Skip to main content

Posts

Showing posts from February, 2022

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

दहावीच्या ऑफलाइन परीक्षेच्या भीतीने अपहरणाचा बनाव

म. टा. वृत्तसेवा, बदलापूर : गेले दोन वर्षे करोना संकट आणि लॉकडाउनमुळे सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची शिक्षणासोबतची नाळ तुटत चालली आहे. त्यामुळे ऑफलाइन वर्गात जाण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता निर्माण झाली आहे. त्यात दहावीच्या परीक्षा (Maharashtra ) ऑफलाइन होणार असल्याने मुले भयग्रस्त आहेत. ऑफलाइन परीक्षेच्या भीतीने बदलापूरातील एका दहावीच्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने अपहरणाचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात घरातून पळालेल्या आणि पुन्हा सुखरूप घरी परतलेल्या मुलीनेच अपहरणाचा बनाव उघड केला आहे. अल्पवयीन मुले आणि मुली घरातून निघून जात असल्याच्या घटनांत वाढ झाली आहे. बदलापूर पश्चिमेतील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच पोलिस सजग झाले. चार अपहरणकर्त्यांनी बदलापूर येथून तिला बेशुद्ध करून अपहरण केले, मात्र अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपण सुटका केल्याचे सांगत परळ येथून या विद्यार्थिनीने आपल्या वडिलांशी संपर्क साधला होता. मुलीच्या वडिलांनी या गंभीर प्रकरणाबाबत दादर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. मात्र

परदेशात जाणारे 'इतके' विद्यार्थी भारतातील वैद्यकीय प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण

: 'परदेशात जाणारे ९० टक्के वैद्यकीय विद्यार्थी नीट परीक्षा पास करु शकलेले नाहीत. मात्र आता यावर वाद घालण्याची योग्य वेळ नसल्याचे' संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. भारतातून दरवर्षी हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जातात.काही देशांमध्ये एमबीबीएसची पदवी भारतापेक्षा कमी खर्चात मिळू शकते हे यामागचे मुख्य कारण आहे.तसेच परदेशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे हे भारतातील प्रवेश प्रक्रियेपेक्षा सोपे आहे. भारतात मर्यादित जागांसाठी खूप स्पर्धा पाहायला मिळत असल्याचेही ते म्हणाले. हे तीन देश परदेशात जाणाऱ्या ६०% भारतीयांपर्यंत पोहोचतात वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेर पडणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थी चीन, रशिया आणि युक्रेनमध्ये पोहोचतात. त्यापैकी २० टक्के विद्यार्थी एकट्या चीनमध्ये जातात. या देशांमध्ये संपूर्ण एमबीबीएस अभ्यासक्रमाची फी साधारण ३५ लाख रुपये आहे. ज्यामध्ये सहा वर्षांचे शिक्षण, तेथे राहणे, प्रशिक्षण देणे आणि भारतात परतल्यावर स्क्रीनिंग चाचणी पास करणे यांचा समावेश आहे. त्या तुलनेत, भारतातील खासगी महाविद्यालयांमध्ये एमब

NEET 2022 Exam Date: नीट यूजी परीक्षा कधी होणार? जाणून घ्या अपडेट

Date: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा, नीट २०२२ (National Eligibility cum Entrance Test, NEET 2022 Examination) परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. ताज्या अपडेटनुसार, वैद्यकीय सल्लागार परिषदेने (Medical Advisory Council) एका बैठकीत जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात परीक्षा घेण्याचे सुचवले आहे. या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (NTA) nta.ac.in आणि neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर १० मार्चपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या परिषदेच्या बैठकीत, MAC ने एनटीएला त्यांच्या 'सोयीनुसार' वेळापत्रकावर काम करण्यास सांगितले आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या संभाव्य तारखांवर चर्चा करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाचे अधिकारी देखील बैठकीत उपस्थित होते. याच बैठकीत उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'उपस्थित सदस्यांकडून यावर्षी वैद्यकीय प्रवेश परीक्षा आयोजित करण्याच्या संभाव्य कालावधीबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी एनटीएला जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यापासून तारीख न

खुशखबर! बारावीच्या विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत संधी; परीक्षेच्या आदल्या दिवशीही अर्ज शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे येत्या चार मार्चपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी (Maharashtra Hsc Exam 2022) विद्यार्थ्यांना तीन मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. बारावीसाठी अजूनही अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना ३ मार्च सकाळी ११ पर्यंत अर्ज करून शुल्क भरण्याची मुभा देण्यात आली आहे. ३ मार्चला सकाळी ११ नंतर वेबसाइट बंद केली जाईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज करण्यासाठी कोणत्याही पद्धतीच्या अडचणी येऊ नयेत म्हणून राज्याच्या शिक्षण विभागाने यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवसांपर्यंत परीक्षेचा ऑनलाइन अर्ज करण्याची मुभा दिली आहे. बारावीची परीक्षा चार मार्चपासून होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना तीन मार्च सकाळी ११ पर्यंत अर्ज आणि शुल्क भरून परीक्षेला बसता येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने आदल्या दिवशी अर्ज भरला, तर त्या विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र तातडीने तयार केले जाणार असून ऑनलाइन पद्धतीने ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवले जाईल, असेही राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्य

अन्न-पाणी दुरापास्त, २५ किमी पायपीट; युक्रेनमधील विद्यार्थ्यांचे हाल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली रशियाने लादलेल्या युद्धामुळे () युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. बॉम्बहल्ल्यांपासून वाचण्यासाठी बंकरमध्ये राहावे लागत असलेल्या या विद्यार्थ्यांना अन्न, पाण्याच्या तुटवड्याला () सामोरे जावे लागत आहे. भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना बसने प्रवास करून आणि नंतर २५ किमी चालत शेजारील रोमानियाच्या सीमेवर पोहोचल्यानंतर कडाक्याच्या थंडीत दोन दिवस उघड्यावर घालवावे लागले. रशियाच्या फौजांनी ईशान्य युक्रेनमधील खारकिव्ह शहराला वेढा घातल्याने त्याचा फटका तेथील भारतीय विद्यार्थ्यांनादेखील बसू लागला आहे. खारकिव्हमध्ये वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. बंकरमध्ये राहावे लागत असलेल्या या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि पाण्याची कमतरता असल्याने प्यायच्या सोड्यासाठी लांबलचक रांगा लावाव्या लागत आहेत. बॉम्बहल्ले सुरू असताना जीव धोक्यात घालून अन्नपदार्थ आणण्यासाठी बाहेर जावे लागत असल्याचे अनुभव महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. अन्न-पाण्यावाचून बिकट परिस्थिती ओढवण्यापूर

ICSI CS Exam 2022: सीएस जून परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, 'या' तारखेपर्यंत अर्ज करा

