गोंधळ

२४ मार्चला शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकावरून शिक्षण क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या इयत्ता नववीच्या परीक्षा सध्या सुरू असल्याने एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा घेण्याची सूचना रद्द करावी, अशी प्रतिक्रिया शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sdDJHB9

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांना नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

बॅंक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर पदाच्या १५९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १४ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. पदवी उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ZbWcrvB

'परीक्षा पे चर्चा' १ एप्रिल रोजी होणार, पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

आगामी बोर्ड आणि प्रवेश परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमासाठी नोंदणी www.mygov.in वेबसाइट वर सुरू आहे. दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतात. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UtDypkJ

UGC CSIR NET जून उत्तरतालिका जाहीर, 'येथे' करा डाऊनलोड

यूजीसी सीएसआयआर नेट उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उत्तरतालिका पाहू आणि डाऊनलोड करु शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dyxGmAX

MPSC: 'सी-सॅट' गुण केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याबाबतचा अहवाल प्रलंबितच

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांमध्ये 'सी-सॅट' विषय केवळ पात्रतेसाठीच ग्राह्य धरला जातो. मात्र, 'एमपीएससी'ने 'सी-सॅट' विषय अनिवार्य केला असून, त्याचे गुण अंतिम निकालासाठी ग्राह्य धरण्यात येतात. याला राज्यभरातील उमेदवारांकडून विरोध करण्यात येत आहे. विविध संघटनांनीही 'यूपीएससी'च्या धर्तीवर 'सी-सॅट' विषयाचे गुण केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी केली आहे. मात्र, 'एमपीएससी'ने त्या संदर्भात निर्णय घेतला नाही. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/1lspIT2

Employment: गेल्या सात वर्षात रोजगार २२ टक्क्यांनी वाढला, 'या' क्षेत्रात वाढल्या संधी

मागील सात वर्षांमध्ये देशभरातील रोजगारामध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली. संसदेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेचा दाखला दिला. आयटी, हेल्थ आणि शिक्षण क्षेत्रात रोजगार वाढल्याचे ते यावेळी म्हणाले. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/EjWUyef

gadchiroli police bharti 2022 : पोलीस दलातील ४१६ रिक्त पदे तातडीने भरणार, गृह विभागाचे आदेश जारी

गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांची रिक्त असलेली ४१६ पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. याबाबत राज्याच्या गृह विभागाने आदेशही जारी केले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4ex0WDX

MPSC राज्य सेवा पूर्वपरीक्षेची उत्तरतालिका जाहीर, 'येथे' करा डाउनलोड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच एमपीएससीतर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उत्तरतालिका पाहता येणार आहे. ही परीक्षा २३ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आली. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9FXMfNy