‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार- २०२१’
मुंबई : विविध क्षेत्रांत अद्वितीयकाम करणाऱ्या ‘दुर्गां’ची माहिती ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’साठी पाठवण्याचा आज, (रविवार २६ सप्टेंबर) शेवटचा दिवस आहे. राज्यभरातून वाचकांकडून अशा कर्तबगार स्त्रियांची माहिती नामांकन स्वरूपात प्राप्त होत असून आज संध्याकाळपर्यंत प्राप्त होणाऱ्या नामांकनांचाच पुरस्कारासाठी विचार के ला जाणार आहे.
आपल्या कामात समाजाभिमुख दृष्टिकोन बाळगून इतर स्त्रियांच्याही प्रगतीसाठी प्रयत्नशील असलेल्या नऊ ‘दुर्गां’चा ‘लोकसत्ता’तर्फे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गौरव केला जातो. सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्र, संशोधन, शिक्षण, कला-मनोरंजन, माहिती-तंत्रज्ञान, उद्योग, क्रीडा, पर्यावरण संरक्षण अशा कोणत्याही क्षेत्रात भरीव कामगिरी के लेल्या, प्रतिकू ल परिस्थितीचा सामना करत आपल्या क्षेत्रात उच्चपदी पोहोचलेल्या, आगळ्यावेगळ्या किंवा पुरुषप्रधान क्षेत्रांमध्ये ठसा उमटवलेल्या प्रेरणादायी स्त्रियांचा विचार या पुरस्कारासाठी के ला जातो. त्यासाठी अशा कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती ‘लोकसत्ता’कडे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते.
यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा-२०२१’मध्ये आज संध्याकाळपर्यंत पाठवल्या जाणाऱ्या नामांकनांमधून तज्ज्ञ परीक्षकांतर्फे नऊ स्त्रियांची पुरस्कारासाठी निवड के ली जाणार आहे. नवरात्रातील नऊ दिवस दररोज त्यांच्या कार्याचा परिचय ‘लोकसत्ता’मध्ये दिला जाईल. त्यानंतर होणाऱ्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या दुर्गांचा गौरव केला जाणार आहे. गेली सात वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमातील ६३ ‘दुर्गां’ची माहिती एकत्रितपणे नुकतीच कॉफी टेबल बुकच्या स्वरूपातही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
माहिती कुठे पाठवाल?दुर्गांविषयीची माहिती आज संध्याकाळपर्यंत loksattanavdurga@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवता येईल. ई-मेलमध्ये ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’साठी असा ठळक उल्लेख करावा. पुरस्कारप्राप्त दुर्गांची माहिती ‘लोकसत्ता’मध्ये थेट ७ ऑक्टोबरपासून प्रसिद्ध होईल. याविषयी कोणताही पत्रव्यवहार किं वा संपर्क के ला जाणार नाही याची कृपया
नोंद घ्यावी.
पुरस्काराविषयी…‘दुर्गां’ची माहिती पाठवण्यासाठी आज शेवटचा दिवस. माहितीबरोबर त्या कर्तृत्ववान स्त्रीचे छायाचित्र, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी पाठवणे आवश्यक. आलेल्या माहितीमधून परीक्षक समिती नऊ दुर्गांची निवड करेल आणि ती अंतिम असेल. नवरात्रीत नऊ दिवस दररोज यातील एका दुर्गेची ‘लोकसत्ता’तून ओळख करून दिली जाईल. त्यानंतर होणाऱ्या एका दिमाखदार सोहळ्यात नामवंतांच्या हस्ते नवदुर्गांचा सन्मान केला जाईल.
हे महत्त्वाचे… सामाजिक कार्य, वैद्यक क्षेत्र, संशोधन, शिक्षण, कला-मनोरंजन, माहिती-तंत्रज्ञान, उद्योग, क्रीडा, पर्यावरण संरक्षण आदी विविध क्षेत्रांतील ‘दुर्गां’ची माहिती आपण पुरस्कारासाठी पाठवू शकता. ही माहिती आज संध्याकाळपर्यंत पाचशे शब्दांत, केवळ मराठीतच आणि नोंदी स्वरूपातच पाठवावी. या स्त्रियांचे काम प्रेरणादायी, विधायक, समाजावर सकारात्मक परिणाम करणारे आणि त्या त्या क्षेत्रात उच्च स्थानी पोहोचलेले असावे.
प्रायोजक
’मुख्य प्रायोजक : ग्रॅव्हिटस फाऊंडेशन
’सहप्रायोजक : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)
’पॉवर्ड बाय : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजीनगर, पुणे राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायजर्स लि., (आरसीएफ)
The post माहिती पाठवण्यासाठी आज शेवटचा दिवस appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/2XMRNqH

Comments
Post a Comment