CS Exam 2022: आयसीएसआय म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीतर्फे (Institute of Company Secretaries, ICSI) सीएस परीक्षेच्या जून सत्रासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. सीएस फाउंडेशन (CS Foundation), सीएस एक्झिक्युटिव्ह (CS Executive)आणि सीएस प्रोफेशनल परीक्षांमध्ये (CS Professional Exams) बसू इच्छिणारे सर्व उमेदवार २५ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना ICSI च्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाऊन अर्ज भरावा लागेल. ICSI : असा करा अर्ज उमेदवार पुढे दिलेल्या सोप्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून अर्ज करू शकतात. सर्वप्रथम उमेदवारांनी ICSI ची अधिकृत वेबसाईट icsi.edu वर जा. होमपेजवर दिसणार्‍या Student टॅबवर क्लिक करा. तुमचा तपशील टाकून लॉग इन करा. सर्व आवश्यक माहिती भरून अर्ज भरा. अर्ज फी भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. भविष्यातील उपयोगासाठी अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. ICSI CS Exam 2022: परीक्षा कधी होणार? आयसीएसआयद्वारे जून सत्रासाठी सीएस परीक्षा १ ते १० जून २०२२ या कालावधीत होणार आहे. सर्व कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली

विमानतळ प्राधिकरण ज्युनियर एक्झिक्युटिव्ह भरती परीक्षेचा निकाल जाहीर

AAI Result 2020: भारतीय (AAI) ने ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजर पदाच्या भरतीचा निकाल जाहीर केला आहे. रिक्त पदांची भरती परीक्षा २०२० साठी बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल (AAI Result 2020) तपासू शकतात. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या या रिक्त पद भरती अंतर्गत एकूण ३६८ पदांची भरती केली जाणार आहे. व्यवस्थापक आणि कनिष्ठ कार्यकारी पदांच्या भरतीसाठी १५ डिसेंबर २०२० रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी २९ जानेवारी २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) जाहीर केलेल्या माहितीनुसार, या रिक्त पदांसाठी परीक्षा मार्च २०२१ मध्ये आयोजित करण्यात आली होती. यासाठी १२ मार्च २०२१ रोजी प्रवेशपत्र जारी करण्यात आले होते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, या रिक्त पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल तपासू शकतात. AAI Junior Executive Result 2020: असा तपासा निकाल निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट aai.aero वर जा. वेबसाइटच्या होम पेजवर दिलेल्या रिक्रूटमेंट डॅशबोर्ड विभागात

MUHS: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा ऑनलाइन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा एकविसावा दीक्षांत सोहळा बुधवारी (दि. २ मार्च) ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सोहळ्यात प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशमुख, केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाचे आरोग्य संशोधन विभागाचे सचिव प्रा. डॉ. बलराम भार्गव आदी ऑनलाइन सहभागी होतील. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे हा सोहळा विद्यापीठाने स्थगित केला होता. आता कुलपती कार्यालयाकडून मिळालेल्या आदेशानुसार या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ अधिसभागृहात सकाळी अकरा वाजता हा सोहळा होणार असून, विद्यापीठाच्या वेबसाइटद्वारे हा सोहळा ऑनलाइन पाहता येणार आहे. या सोहळ्यात ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या व आंतरवासीता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १० हजार २३६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. विविध विद्याशाखांमधी

डॉ. भूषण पटवर्धन 'नॅक'चे नवे अध्यक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन (Dr. Bhushan Patwardhan) यांची राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्विकृती परिषदेच्या () अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून 'नॅक' अध्यक्षपदी नेमणूक होणारे डॉ. पटवर्धन दुसरे व्यक्ती ठरले आहेत. 'यूजीसी'ने डॉ. पटवर्धन यांच्या नियुक्तीबाबत माहिती दिली असून, ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल. 'नॅक'चे अध्यक्ष प्रा. जगदीश कुमार यांची नियुक्ती 'यूजीसी'च्या अध्यक्षपदी झाल्यानंतर हे पद रिक्त होते. या नियुक्तीबाबत डॉ. पटवर्धन म्हणाले, 'केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उललली आहेत. त्या अनुषंगाने या धोरणाला 'नॅक'च्या कार्यप्रणालीशी सुसंगत करण्याचे पहिले उद्दिष्ट राहणार आहे. या धोरणानुसार देशातील महाविद्यालयांना 'नॅक'चे मूल्यांकन करणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच, महाविद्यालयांना शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण करण्याचे मोठे काम करावे लागणार आहे. त्यासाठी 'नॅक'ची कार

SEBI मध्ये विविध पदांची भरती, थेट लिंकवरून पाहण्यासाठी 'येथे' क्लिक करा

Group A 2022: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) द्वारे अधिकारी ग्रेड ए (Assistant Manager) भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार सेबीची अधिकृत वेबसाइट sebi.gov.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. या रिक्त पदांद्वारे सिक्युरिटीज मार्केट ऑपरेशन्स (Securities Market Operations, SMO), कायदा, संशोधन आणि माहिती तंत्रज्ञान विभागांमध्ये (Law, Amendment and Information Technology Department) यंग प्रोफेशनल प्रोग्रामसाठी (young professional program) ही प्रक्रिया सुरु आहे. या अंतर्गत एकूण १२० पदांची भरती केली जाणार आहे. निवड प्रक्रियेबद्दल अधिक तपशील अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) द्वारे जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २४ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार होता. जनरल स्ट्रीमस लीगल स्ट्रीम, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी स्ट्रीम, रिसर्च स्ट्रीम आणि राजभाषा स्ट्रीमसाठी अधिकारी ग्रेड ए (Assistant Manager) ही पदे भरली जात आहेत. SEBI Group A Result 2022: असा पाहा निका

क्रीडा विज्ञान अन् व्यवस्थापनच्या अभ्यासक्रमांना UGC ची मान्यता

म. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी, मुंबई देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात क्रीडा विज्ञान आणि क्रीडा व्यवस्थापन पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम असेल. येत्या शैक्षणिक वर्षापासून पुण्यात असलेल्या या विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू होईल. त्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने () मान्यता दिली आहे, असे राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. दीड वर्षापूर्वी या क्रीडा विद्यापीठाची घोषणा झाली होती. मात्र, करोनामुळे हे विद्यापीठ सुरू झाले नव्हते. येत्या शैक्षणिक वर्षापासून यात प्रवेश सुरू होईल, असे केदार यांनी वानखेडे स्टेडियमवरील पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आणि माजी कसोटीपटू निलेश कुलकर्णी, क्रीडा विभाग उपसचिव श्रीमती नानल उपस्थित होते. क्रीडा विज्ञान आणि क्रीडा व्यवस्थापन या विषयात पदवी आणि पदव्युत्तरचा समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे भारतात संघटित स्पोर्ट्स एड क्षेत्र निर्माण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, असेही केदार म्हणाले. या पदवींमुळे दहा अब्ज डॉलर उद्योगाच्या क्रीडा व्यवस्थापन उद्योगात संधी निर्

ICAI CA Inter Result 2021: सीए इंटरमिजिएट डिसेंबर २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर

