मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे दोघेही निमंत्रित असून त्यामुळे ठाकरे-राणे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. के ंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे या उद्घाटन समारंभासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत. तर राजशिष्टाचारानुसार तिसऱ्या क्रमांकावर स्थानिक नेते व केंद्रीय मंत्री या नात्याने नारायण राणे यांचे नाव निमंत्रितांच्या यादीत आहे. भाजप-शिवसेनेतील श्रेयवाद आणि चिपी विमानतळाच्या उद् घाटनासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांना बोलावण्याची गरज नाही या नारायण राणे यांच्या विधानामुळे राजकीय वाद रंगला होता. त्या पाश्र्वभूमीवर ९ ऑक्टोबरला काय होते याबाबत उत्सुकता आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी चिपी विमानतळाच्या तयारीचा आणि कार्यक्रमाचा आढावाही घेतला. केंद्र सरकारचा सहभाग असल्याने राणे यांना निमंत्रित करणे राज्य सरकारला आवश्यकच होते.
The post चिपी विमानतळ उद्घाटनासाठी ठाकरे-राणे एकाच मंचावर appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3CPd6XM

Comments
Post a Comment