Skip to main content

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

परीक्षेसंबंधी सर्व बाबी अद्ययावत करण्याच्या सूचना

मुंबई: आरोग्य विभागाच्या गट क आणि ड साठीच्या पदभरती परीक्षेसाठी डॅशबोर्ड तयार करून ओळखपत्र, परीक्षा केंद्र यांची माहिती वेळोवेळी अद्ययावत करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी संबंधित कंपनीसोबत आयोजित केलेल्या बैठकीत दिल्या आहेत. हा डॅशबोर्ड १ ऑक्टोबरपासून कार्यान्वित होणार आहे.

आरोग्य विभागाच्या गट क आणि ड साठीच्या ६ हजार २०५ जागांच्या भरतीसाठी शनिवारी आणि रविवारी आयोजित केलेली परीक्षा ऐनवेळी रद्द केल्यामुळे राज्यभरातून विद्यार्थ्यांंसह आरोग्य कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. परीक्षा आयोजनासाठी निवड केलेल्या कंपनीला या प्रकरणी नोटीस बजावली असून त्यांचे  उत्तरही आले आहे. नियोजित वेळेमध्ये परीक्षेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करू शकलो नाही यासाठी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे यात कंपनीने म्हटले आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी डॅशबोर्ड तयार करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे आरोग्यमंत्र राजेश टोपे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. डॅशबोर्डवर ताब्यात घेतलेली परीक्षा केंद्रे, परीक्षा केंद्राच्या पाहणीची स्थिती, विद्यार्थ्यांंचे ओळख पत्र याची तयारी कितपत झाली आहे याची जिल्हानिहाय माहिती रोज अद्ययावत स्वरुपात आरोग्य विभागाला पाहता यावी अशी सुविधा उपलब्ध करावी, असे कंपनीला आदेश दिलेले आहेत. कंपनीचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून आता ऐनवेळी त्यांच्याकडून काम काढून दुसऱ्या कंपनीला दिल्यास परीक्षेला आणखी वेळ होण्याची शक्यता आहे. तरी परीक्षा आयोजनाचे कामकाज कोणत्या कंपनीला द्यावे याचे अधिकार महाआयटीकडे असल्यामुळे याबाबतचा निर्णय तेच घेतील, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

The post परीक्षेसंबंधी सर्व बाबी अद्ययावत करण्याच्या सूचना appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3F7FoyK

Comments