CA Intermediate Result 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India, ICAI CA) इंटर निकाल २०२१-२२ शनिवारा २६ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर झाला आहे. सीए इंटरमिजिएट डिसेंबर २०२१ निकाल आयसीएआयची अधिकृत वेबसाइट icai.org वर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार रजिस्ट्रेशन क्रमांक आणि रोल नंबरच्या सहाय्याने पोर्टलवर लॉग इन करून सीए इंटर डिसेंबर २०२१ परीक्षेचा निकाल डाऊनलोड करू शकतील. १८ फेब्रुवारी रोजी झाली होती घोषणा आयसीएआय सीए इंटरमिजिएट २०२१ निकालाच्या तारखेची घोषणा आयसीएआयचे CCM धीरज खंडेलवाल यांनी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी केली होती. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते या निकालाची गेले अनेक दिवस वाट पाहत होते. कसा पाहाल ? सर्वात आधी आयसीएआयच्या अधिकृत वेबसाइट किंवा caresults.icai.org वर जावे लागेल. यानंतर होमपेजवर महत्त्वाची घोषणा या सेक्शनवर क्लिक करावे. यानंतर एक नवे पेज उघडेल. येथे आयसीएआय सीएइंटर २०२१ निकाल या लिंकवर क्लिक करा. यानंतर लॉगिन पेज वर, रोल नंबर आणि पासवर्ड आदि क्रेडेंशियल नोंदवा. आता आयसीएआय सीए इंटर निकाल २०२१ स्क्रीन व

MPSC पूर्व परीक्षा सुरळीत; अध्यक्षांच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेटी

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ ( 2021) शनिवारी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील १०९८ उपकेंद्रांवर घेण्यात आली. पुण्यातील विमलाबाई गरवारे प्रशाळा आणि एसएनडीटी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रांना आयोगाचे अध्यक्ष यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. आसनव्यवस्था आणि परीक्षार्थ्यांसाठी असलेल्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली. दरम्यान, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या वेळीही निंबाळकर यांनी नागपूर येथील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ द्वारे सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील ६६६ पदांची भरती करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील १०९८ परीक्षा केंद्रांवर ३ लाख ६२ हजार ३१९ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला असून या परीक्षा प्रक्रियेची निंबाळकर यांनी पुणे शहरातील विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. डेक्कन जिमखाना येथील विमलाबाई गरवारे प्रशाला आणि कर्वे रोडवरील श्रीमती ना

शिक्षकांनी शनिवार, रविवारही वर्ग घ्यावेत; पवारांनी घेतली जि.प. शिक्षकांची शाळा

पुणे: जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या नसतात असा समज झाला होता, परंतु, अधिकारी आणि।पदाधिकारी यांनी लक्ष घातले आहे, त्यामुळे पट वाढत आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जिल्हा परिषद शाळांच्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षकांनाही चार हिताच्या गोष्टी सांगण्यास पवार यावेळी विसरले नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेल्या शिक्षकांची मुले झेडपी शाळेत नाहीत, तोपर्यंत आपण पालकांना कसं सांगणार की तुम्ही तुमची मुले जिल्हा परिषद शाळेत पाठवा, असं पवार यावेळी म्हणाले. त्याचवेळी करोनानंतर आता नव्या दमाने कामाला लागत शिक्षकांना शनिवार, रविवारीही वर्ग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. करोनाचे संक्रमण कमी होत असल्याने आता येत्या २ मार्चपासून नर्सरी, केजीचे वर्ग सुरू करण्याचीही परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली. जम्बो कोविड सेंटर बंद केले जाणार आहे, असेही ते म्हणाले. ऑनलाइन शिक्षणाबाबतही अजित पवारांनी टिप्पणी केली. ते म्हणाले, 'प्रत्यक्ष शिक्षणा प्रमाणे ऑनलाइन शिकवता येत नाही

शिक्षकाविना शाळेला पालकांनी ठोकले टाळे!

म. टा. वृत्तसेवा, शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळावेत, या मागणीकडे शिक्षण विभागाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामु‌ळे संतापलेल्या पालकांनी पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील 'आयएसओ मानांकित 'कान्द्रेभुरे शाळेला अखेर टाळे ठोकले. येत्या चार दिवसांत शिक्षण विभागाने याबाबत पाऊल न उचलल्यास पालघर पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा पालकांनी दिला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे उतरती कळा लागली आहे. सफाळे पश्चिमेकडील कान्द्रेभुरे या दुर्गम भागात हीच स्थिती आहे. पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या जिल्हा परिषद कान्द्रेभुरे या शाळेत ६५ विद्यार्थी शिकत असून चार शिक्षकांची आवश्यकता असतानाही पालघरच्या शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरूपी शिक्षकच दिलेले नाहीत. शाळा व्यवस्थापन समितीनेही मागील दोन वर्षांपासून शाळेला पदवीधर शिक्षकासह अन्य शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार मागणी केली. परंतु शिक्षण विभागाने तात्पुरते शिक्षक दिले. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम

IIT Madras Online Course: बँकिंग परीक्षांच्या तयारीसाठी IIT मद्रासचा प्रिमिअर बँकर कोर्स

Premier Banker Course: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास ( IIT Madras ) द्वारे डिजिटल स्किल्स अकादमीने बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी 'प्रीमियर बँकर' हा ऑनलाइन कोर्स सुरू केला आहे. प्रीमियर बँकर कोर्समध्ये ४ ते ६ महिन्यांसाठी २४० तासांपेक्षा जास्त प्रशिक्षण असेल. अभ्यासक्रमाच्या मॉड्युलमध्ये शेकडो प्रश्न आणि विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अनेक असाइनमेंट्स असतील. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना मॉड्यूल यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर शिक्षण केंद्र, IIT मद्रास कडून प्रमाणपत्र मिळेल. इच्छुक विद्यार्थी अधिक माहिती IIT मद्रास डिजिटल स्किल्स अकादमी, skillscademy.iitm.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवर मिळवू शकतात . अर्ज करणारे उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. यासह, द्वितीय किंवा तृतीय वर्ष पदवीधर विद्यार्थी नोंदणीसाठी अर्ज करू शकतात, त्यांच्या प्रवेशाचा विचार केला जाईल. बँकिंग किंवा फायनान्शिअल सर्व्हिसेस क्षेत्रातील पूर्वीचा अनुभव प्राधान्य दिलेला आहे परंतु अनिवार्य नाही. या अभ्यासक्

२ मार्चपासून मुंबईतील शाळा १०० टक्के उपस्थितीत आणि पूर्णवेळ भरणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई गेल्या दोन वर्षांत कधी ऑनलाइन-कधी ऑफलाइन भरणारे वर्ग आता पूर्णवेळ १०० टक्के क्षमतेने ( Reopening in Mumbai) शाळांच्या बाकांवर होतील. मुंबईमध्ये करोनासाथ नियंत्रणात आल्याने येत्या २ मार्चपासून शहरातील सर्व मंडळांच्या शाळा, ज्युनिअर कॉलेज पूर्ण वेळ आणि क्षमतेने सुरू होणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत ५० टक्के प्रत्यक्ष आणि ५० टक्के ऑनलाइन चालणाऱ्या सर्व शाळा प्रत्यक्ष भरतील. मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी शुक्रवारी याबाबत आदेश जारी केले आहेत. मार्चपासून शाळा सुरू करताना करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. मुंबईत करोना संसर्गामुळे शाळा नियमितपणे आणि प्रत्यक्ष सुरू होण्यात वारंवार व्यत्यय येत गेले. अखेरीस करोना नियंत्रणात आल्यानंतर मुंबईतील पालिकेसह अन्य सर्व मंडळाच्या पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत शाळा, ज्युनिअर कॉलेजे मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात विशेष, दिव्यांग विद्यार्थ्यांचे वर्ग, मैदानी खेळ, शाळेच्या विविध उपक्रमांसह पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने शाळा सुरू होणार आहेत. प

