वसई: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भाईंदर खाडीवरील वर्सोवा पूल दुरुस्तीचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कामासाठी हा पूल रविवार २६ ते मंगळवार २८ सप्टेंबर असे तीन दिवस बंद ठेवण्यात येणार होता. मात्र दुरूस्तीचे काम पुढे ढकलण्यात आल्याने आता हा पूल वाहतुकीसाठी नियमित सुरू राहणार आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भाईंदर खाडीवरील जुना वर्सोवा पूल आहे. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी २६ ते २८ सप्टेंबर असे तीन दिवस बंद करण्यात येणार होता. या काळात पुलावर एकच मार्गिका खुली ठेवून अवजड वाहनांना प्रवेशाला बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार होती. मात्र ठाणे शहरातील रस्त्यांवर मोठया प्रमाणात खड्डे झाल्याने व वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. दुरूस्तीचे काम हाती घेतल्यास वाहतूक कोंडीत अधिक भर पडेल त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीचे काम पुढे ढकलण्यात यावे अशी विनंती ठाणे शहर वाहतूक विभागाने केली होती. ही अडचण लक्षात घेता आय.आर.बी. सुरत यांनी वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम ८ ते १० दिवस पुढे ढकलली आहे.
The post वर्सोवा पूल दुरुस्तीचे काम लांबणीवर appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3i9XK8q

Comments
Post a Comment