Skip to main content

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

सागरीहद्द नियमन आता ५० मीटरपर्यंतच!

मुंबईसह राज्यातील हजारो इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

मुंबई : मुंबई आणि उपनगरासाठी असलेल्या सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिल्यामुळे आता मुंबईसह राज्यात सागरी हद्द नियमन भरतीरेषेपासून फक्त ५० मीटरवरच लागू होणार आहे. त्यामुळे असंख्य जुन्या इमारती, कोकण किनारपट्टीवरील जुनी घरे, काही प्रकल्पांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. गेले दोन वर्षांपासून याबाबतचा निर्णय रखडला होता.

मुंबई आणि उपनगरासह संपूर्ण राज्यासाठी २०११ मधील सागरी हद्द नियमन कायदा लागू होता. त्यामुळे भरतीरेषेपासून ५०० मीटरपर्यंत कुठल्याही बांधकामास परवानगी नव्हती.

मुंबईसारख्या शहरात जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात या नियमनाचा अडथळा येत होता. या नियमानुसार पुनर्विकासासाठी १.३३ इतकेच चटईक्षेत्रफळ शहरात तर उपनगरात फक्त एक इतके चटईक्षेत्रफळ उपलब्ध होत होते. त्यामुळे इमारतींचा पुनर्विकासच होऊ शकत नव्हता. याचा सर्वाधिक फटका खासगी इमारतींसह म्हाडाच्या वसाहतींना बसला होता. ही मर्यादा ५० मीटरपर्यंत मर्यादित करावी अशी जुनी मागणी होती. ती मान्य होऊन अमलात येणार असल्यामुळे आता शहरात तीन तर उपनगरात २.७ इतके चटईक्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे.

राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर या सरकारने केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या मागे याबाबत तगादा लावला होता. यासंदर्भात पत्रव्यवहारही करण्यात आला होता. अखेरीस २०१९ मध्ये नवी अधिसूचना लागू झाली. या अधिसूचनेनुसार सीआरझेड एकचे अ आणि ब असे दोन भाग करण्यात आले. सीआरझेड एक अ मध्ये ज्या ठिकाणी हजार चौरस मीटरपेक्षा अधिक तिवरांचे जंगल आहे अशा ठिकाणी ५० मीटरपर्यंत न विकसित विभाग करण्यात आला. याशिवाय भरतीरेषेपासून ५० मीटरपर्यंतही बंधने घालण्यात आली. मात्र त्यासाठी राज्यांनी सागरी हद्द व्यवस्थापन आराखडा सादर करणे बंधनकारक होते.

राज्य शासनाकडून तेव्हा तो दाखल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली असली तरी त्याचा लाभ मुंबईसह राज्याला मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विकासक तसेच खासगी संस्थांनीही पाठपुरावा केला होता. अखेर सागरी हद्द व्यवस्थापन आराखडा सादर करण्यात आला आणि या आराखड्याला राष्ट्रीय सागरी हद्द नियमन समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता २०१९ची अधिसूचना मुंबईसह राज्याला लागू झाली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार मानले आहेत. यादव अलीकडे नवी मुंबईच्या दौऱ्यावर असताना विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. येत्या १५ दिवसांत या प्रक्रियेला गती देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानंतर या मंजुरीची प्रत गुरुवारी जारी करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हा आराखडा आमचे सरकार असताना तयार करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करीत तो केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता. यामुळे पर्यटन क्षेत्र, त्या क्षेत्रातील रोजगार आणि एकूणच पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात सिडकोच्या प्रकल्पांसह इतरही विकासालाही यामुळे चालना मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फ्लेमिंगो निर्बंधाबाबत १५ दिवसांत निर्णय?

या निर्णयामुळे समुद्रकिनारी असलेला मोठा भूखंड विकासासाठी उपलब्ध होणार आहे. त्यातून हजारो घरे निर्माण होतील, असा दावा नरेडकोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले. फ्लेमिंगो अभयारण्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबतही येत्या १५ दिवसांत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण जारी करण्यात येणार असून त्यामुळे मुंबईतील रखडलेला विकास मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे मुंबईचा समुद्रकिनारा उत्तुंग टॉवर्सनी फुलून निघणार आहे. सागरी हद्द नियमनामुळे मुंबईचा विकास खुंटला होता. आता विकासकांना मोकळा श्वास घेता येणार आहे, अशी प्रतिक्रिया नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी दिली आहे.