ICSI सीएस प्रोफेशनल २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर

ICSI CS Professional 2021: आयसीएसआय म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीतर्फे (ICSI) कंपनी सेक्रेटरी डिसेंबर २०२१ च्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येत आहेत. कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट- icsi.edu वर निकाल तपासू शकतात. एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम (जुना आणि नवा अभ्यासक्रम) परीक्षांचा औपचारिक ई निकाल आणि गुण उमेदवारांना दुपारी २ वाजता वेबसाइटवर पाहता येणार आहेत. CS December Result 2021: असा पाहा निकाल सीएस प्रोफेशनल डिसेंबरचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट icsi.edu वर लॉग इन करा. होमपेजवर, 'सीएस प्रोफेशनल (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) निकाल' या लिंकवर क्लिक करा. तुमचे लॉगिन क्रेडेंशियल्स टाका आणि सबमिट वर क्लिक करा. तुमचा आयसीएसआय सीएस डिसेंबर २०२१ चा निकाल स्क्रिनवर दिसेल. निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह प्रोगामसाठी पुढील परीक्षा १

आरोग्य भरती परीक्षा पेपरफुटीप्रकरणी चौघांना अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे आरोग्य विभागाच्या 'क गट' संवर्गातील पदभरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी आरोग्य विभागातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चौघांना गुरुवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोग्य विभागाचा सहसंचालक महेश बोटले (वय ५३, रा. मुंबई), लातूरच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे (वय ५०), अंबाजोगाई मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगदंड (३६) आणि श्याम मस्के (३८, तिघेही रा. अंबाजोगाई) अशी पोलिस कोठडी झालेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना पूर्वी आरोग्य विभागाच्या 'ड गट' संवर्गातील पदभरतीसाठी घेतलेल्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता त्यांच्यावर दुसरा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी आरोग्य विभागातील उच्चपदस्थ अधिकारी असून, त्यांच्याकडे संबंधित विभागाच्या भरती प्रक्रियेची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आरोपींनी

CA इंटरमिडिएट डिसेंबर परीक्षेचा निकाल कधी? जाणून घ्या अपडेट

ICAI Result 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India, ICAI CA) इंटर निकाल २०२१-२२ ची उमेदवारांकडून वाट पाहिली जात आहेत. बोर्डाने निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. दरम्यान सीए इंटरमीडिएट डिसेंबरच्या परीक्षेचा निकाल २६ फेब्रुवारी किंवा २७ फेब्रुवारीला जाहीर केला जाणार आहे. अधिकृत वेबसाइट icai.org वर यासंदर्भात अधिक तपशील देण्यात आला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने यासंदर्भात ट्विट देखील करण्यात आले आहे. त्यानुसार २६ फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर केले जातील. जर २६ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाले नाहीत तर ते २७ फेब्रुवारी रोजी जाहीर केले जातील. उमेदवारांनी या अधिकृत तारखा लक्षात ठेवाव्यात. सीए निकालांसंबंधी अधिक अपडेटसाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे. आयसीएआयद्वारे अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन देखील अपडेट दिली जाईल असे आवाहन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, सीए इंटरमिजिएट निकाल २०२१ ची वाट पाहत असलेले उमेदवार ईमेलद्वारे आयसीएआय डिसेंबरचा निकाल पाहू शकतात. संस्थेतर्फे अधिकृत नोटीसमध्ये नोंदणीकृत

युक्रेनमध्ये अडकले मराठी विद्यार्थी; युद्धाचा भडका उडाल्याने उठले चिंतेचे काहूर

रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला आहे. युद्धकाळातील ( ) सायरनचे आवाज धडकी भरवत आहेत. टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून भारतातील घराघरात हे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनच्या आकाशात धूर आणि धुराचे लोट पाहून महाराष्ट्रातील कुटुंब देखील घाबरली आहेत. कारण युक्रेनमध्ये २ मराठी विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. अदिती देशमुख आणि प्रतिक जोंधळे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे विद्यार्थी नाशिकरोड व गंगापूर रोडचे रहिवासी असल्याचे समजते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने () दिली आहे. या विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. युक्रेनमधून भारतीयांना एअरलिफ्ट करण्यासाठी ७२ तासांपूर्वी ऑपरेशन सुरू केले. पण हल्ला सुरू झाल्यानंतर ते थांबवावे लागले आहे. युक्रेनला निघालेले एअर इंडियाचे विमान दिल्लीला परतत असल्याची बातमी आज सकाळी आली. एअर इंडियाच्या AI1947 या विमानाने मंगळवारी पहिल्यांदाच नवी दिल्ली ते कीवसाठी उड्डाण केले. २४० हून अधिक भारतीयांना धोकादायक परिस्थितीत घरी आणण्यात आले. 256-सीटचे बोईंग 787 ड्रीमलाइनर हे विमान गेले होते. या आठवड्यात आज गुरुवार आणि शनिवारी आणखी दोन उड्

JEE Advanced २०२२ परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 'या' तारखेपासून, पाहा संपूर्ण वेळापत्रक

2022: संयुक्त प्रवेश परीक्षा २०२२ (JEE Advanced) नोंदणी अपडेटची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (IIT Bombay) ने जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणीची तारीख जाहीर केली आहे. याची नोंदणी प्रक्रिया ८ जूनपासून सुरू होईल आणि १४ जूनला संपेल. जेईई अॅडव्हान्स परीक्षा ३ जुलै २०२२ रोजी घेतली जाणार आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार जेईई अॅडव्हान्स २०२२ च्या नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in ला भेट देऊ शकतात. जेईई अॅडव्हान्स २०२२ वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत उमेदवारांची फी भरण्याची अंतिम तारीख १५ जून २०२२ आहे. जेईई अॅडव्हान्स २०२२ () प्रवेशपत्र २७ जूनपासून अधिकृत जेईई अॅडव्हान्स वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. उमेदवार जुलैपर्यंत प्रवेशपत्र (Jee Advanced Admit Card) डाउनलोड करू शकतात. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. उमेदवारांना पेपर १ मध्ये उपस्थित राहण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी १२ आणि पेपर २ साठी दुपारी २.३० ते ५.३० पर्यंत वेळ देण्यात येईल. १८ जुलैपर्यंत निकाल परीक्षा संपल्यानंतर ९ जुलैपर्यंत प्रोव्हिजनल उत्तरताल

CS December Result 2021: सीएस प्रोफेशनल, एक्झिक्युटिव्ह डिसेंबरचा निकाल 'येथे' पाहा

2021: ICSI प्रोफेशनल, निकाल उद्या म्हणजेच २५ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज, (Institute of Company Secretaries, ICSI) ची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर सीएस प्रोफेशनल, कार्यकारी डिसेंबर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. माहितीनुसार, निकाल उद्या म्हणजेच २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाईल. तर सीएस एक्झिक्युटिव्ह निकाल दुपारी २ वाजता जाहीर केला जाईल. त्यामुळे या परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी उद्या त्यांचा सीएस निकाल पाहू शकतात. उमेदवारांना त्यांचा रोल नंबर टाकून गुण तपासता येणार आहेत. सीएस डिसेंबर निकाल २०२१ ची तारीख आयसीएसआयने १८ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर केली होती. एक्झिक्युटिव्ह प्रोगाम (जुना आणि नवा अभ्यासक्रम) परीक्षांचा औपचारिक ई निकाल आणि गुण उमेदवारांनी डाऊनलोड करण्यासाठी निकालाच्या घोषणेनंतर तत्काळ संस्थेच्या वेबसाइटवर अपलोड केले जातील. निकाल जाहीर झाल्यानंतर ते उमेदवारांना देखील पाठवले जातील. CS December Result 2021: असा पाहा निकाल सीएस प्रोफेशनल, एक्झिक्युटिव्ह डिसेंबरचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत

