मुंबई : अभिनेता कपिल शर्माची साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियांचा मुलगा बोनिटोला शुक्रवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी कपिल शर्माच्या जबाबानंतर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासासाठी तो गुप्तवार्ता विभागाकडे (सीआययू) वर्ग करण्यात आला होता.
कपिल शर्माने छाब्रिया यांना व्हनिटी व्हॅन तयार करण्यास सांगितले होते. त्याचे सर्व पैसे शर्माने दिले होते. पण त्याबदल्यात त्याला व्हॅन मिळालीच नाही. याप्रकरणी गेल्या वर्षी कपिल शर्माने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. गुप्तवार्ता विभागाने दिलीप छाब्रियाला अटक केल्यानंतर कपिल शर्माने मुंबई पोलिसांना संपर्क साधला होता. २०१७ मध्ये कपिल शर्माने छाब्रियाला पाच कोटी रुपये दिले होते. त्यानंतर २०१८ जीएसटीच्या बहाण्याने आणखी ४० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतरही शर्माची कार मिळाली नाही. त्यावेळी छाब्रियाने ६० लाख रोख रकमेची मागणी केली. व्हॅन तयार नसतानाही एवढे दिवस गॅरेजमध्ये पडून असल्याचे सांगून पार्किंग चार्जेसच्या नावाखाली छाब्रियाने १३ लाख रुपयांचे बिल कपिलला पाठवले. पैसे घेऊनही व्हॅन न मिळाल्याने अखेर कपिल शर्माने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. हा व्यवहार बोनिटोच्या बँक खात्यात झाला होता.
The post फसवणूकप्रकरणी दिलीप छाब्रियांच्या मुलाला अटक appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/39BxsqP

Comments
Post a Comment