The post सागरीहद्द नियमन आता ५० मीटरपर्यंतच! appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3iFVohV

Comments

Popular posts from this blog

BPNL Recruitment 2022: पशुसंवर्धन विभागात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

BPNL : भारताच्या पशुपालन निगम लिमिटेडमध्ये (Animal Husbandry Corporation of India Limited, BPNL) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. पशुपालन निगम लिमिटेडमध्ये ट्रेनिंग कंट्रोल ऑफिसर (Training Control Officer), ट्रेनिंग कंट्रोल इंचार्ज (Training Control Incharge),ट्रेनिंग कोऑर्डिनेटर (Training Coordinator), ट्रेनिंग असिस्टंटची (Training Assistant) अनेक पदे भरली जाणार आहेत. बीपीएनएल भरती २०२२ () साठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. बीपीएनएल भरती २०२२ अंतर्गत एकूण ७८७५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पशुपालन निगम लिमिटेड ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या भरतीच्या जाहिरातीनुसार, २१ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. रिक्त जागांचा तपशील ट्रेनिंग कंट्रोल ऑफिसरच्या ७५ रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठ...

UPSC ESE पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या तपशील

ESE pre-exam 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा परीक्षा (ESE) २०२२ ची तारीख जाहीर केली आहे. आयोगातर्फे अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेची तयारी करणारे उमेदवार वेबसाइटवर वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ईएसई पूर्व परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येतील. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत ही परीक्षा होईल. परीक्षा सुरु होण्यापुर्वी १५ दिवसांच्या आत उमेदवारांना यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा प्रवेशपत्र २०२२ डाउनलोड करता येईल. सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला दिला जातो. मुख्य परीक्षेची तारीख पूर्व परीक्षेनंतर जाहीर केली जाईल. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र असतील. इंजिनीअरिंग सेवा (प्राथमिक/फेज-I) परीक्षेत दोन वस्तुनिष्ठ प्रकारच्या (multiple choice) प्रश्नपत्रिका असतील. ही परीक्षा जास्तीत जास्त ५०० गुणांची असेल. (पेपर १ - २०० गुण आणि पेपर २- ३०० गुण). यूपीएससीतर्फे प्र...

पांढरे विष- साखर - एकदा हा लेख आवर्जून वाचा

साखर ही उसाच्या रसावर रासायनिक प्रक्रिया करून बनविली जाते. प्रोटीन्स व खजिन द्रव्यांचा अभाव साखर ही उसाच्या रसावर रासायनिक प्रक्रिया करून बनविली जाते. प्रोटीन्स व खजिन द्रव्यांचा अभाव असूनही चवीने मधुर व दिसायला पांढरीशुभ्र असणारी साखर लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडते. आधुनिक काळात , तर प्रत्येक तयार पदार्थात साखरेचाच समावेश केलेला असतो. जाम , बिस्किट्स , चॉकलेटस् , केक , मिठाई अशा अनेक पदार्थात साखरेचा सढळपणे वापर केला जातो. साखर बनविण्याची प्रक्रिया   उसाचा रस हा पचनास अतिशय हलका असतो. या रसाला अटविले जाते व त्यात चुना घालून उकळल्याने त्यातील मळ काढून टाकता जातो. नंतर सतत आटवीत राहिल्यामुळे व अनेक रसायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे हाच उसाचा घट्ट रस पचण्यास कठीण होतो. सल्फर डायऑक्साईड वायू , फॉर्मालीन , रिफायिनग व ब्लिचिंग या सर्व रासायनिक प्रक्रियांतून घट्ट रस आटविला जाऊन , पांढरीशुभ्र दाणेदार साखर बनवली जाते. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर साखर एक शुद्ध रासायनिक पदार्थ बनतो व अशी ही साखर वर्षांनुवर्षे टिकते. ती कधीही खराब होत नाही. कारण , रासायनिक...