TET Scam: अटकेतील एजंट विविध पेपरफुटीत सहभागी

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे सायबर पोलिसांनी म्हाडा, आणि शिक्षक भरती गैरव्यवहारामध्ये पकडलेल्या अनेक एजंटचा देशातील विविध परीक्षा गैरव्यवहारात संबध असल्याचे आढळले आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून हे एजंट परीक्षा गैरव्यवहारात सक्रिय आहेत. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहाराचे जाळे देशभर पसरल्याचे दिसून आले आहे. पुणे सायबर पोलिसांनी आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा पेपरफुटी, शिक्षक भरती घोटाळा या प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळे पाच गुन्हे दाखल केले असून, ३९ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोग्य भरती गट 'ड'च्या पेपरफुटीप्रकरणात सायबर पोलिसांनी १९ आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे. ते सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोग्य भरती गट 'क'चा पेपरफुटीप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. म्हाडा पेपरफुटीसंबंधी तीन आरोपींना अटक केली आहे. टीईटी २०१९-२० गैरव्यवहार प्रकरणात १३ आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांचा समावेश आहे; तसेच २०१८च्या टीईटी प्रकरणात स्वतंत्र गुन्हा दाखल असून, त्यामध्येदेखील २०२० च्या 'टीईटी'मधील आरोपींचा सहभाग आहे. पोलिसांनी सर्व गुन्ह्यांचा तपास

NIPUN: प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ५०० रुपये, डिटेल्स जाणून घ्या

Primary students Scheme: करोना काळात झालेले मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने मुलांसाठी लर्निंग रिकव्हरी प्लान (Learning Recovery Plan, LRP) तयार करण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयाचे ( Ministry) सहसचिव मनीष गर्ग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या योजनेवर लवकरात लवकर काम सुरू करण्याच्या सूचना सर्व राज्यांना देण्यात आल्या आहेत. लर्निंग रिकव्हरी प्लान (Learning Recovery Plan) अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रावर वाईट परिणाम झाला. मुलांच्या शिक्षणावरही याचे गंभीर परिणाम पाहायला मिळाले. या दोन वर्षाच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना आपले पालक गमवावे लागले. खासगी शाळांतील शिक्षण परवडू न शकल्याने सरकारी शाळांमधील प्रवेश वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेऊन एका योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेअंतर्गत सरकारने मुलांना शिकवण्यासाठी एलआरपी ही सर्वसमाव

जळाल्या त्या प्रश्नपत्रिका बारावीच्या मराठी विषयाच्या; परीक्षा नियोजित वेळेतच

म.टा. प्रतिनिधी, नगर पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात एका धावत्या ट्रकला आग लागली. त्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका (12th Exam Question Papers) होत्या. त्या जळून खाक झाल्या आहेत. या माहितीला पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दुजोरा दिला; मात्र, 'परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे चार मार्चपासून सुरू होईल, यात काहीही अडचण येणार नाही,' अशी माहितीही त्यांनी दिली. हा अपघात बुधवारी पहाटे झाला. मध्य प्रदेशातून पुणे विभागीय मंडळाचे छापील साहित्य घेऊन येणाऱ्या ट्रकला (क्र. एम. पी. ३६ एच. ०७९५) पाठीमागील बाजूने आग लागली. हे लक्षात आल्यानंतर चालक व त्याच्या सहायकाने ट्रक थांबवून आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. संगमनेरमधील अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वाहनात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची गोपनीय कागदपत्रे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानुसार पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अशोक भोसले, विभागीय सचिव अ

MPSC कडून ५०० हून अधिक पदांची भरती, जाणून घ्या तपशील

2022: सरकारी नोकरीची (Government Job) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने () तांत्रिक सेवांसाठी (Technical Service) विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीच्या प्राथमिक परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र आणि इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. पदभरतीचा तपशील एमपीएससीने जाहीर केलेल्या भरतीद्वारे, निवड झालेल्या उमेदवारांना वनरक्षक (Forest Guard), कृषी अधिकारी (Agriculture Officer), सहायक कार्यकारी अधिकारी (Assistant Executive Officer), सहायक अभियंता (Assistant Engineer) आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी (Sub-Divisional Water Reservation Officer) या रिक्त पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. भरतीमध्ये एकूण ५८८ रिक्त पदे आहेत. अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये उमेदवारांना अधिक तपशील मिळू शकणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा एमपीएससी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून पदांनुसार पात्रता मागविण्यात

Russia-Ukraine Conflict: युक्रेनमध्ये २० हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी, सरकारने घेतला 'हा' निर्णय

Russia : रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी (Russia's President) २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनवर लष्करी कारवाई (Ukrainian military action)चे आदेश दिल्यानंतर हल्ला सुरू झाला आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या २० हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Student) मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारचे (Indian Government) प्रयत्न आधीच सुरू आहेत. विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी उच्च स्तरावर प्रयत्न केले जात आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलच्या (Nation Security Counsil) बैठकीत याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या परतण्यासाठी संपूर्ण व्यवस्था केली जात असल्याचे ते यावेळी म्हणाले. तिरुमूर्ती यांनी यूएनएससीमध्ये सांगितले की, 'युक्रेनमधील २० हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. आम्ही विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना परत येण्याची सोय करत आहोत.' दुसरीकडे, भारतीय विद्यार्थ्यांसह १८२ प्रवाशांना घेऊन एक फ्लाइट आज २४ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली विमानतळावर पोहोचली. या प्रवाशांना इंटरनॅशनल एअरल

रत्नागिरी जिल्हा परिषदेत भरती, ७० हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार

ZP : रत्नागिरी जिल्हा परिषदेत (ratnagiri District Council) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. रत्नागिरी झेपीमध्ये इंजिनीअरिंग स्पेशलिस्ट(Engineering Specialist) आणि इंजिनीअरिंग कोऑर्डिनेटर (Engineer Coordinator) पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत इंजिनीअरिंग स्पेशलिस्टचे १ पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीटेक/बीई सिव्हील/एमटेक/एमईपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवारांकडे संबंधित कामाचा ७ वर्षाचा अनुभव असावा. तसेच कॉम्प्युटरची किमान माहिती असावी. पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. इंजिनीअरिंग कोऑर्डिनेटर पदाच्या २ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीटेक/बीई सिव्हिल, एमटेक/एमई उत्तीर्ण असलेल्

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! आयुर्वेद रुग्णालयात आता वर्षभर 'इंटर्नशिप'

