|| संजय बापट
राज्यातील ४४ साखर कारखान्यांवर लाल फुली
मुंबई : शेतकऱ्यांचा ऊस घेऊन नंतर त्यांची फसवणूक करणाऱ्या साखर कारखान्यांचा खरा चेहरा शेतकऱ्यांसमोर यावा. कोणत्या कारखान्याची खरी परिस्थिती काय आहे याची माहिती शेतकऱ्यांना कळावी यासाठी राज्यात प्रथमच कारखान्यांचा लेखाजोखा जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार गळीत हंगामासाठी तयार असलेल्या १९० कारखान्यांची नियमित ऊसदर देणे, विलंबाने उसाची रक्कम देणे आणि वेळेत ऊसदर न दिल्याने झालेली कारवाई या निकषांआधारे चांगला-मध्यम-वाईट अशी वर्गवारी साखर आयुक्तालयाने जाहीर के ली आहे.
राज्यात यंदा १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू होत आहे. मात्र काही कारखान्यांनी मागील गळीत हंगातील उसाची रास्त आणि किफायतशीर किं मत(एफआरपी) अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जास्त रकमेचे आमिष दाखविणे आणि नंतर त्यांची फसवणूक करणे, ऊस गाळपास नकार देणे, काही निवडक शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देऊन त्यानंतर बहुसंख्य शेतकऱ्यांची फसवणूक करणे अशा प्रकारे साखर कारखान्यांकडून फसवणूक के ली जात आहे. काही कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे देतात. त्यामुळे सक्षम कारखाना कोेणता हे शेतकऱ्यांना सहज समजावे, कोणत्या कारखान्यास ऊस घालावा याबाबत माहिती मिळावी यासाठी राज्यातील सर्व साखर कारखान्यांचा लेखाजोखा जाहीर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला होता. त्यानुसार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांना उसाची रास्त आणि किफायतशीर किं मत नियमित देणारे, हंगामात थोड्या विलंबाने एफआरपी देणारे आणि हंगाम संपूर्णही मुदतील एफआरपी न देणारे तसेच साखर जप्तीची कारवाई झालेल्या कारखान्यांचा लेखाजोखा जाहीर के ला आहे. या माहितीमुळे कोणत्या कारखान्याला ऊस घालावा याचा निर्णय घेणे शेतकऱ्यांना सोपे होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
१९० साखर कारखान्यांपैकी सहकारी आणि खासगी असे ५७ कारखाने शेतकऱ्यांची देणी वेळेवर देतात, तर ४४ कारखाने शेतकऱ्यांची कोणत्या ना कोणत्या मार्गाने फसवणूक करीत अस असतात. राज्यात सर्वाधिक ३० कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना, माढा येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना, विठ्ठल कार्पोरेशन कारखाना(खासगी), बबनराव शिंदे साखर कारखाना (खासगी), विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना (खासगी) एवढेच कारखाने शेतकऱ्यांना नियमित देणी देत असून १४ कारखान्यांवर देणी थकविल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. कोल्हापुरात एकाही कारखान्यावर लाल फु ली नसून सांगली, सातारा जिल्ह्यात प्रत्येकी पाच, पुणे जिल्ह्यात दोन, उस्मानाबाद जिल्ह्यात पाच, अहमदनगर एक, तर नाशिक जिल्ह्यात तीन कारखान्यांवर लाल फु ली मारण्यात आली आहे. मराठवाड्यातील ११ कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी थकविली किं वा फसवणूक के ल्याचे समोर आले आहे.
The post फसवणूक रोखण्यासाठी कारखान्यांना मानांकन appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3o8HjNa

Comments
Post a Comment