गिलोय एक संजीवनी - गिलोय से होने वाले शारीरिक फायदे

Harbayu wellness care Dr.Ravindra Nandedkar गिलोय चूर्ण गिलोय/गुळवेल ज्यूस      राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त डॉ.रविंद्र नांदेडकर द्वारा संशोधित की गयी Diaba-T मैं इस्तेमाल की गई गिलोय/गूलेठी/गुलवेल के नाम भी जाना जाता है। आइये हम गिलोय से होने वाले शारीरिक फायदे की ओर देखें :-      गिलोय एक प्रकार की लता/बेल है, जिसके पत्ते पान के पत्ते की तरह होते है। यह इतनी अधिक गुणकारी होती है, कि इसका नाम अमृता रखा गया है। आयुर्वेद में गिलोय को बुखार की एक महान औषधि के रूप में माना गया है। गिलोय का रस पीने से शरीर में पाए जाने वाली विभिन्न प्रकार की बीमारियाँ दूर होने लगती हैं। गिलोय की पत्तियों में कैल्शियम, प्रोटीन तथा फास्फोरस पाए जाते है। यह वात, कफ और पित्त नाशक होती है। यह हमारे शरीर की रोगप्रतिरोधक शक्ति को बढाने में सहायता करती है। इसमें विभिन्न प्रकार के महत्वपूर्ण एंटीबायोटिक तथा एंटीवायरल तत्व पाए जाते है जिनसे शारीरिक स्वास्थ्य को लाभ पहुँचता है। गिलोय में प्राकृतिक रूप से शरीर के दोषों को संतुलित करने की क्षमता पाई जाती है।      गिलोय एक बहुत...

मधुमेह पुर्ण बरा होतो का?

मधुमेह पुर्ण बरा होतो का? हो मधुमेह हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे आज भारतातील प्रत्येकी तीन व्यक्तीमागे एकास मधुमेह आहे किंवा पुढच्या आयुष्यात कधी तरी होणार आहे. आज हीच गोष्ट कितीतरी मधुमेह तज्ञ व औषधं बनविणाऱ्या उद्योगांसाठी हवी हवीशी वाटत असली तरीही रुग्णांसाठी फारच धोकादायक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ९०%(नव्वद टक्के)रुग्ण याबद्दल जागरूक नाहीत. काहींना तर हा विषयच नकोसा वाटतो. परिणामी पुढे जाऊन आपल्या पदरात काय वाढून ठेवले आहे, ह्याची जरासुद्धा खबरबात ते घेत नाहीत. काही रुग्ण तर फक्त "माझी तज्ञ डॉक्टरांकडे ट्रिटमेंट सुरू आहे आता माझी शुगर नॉर्मल आहे मी फक्त  त्यांचाच सल्ला घेतो आहे" असे म्हणून सर्व जबाबदारी त्यांच्या डॉक्टरांवरच टाकत असतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही कि गोळी सुरू आहे म्हणून कंट्रोल आहे नॉर्मल नाही आणि जरी गोळी सुरू असली तरी त्यांच्या शरीरात झालेला बिघाड हा वाढतच असतो, पण मधुमेह असलेल्या व्यक्तीला याची काहीही कल्पना नसते. मधुमेह हा खालील आजारांना आमंत्रण देतो १)उच्च र...

Regal Assets

Our Company Regal Assets was founded by young entrepreneur and investor Tyler Gallagher. The company started its operations with a small investment and a big vision: to simplify, innovate and rejuvenate the alternative assets investment landscape which was still operating under heavy bureaucracy and unnecessary hurdles. 10 years later, with zero additional startup capital and a lot of persistence, Regal Assets is the highest rated alternative assets firm in the country, with recognition from the likes of  Forbes, Smart Money, the Huffington Post  and many others. The company was also ranked #20 in the U.S. by the famous  INC 500  in the financial services category, and subsequently featured on the prestigious Reuters Sign on Times Square to congratulate them on their victory. Mission Regal Assets aims to be every investor’s one stop shop when it comes to metals and cryptos investing. The company however specializes in helping individual investors add me...