पुणे : ''च्या वैद्यकीय अभ्यासक्रमांतर्गत नव्याने तीन शैक्षणिक वर्षांच्या रचनेत आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या संलग्नित रुग्णालयातच सहा महिन्याऐवजी संपूर्ण वर्षभर प्रॅक्टिस (Internship) करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी डॉक्टरांना रुग्णपरिक्षणाचा अधिक अनुभव मिळणे शक्य होणार आहे. 'बीएएमएस'च्या अभ्यासक्रमाच्या रचनेसह कॉलेजच्या शिक्षकांच्या बदलांबाबत नॅशनल कौन्सिल ऑफ इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसीनने (एनसीआयएसएम) म्हणजेच भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने काढलेली अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आयुर्वेद विश्वात बदलाचे वारे वाहू लागले आहे. या बदलांबाबत आयुर्वेद विश्वातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी आयुर्वेदाची 'बीएएमएस'ची पदवी संपादन करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना साडेचार वर्षाच्या अभ्यासक्रमानंतर आणखी एक वर्ष खर्च करावे लागत होते. त्यापैकी सहा महिने ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 'इंटर्नशिप' करण्याची मुभा देण्यात आली होती. उर्वरित सहा महिने कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याची संधी होती. परंतु, त्यावेळी अनेकदा प

IGNOU January २०२२ सत्रासाठी पुनर्नोंदणीची अंतिम तारीख वाढवली

January 2022: इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University, IGNOU) तर्फे जानेवारी सत्रासाठी पुनर्नोंदणीची नोंदणीची तारीख वाढवली आहे. विद्यार्थ्यांना आता २८ फेब्रुवारीपर्यंत या सत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अद्याप या सत्रासाठी अर्ज करता आले नाही ते आता अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. इग्नू जानेवारी २०२२ सत्रासाठी री-रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२२ होती. यापूर्वी ३१ डिसेंबर २०२१ होती. आणि आता ही तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. विद्यापीठाच्या ट्विटर हँडलवरूनही याची घोषणा करण्यात आली. या व्यतिरिक्त विद्यार्थी खाली दिलेल्या सोप्या थेट फॉलो करुन देखील अर्ज करु शकतात. असा करा अर्ज उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in वर जा. 'Application Process' या लिंकवर क्लिक करा. क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि लॉगिन करा. अर्ज भरा आणि कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट वर क्लिक करा. अर्ज सबमिट केल्यावर प्रत डाउ

RBI Assistant परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम जाणून घ्या

2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India, RBI) मध्ये सहाय्यक पदांच्या १००० रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी १७ फेब्रुवारी २०२२ रोजी रिझर्व्ह बँकेच्या rbi.org.in या वेबसाइटवर फॉर्म प्रसिद्ध करण्यात आला आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च आहे. लेखी परीक्षेद्वारे (RBI Assistant Exam 2022) या पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ज्यामध्ये प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि भाषा प्राविण्य चाचणीचा समावेश आहे. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू करावी. आरबीआय परीक्षा प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी या तीन टप्प्यांत घेतली जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, (RBI) मध्ये सहाय्यक पदांची प्राथमिक परीक्षा २६, २७ मार्च २०२२ रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. तर मुख्य परीक्षा मे महिन्यात होणार आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेस उत्तीर्ण होणारे उमेदवार भाषा प्राविण्य चाचणीत बसण्यास पात्र असतील. परीक्षेत जास्त वेळ नसेल. त्यामुळे उमेदवारांनी आतापासूनच परीक्षेच्या पद्धती आणि अभ्यासक्रमानुसार

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन की ऑनलाइन? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली सीबीएसई आणि अन्य शिक्षण मंडळांच्या १० वी आणि १२वीच्या ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय परीक्षा कशी काय घेतली जाऊ शकते, अशी तोंडी विचारणा न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. सी. टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाने मंगळवारी केली. याआधी याचिकाकर्त्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी करोनाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली असली तरी शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याकडे लक्ष वेधले. तसेच, याचिकाकर्त्या अनुभा श्रीवास्तव सहाय यांनी या प्रकरणाची तत्काळ सुनावणी करण्याची विनंती केली होती. त्यावर ही सुनावणी बुधवारी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) १० वी आणि १२ वीच्या टर्म २ च्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. टर्म २ च्या परीक्षा २६ एप्रिलपासून होणार आहेत. दरम्यान, कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दहावी आणि ISC म्हणजेच बारावीच्या परीक्षा घेण्याची श

CTET निकालास उशीर झाल्याने सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक

2021: CTET निकाल २०२१ ची प्रतीक्षा अजूनही सुरू आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)तर्फे CTET परीक्षा २०२१ चा निकाल १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत जाहीर करण्यात येणार होता. मात्र अद्याप निकाल जाहीर होण्याची नवीन तारीख आणि वेळेशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सीबीएसईने CTET निकाल जाहीर करण्याची तात्पुरती तारीख पुढे ढकलण्यासंबंधी कोणतीही नोटीस जारी केलेली नाही. सीबीएसईच्या या कृतीमुळे उमेदवार निराश झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार प्रश्न उपस्थित करत आहेत. CTET २०२१ च्या परीक्षेत २० लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. जे आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र निकालाला उशीर झाल्याने निराश आणि संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आता ट्विटरवर आपला राग व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थी, सीबीएसई, सीटीईटी आणि इतर संबंधित संस्थांना टॅग करून, निकाल जाहीर करण्याच्या अधिकृत वेळ आणि तारखेबद्दल विचारणा करीत आहेत. सीटीईटीचा निकाल १५ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार होता पण अद्याप जाहीर करण्यात आला नाही. याची कारणे काय आहेत? असा प्रश्न ट्विटरवर एका युजर्सने विचा

NIFT परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, आक्षेप नोंदविण्यासाठी 'येथे' क्लिक करा

2022: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (National Institute of , NIFT) ने एनआयएफटी परीक्षेची तात्पुरती जाहीर केली आहे. या परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट- nift.ac.in वर जाऊन उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. उमेदवारांना आवश्यक लॉगिन क्रेडेन्शियल्स भरुन एनआयएफटी उत्तरतालिका डाउनलोड करता येणार आहे. एनआयएफटी उत्तरतालिकेसोबतच अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिकाही प्रसिद्ध केली आहे. एनआयएफटी प्रवेश परीक्षा ६ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन प्रॉक्टोर्ड पद्धतीने घेण्यात आली. NIFT २०२२ या उत्तर तालिकेशी समाधानी नसलेले उमेदवार प्रति प्रश्न ५०० रुपये आक्षेप शुल्क भरून आव्हान देऊ शकतात. कोणत्याही प्रश्नावर आक्षेप नोंदविताना पुरेसे पुरावे सादर करावे लागतील. नोंदणीकृत तक्रार खरी असल्याचे आढळल्यास, त्या आक्षेपासाठी पाठवलेले शुल्क परत केले जाईल. उत्तरतालिका तपासून, उमेदवार त्यांच्या स्कोअरचा अंदाज लावू शकतात. एनआयएफटी उत्तरतालिका डाउनलोड करताना, उमेदवारांनी रोल नंबर, प्रोग्राम कोड, बुकलेट श्रृंखला आणि जन्मतारीख हे लॉगिन क्रेडेंशियल्स काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. Answer Key 2022: अशी करा डाउनलोड NIFT च

परदेशी शिष्यवृत्तीबाबत मागासवर्गीयांवर अन्याय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई देशातील एससी, एसटी, एनटी अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने १९५४मध्ये '' योजना (Scholarship for Education Abroad) सुरू केल्यामुळे या समाजातील अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेणे शक्य झाले. यामध्ये आता नियम बदल केल्यामुळे या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे, अशी खंत नियोजन आयोगाचे सदस्य यांनी व्यक्त केली. तर, केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य खासदार प्रा. मनोजकुमार झा यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. 'सुरुवातीला ही शिष्यवृत्ती केवळ ५० विद्यार्थ्यांना मिळत असे. मी नियोजन आयोगात सदस्य असताना ही संख्या १०० केली', असे डॉ. मुणगेकर यांनी सांगितले. कालांतराने ही संख्या आता १२५वर नेण्यात आली. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचा व प्रावीण्य असलेला विषय संशोधनासाठी घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. अलीकडे केंद्र सरकारने नवे नियम तयार करून 'भारतीय संस्कृती, भारतीय पुरातन वारसा, भारतीय समाज विज्ञान आणि भारतीय इतिहास' हे विषय संशोध

Mid-day Meals: शाळांमध्ये मध्यान्ह भोजन बंद, शिक्षण विभागाने दिले 'हे' कारण

Delhi School: दिल्ली सरकारच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती झाल्यानंतर मध्यान्ह भोजन () सुरु केले जाणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या घरी दिले जाणारे रेशन सुरुच राहणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सध्या शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती आहे. आणि जर सुरू केले तरी सर्व शंभर टक्के विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शंभर टक्के उपस्थिती नोंदविल्यानंतर शाळांमध्ये शिजवलेले माध्यान्ह भोजन दिले जाणार आहे.' एका स्वयंसेवी संस्थेने यासंदर्भात पाठवलेल्या नोटीसनंतर दिल्ली सरकारतर्फे हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सरकारी शाळांमध्ये १४ फेब्रुवारीपासून इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांसाठी सामान्य वर्ग सुरू झाले आहे. असे असूनही शाळांमध्ये शिजवलेले माध्यान्ह भोजन दिले जात नव्हते. या पार्श्वभूमीवर 'दिल्ली रोझी-रोटी अधिकार अभियान' (Delhi Rossi-Roti Rights Campaign) या संस्थेने दिल्ली सरकारला आणि तीन महापालिकांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. यानंतर आता सरकारची प्रतिक्रिया आली आहे. शंभर टक्के उपस्थिती असल्यावर मध्यान्ह भोजन सुरु होईल असे सांगण्यात आले

दहावीच्या विद्यार्थ्यांना इंटरमिजिएटआधारेच सवलतीचे गुण

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना केवळ इंटरमिजिएट परीक्षेतील श्रेणीच्या आधारेच सवलतीचे गुण मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला. दहावीला चित्रकला क्षेत्रातील सवलतीचे गुण मिळविण्यासाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजिएट परीक्षेला बसता येत नाही. मात्र गेल्या वर्षी शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये करोनामुळे एलिमेंटरी परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आलेली नाही. अशा विद्यार्थ्यांना यंदा केवळ इंटरमिजिएट परीक्षेत मिळालेल्या श्रेणीच्या आधारे चित्रकला क्षेत्रातील सवलतीचे गुण देण्यात येणार आहेत. हा निर्णय केवळ यंदाच्या परीक्षेपुरताच लागू असणार आहे. या संदर्भात शिक्षण विभागातर्फे शासन आदेश काढण्यात आला असून, तो केवळ शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पुरताच मर्यादित असणार आहे. ‘इंटरमिजिएट’ परीक्षा २२ व २३ फेब्रुवारीला ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला राज्यभरातील विद्यार

ICCR Initiative: भारतीय महाकाव्ये, वेद, कला आणि वारसा या विषयांवर अभ्यासक्रम

Initiative: इंडियन काऊन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स (Indian Council of Cultural Relations, ICCR) च्या नवीन उपक्रमांतर्गत, भारतीय महाकाव्य (), वेद (), कला (art) आणि वारसा (heritage) या विषयांवर ऑनलाइन अभ्यासक्रम (Online courses) सुरु केला जाणार आहे. आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे (ICCR President Vinay Sahasrabuddhe) यांनी ही माहिती दिली. पारंपारिक भारतीय ज्ञान, कला, वास्तुकला, कालातीत महाकाव्ये आणि वेद यांचा जागतिक समुदायामध्ये प्रसार करण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. आयसीसीआरच्या पुढाकाराने लवकरच नवीन ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यासाठी वेगळे पोर्टल २ एप्रिलपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. पारंपारिक भारतीय ज्ञान प्रणालीचे जागतिकीकरण राज्यसभा खासदार सहस्रबुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना, 'आझादी का अमृत महोत्सवा'अंतर्गत सुरू असलेल्या सोहळ्यात आम्ही पारंपरिक भारतीय ज्ञान प्रणालीच्या जागतिकीकरणाचे काम सुरू करणार आहोत. याअंतर्गत परदेशात राहणाऱ्या लोकांना आपल्या देशातील पारंपरिक ज्ञान, कला आणि संस्कृतीची

शिक्षण क्षेत्राच्या विस्तारासाठी 'या' पाच बाबी महत्वाच्या- पंतप्रधान

National : शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी ५ महत्वाच्या बाबी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजित वेबिनारमध्ये सांगितल्या. या कार्यक्रमात अर्थसंकल्प २०२२ मध्ये केलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. नॅशनल डिजिटल युनिव्हर्सिटी () हे देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील अभूतपूर्व पाऊल असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रांवर, विविध संबंधित सत्रांचे विषयांवर चर्चा करण्यात आली. या सत्रात विविध मंत्रालये आणि राज्य सरकारांचे सरकारी अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, कौशल्य विकास संस्था, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी आणि इतर तज्ञ उपस्थित होते. डिजिटल युनिव्हर्सिटी, डिजिटल शिक्षक, क्लासरूम वन चॅनलचा आवाका वाढविणे या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. शहर नियोजन आणि डिझाइन करताना भारताच्या दृष्टीकोनातून ज्ञान,उद्योग-कौशल्य वाढवण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि कौशल्य संबंध मजबूत करणे हा यामागचा हेतू आहे. डिजिटल कनेक्टिव्हिटीवर बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल युनिव्हर्सिटीबद्दल बोलले. आजची तरु

आरटीई प्रवेशांना उत्स्फूर्त प्रतिसाद

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के कोट्यातील () प्रवेश प्रक्रियेला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. अवघ्या चार दिवसांतच पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कालावधीत राज्यामध्ये तब्बल ४० हजार २९३ अर्ज पालकांकडून करण्यात आले. नागपूर व मुंबईतून सर्वाधिक अर्ज आले आहेत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. आरटीई प्रवेशासाठी संपूर्ण राज्यातून आठ हजार ६७९ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये ९६ हजार ६० जागा आहेत. १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला तांत्रिक अडचणींमुळे १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. १७ ते २० फेब्रुवारी या चार दिवसांमध्ये राज्यभरातून आरटीई प्रवेशासाठी तब्बल ४० हजार २९३ अर्ज आले. यामध्ये नागपूरमध्ये सर्वाधिक ११ हजार ४५५ अर्ज आले आहेत. त्याखालोखाल मुंबईमधून ४ हजार ६२०, औरंगाबाद ३ हजार ७४३, नाशिक ३ हजार ३३१, जळगाव २ हजार २२२ आणि अमरावतीमधून १ हजार ७२२ इतके अर्ज आले आहेत. मात्र अद्याप ११ जिल्ह्

शाळा सुरू, खिचडी गायब! विद्यार्थी सहा महिन्यांच्या शिध्यापासून वंचित

म. टा. प्रतिनिधी, पुणे करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यातील शाळा सुरू झाल्या. मात्र, शालेय पोषण आहारांतर्गत () दिली जाणारी पौष्टिक अजूनही विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यातच ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या सहा महिन्यांचा शिधा विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थी शाळेत येण्याचे प्रमाण घटले असून, त्यांच्या वाढीसाठी लागणारी पोषणमूल्ये त्यांना मिळत नसल्याचा सूर शिक्षण क्षेत्रात उमटत आहे. राज्यात 'मिड डे मिल' (मध्यान्ह भोजन) योजना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २००८-०९मध्ये सुरू झाली. केंद्र सरकार पुरस्कृत या योजनेसाठी हजारो रुपयांचे अनुदान दिले जाते. शाळेत कोणतेही मूल कुपोषित राहू नये, विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, यासाठी ही योजना सुरू झाली. या योजनेत अन्न शिजवून देण्याचा ठेका महिला बचत गटांकडे आहे. करोनापूर्वी शालेय पोषण आहारांतर्गत (मध्यान्ह भोजन) राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांना पौष्टिक खिचडी शिजवून देण्यात येत होती. मात्र, करोना कालावधीत इयत्त

GATE २०२२ परीक्षेची उत्तरतालिका आज होणार जाहीर, 'येथे' नोंदवा आक्षेप

Answer Key: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर ( Kharagpur) तर्फे गेट परीक्षेची (GATE 2022) आज जाहीर केली जाणार आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार गेटची अधिकृत वेबसाइट gate.iitkgp.ac.in वर जाऊन उत्तरतालिका तपासू शकतात. यावर्षी गेट २०२२ ची परीक्षा ४ दिवसात घेण्यात आली होती. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा ५, ६, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. उमेदवारांना अर्ज पोर्टलवर लॉगिन करून उत्तरतालिका पाहता येणार आहे. यासाठी उमेदवारांनी स्वतःचा नावनोंदणी क्रमांक आणि पासवर्ड भरून अर्ज करावा लागणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूर यांनी जाहीर केलेल्या नोटीसनुसार, उमेदवारांना मंगळवार २२ फेब्रुवारी ते शुक्रवार २५ फेब्रुवारी या कालावधीत उत्तरतालिकेवर (GATE 2022 Answer Key) वर आक्षेप नोंदवता येणार आहे. गेट २०२२ चा निकाल गुरुवार, १७ मार्च २०२२ रोजी ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. सोमवार, २१ मार्च २०२२ पासून उमेदवार त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतील. GATE : अशी करा डाऊनलोड १ : सर्वप्रथम, उमेदवार IIT GATE च्या अधिकृत वेबसाइट gate.iitkgp.ac.in वर जा. २ : त

कमी किंमतीत घर बांधणी शक्य, IIT Madras कडून तंत्राचे संशोधन

IIT : देशातील नागरिकांना कमी किंमतीत घर बांधणी शक्य होणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासतर्फे यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी हाऊसिंग इनक्यूबेटर 'आशा' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कमी किंमतीची परवडणारी घरे बांधण्यासाठी याची मदत होणार आहे. बांधकाम क्षेत्रातील स्टार्टअप्सना मदत करण्याचे नाविन्यपूर्ण मार्ग शोधणे यामागचे उद्दिष्ट आहे. यामुळे अनेकांचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. एक्सेलरेटर अफोर्डेबल सस्टेनेबल हाउसिंग एक्सेलरेटर्स गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाचा हा एक उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत, बाजारात नसलेल्या आणि बाजारात येण्यासाठी तयार असलेल्या तंत्रज्ञानांना प्रोत्साहन देण्यात येते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक स्टार्टअप्सना इनक्यूबेटरची मदत लागणा आहे. यामध्ये टीवास्टा (Tvasta) चा देखील समावेश आहे. टीवास्टाने करोना फ्रंटलाइन हेल्थकेअर कर्मचार्‍यांनी वापरलेले पीपीई सुरक्षितपणे काढून टाकण्यासाठी देशातील पहिले थ्रीडी प्रिंट केलेले घर आणि पहिले थ्रीडी प्रिंट केलेले डॉफिंग युनिट तयार केले आहे. तंत्रज्ञानाची ओळख, नाविन्यपूर

सहा अभ्यासक्रमांच्या ६५०० जागा रिक्त; सीईटी सेलकडून प्रक्रिया पूर्ण

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येतात. त्यातील सहा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया नुकती संपली असून एकूण जागांपैकी ६५०० जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये एलएलबी ५ या अभ्यासक्रमांच्या सर्वाधिक २९०३ जागा रिक्त आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला यंदा काहीसा विलंब झाला होता. मात्र तरीही सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रियेचे योग्य नियोजन करण्याचे प्रयत्न केले. त्यातूनच विद्यार्थ्यांना फारसा त्रास न होता प्रवेशप्रक्रिया राबवण्यात सीईटी सेलला यश आले. उच्च शिक्षण विभागांतर्गत असलेल्या आठ अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया काही दिवसांपासून सीईटी सेलकडून राबवण्यात येत होत्या. त्यातील सहा अभ्यासक्रमांच्या परीक्षा नुकत्याच पूर्ण झाल्या. यामध्ये एमएड, बीपीएड, बीएबीएससीबीएड, बीएडएमएड, एलएलबी ५ या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा संपल्या आहेत. या सहा अभ्यासक्रमांसाठी राज्यभरामधील विविध कॉलेजांमध्ये २२ हजार ४५६ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी प्रवेश परीक्षा क

MCM Scholarship: एमसीएम शिष्यवृत्तीचा कालावधी ५ वर्षांनी वाढवला

MCM : मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिपचा (Means-cum-Merit Scholarship) कालावधी ५ वर्षांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union ) यांनी यासंदर्भातील घोषणा केली. माध्यमिक स्तरावरील शिक्षणात सातत्य राखण्यासाठी आणि इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांना ड्रॉप आऊटपासून रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत २०२२-२७ या आर्थिक वर्षासाठी १,८२७ कोटी रुपयांच्या नॅशनल मीन्स-कम-मेरिटची सुरुवात करण्यात आली आहे. मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप योजना सुधारित आणि विस्तारित करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. इयत्ता आठवीनंतर अनेक विद्यार्थी शाळा सोडून जातात. त्यामुळे शाळेतील पटसंख्या कमी होताना दिसते. ही गळतीची समस्या सोडवण्यासाठी आणि माध्यमिक स्तरावर शिक्षणाचे सातत्य राखण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. केंद्र सरकारने पुढील ५ वर्षांसाठी १८२७ कोटी रुपये मंजूर करुन शिष्यवृत्ती सुरु ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप (Means-cum-Merit Scholarship) योजना समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांत