Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

अर्धवातानुकूलितचा आग्रह!

सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणीचे तीन डबे वातानुकूलित करण्यावर भर मुंबई: वातानुकूलित लोकल गाडीला मिळणाऱ्या कमी प्रतिसादामुळे अर्धवातानुकूलित लोकल चालवण्याचाही विचार पुन्हा पुढे येत आहे. वातानुकूलित लोकलमुळे सामान्य प्रवासी प्रवास करू शकत नाही. शिवाय प्रवासी संख्याही कमी होते. त्यामुळे सामान्य लोकलमधील बारा डब्यांपैकी तीन किंवा सहा डबेच वातानुकूलित करून अर्धवातानुकूलित लोकल चालवण्यासाठी आग्रही असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी दिली. यात प्रथम श्रेणीचे तीन डबे मात्र वातानुकूलित करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षांपासून अर्धवातानुकूलित लोकल चालवण्याचाही पर्याय समोर आला. कंसल यांनी याविषयी माहिती देताना सध्या धावत असलेल्या १२ डबा सामान्य लोकलमधील तीन डबे प्रथम श्रेणीचे, तर १५ डबा लोकलमध्ये पाच ते सहा डबे प्रथम श्रेणीचे आहेत. उर्वरित डबे द्वितीय श्रेणी, मालवाहतूक, दिव्यांगासांठी आहेत. सामान्य लोकलमधून जास्तीत जास्त प्रवासी प्रवास करतात आणि ही लोकल प्रवाशांना फायदेशीरही ठरते.

गृहप्रकल्पांचा मार्ग मोकळा

सागरीहद्द नियमन आता ५० मीटरपर्यंतच; पुनर्विकासाला वेग फ्लेमिंगो  अभयारण्य निर्बंधाबाबत  १५ दिवसांत निर्णय? मुंबई : मुंबई आणि उपनगरासाठी असलेल्या सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिल्यामुळे आता मुंबईसह राज्यात सागरी हद्द नियमन भरतीरेषेपासून फक्त ५० मीटरवरच लागू होणार आहे. त्यामुळे असंख्य जुन्या इमारती, कोकण किनारपट्टीवरील जुनी घरे, काही प्रकल्पांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. मुंबई आणि उपनगरासह संपूर्ण राज्यासाठी २०११ मधील सागरी हद्द नियमन कायदा लागू होता. त्यामुळे भरतीरेषेपासून ५०० मीटरपर्यंत कुठल्याही बांधकामास परवानगी नव्हती. मुंबईसारख्या शहरात जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात या नियमनाचा अडथळा येत होता. या नियमानुसार पुनर्विकासासाठी १.३३ इतकेच चटईक्षेत्रफळ शहरात तर उपनगरात फक्त एक इतके चटईक्षेत्रफळ उपलब्ध होत होते. त्यामुळे इमारतींचा पुनर्विकासच होऊ शकत नव्हता. याचा सर्वाधिक फटका खासगी इमारतींसह म्हाडाच्या वसाहतींना बसला होता. ही मर्यादा ५० मीटरपर्यंत मर्यादित करावी अशी जुनी मागणी होती. ती मान्य होऊन अमलात येणार असल्यामुळे आता शहरात तीन तर

‘केईएम’मधील २९ विद्यार्थ्यांना करोना

दोन्ही लसमात्रांनंतरही संसर्ग; वसतिगृहांतील ९०० जणांच्या चाचण्या मुंबई : केईएम रुग्णालयात वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणारे २९ विद्यार्थी करोनाबाधित झाल्याचे समोर आले. या सर्व विद्यार्थ्यांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही त्यांना संसर्ग झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून रुग्णालयातील ९०० विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. बाधितांमधील एक विद्यार्थी मुंबईत राहणारा असून अन्य विद्यार्थी रुग्णालयाच्या वसतिगृहांत राहत असल्यामुळे चिंता अधिक आहे.  रुग्णालयात शिकणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. बहुतांश विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. एका विद्याथ्र्यात  लक्षणे आढळल्यामुळे त्याला मरोळच्या ‘सेव्हन हिल्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात शिकणारे एकूण ९०० विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी एकत्र येतात. तसेच हे सर्व विद्यार्थी केईएमच्या विविध ठिकाणी असलेल्या सहा वसतिगृहांमध्ये राहतात. यातील तीन वसतिगृहांमध्ये बाधित आढळले आहेत. त्यामुळे सतर्कता म्हणून उर्वरित विद्यार्थ्यांचीही चाचणी करण्यास सुरुवात केली असल्याचे केईएमचे

नवी मुंबई ते डोंबिवली केवळ १५ मिनिटांत

ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाच्या पहिल्या टप्प्याची २०२३ पर्यंत पूर्तता मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, नवी मुंबई आणि डोंबिवली अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) १२.३० किमीच्या  ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाचे काम हाती घेतले आहे. ऐरोली ते डोंबिवलीमधील अंतर थेट १० किमीने कमी करणाऱ्या या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात करण्यात येत आहे.    सध्या काम वेगात सुरू असून पहिल्या टप्प्यातील संपूर्ण काम (भुयारी मार्गासह) मार्च २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. तर दुसरा टप्पा डिसेंबर २०२२ ला पूर्ण होणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे. हे दोन्ही टप्पे पूर्ण झाले तरी ऐरोली ते काटई असा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यास आणि यावरून नवी मुंबई ते डोंबिवली प्रवास केवळ १५ मिनिटांत पार करण्यास काहीशी प्रतीक्षा करावी लागणार असून तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू झालेले नाही. आज घडीला नवी मुंबईहून डोंबिवलीला जाण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. शिळफाटा आणि महापे रोडला वळसा घालून जावे लागते. यादरम्यान प्रचंड वाहतूक कोंडीलाही सामोरे ज

आरेतील मानव-प्राणी संघर्ष गंभीर

महिन्याभरात बिबट्याचे ५ हल्ले मुंबई : बिबट्याचा अधिवास असलेल्या आरे दुग्ध वसाहतीच्या परिसरातील जंगल आक्रसल्याने या भागात बिबट्या आणि मानव संघर्ष वाढू लागल्याचे दिसत आहे. गेल्या महिन्याभरात बिबट्याने येथील पाच रहिवाशांवर हल्ले केले असून बुधवारीही एका ज्येष्ठ नागरिक महिलेवर बिबट्याने हल्ला केला.  आरेतील विसावा इमारतीच्या जवळ असणाऱ्या वसाहतीतील ६९ वर्षीय रहिवासी निर्मला सिंह बुधवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास घराच्या बाहेरील कठड्यावर बसल्या असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर मिळालेल्या सीसीटीव्ही दृश्यांनुसार हा बिबट्या हल्ल्याच्या काही वेळ आधीपासूनच या परिसरात वावरत होता. निर्मला यांनी दार उघडताच तो जवळच असलेल्या ड्रमच्या बाजूला लपला. त्या बेसावध असताना दबक्या पावलांनी येत बिबट्याने त्यांच्या उजव्या बाजूने हल्ला चढवला. बिबट्याची चाहूल लागताच निर्मला यांचेही त्याच्याकडे लक्ष गेले व त्यांनी प्रतिकार केला. त्यांच्या हातातील काठी तोंडावर लागल्याने तो दूर गेला. निर्मला यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत येत असल्याचे पाहून बिबट्या जवळच्या रानात जाऊन पुन्हा लपला. निर्मला यां

मुख्य सचिव कुंटे, पोलीस महासंचालक पांडे यांना ‘सीबीआय’चे समन्स

अनिल देशमुख कथित भ्रष्टाचार प्रकरण मुंबई: अनिल देशमुख कथित भ्रष्टाचार प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व पोलीस महासंचालक संजय पांडे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने समन्स बजावले आहे. याप्रकरणी साक्षीदार म्हणून त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. याप्रकरणात अधिक माहिती घेण्यासाठी दोघांनाही बोलवण्यात आल्याचे समजतेय.  संजय पांडे आणि सीताराम कुंटे यांनी सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिला आहे. यापूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या अधिकाऱ्यांनी सीबीआयसोबत चर्चा केली होती. त्यामुळे सीबीआयला जबाब नोंदवायचा असल्यास कार्यालयात येण्याची विनंती दोन्ही अधिकाऱ्यांनी केली आहे. सीबीआयने एप्रिल महिन्यात याप्रकरणी विविध कायद्यांनुसार अंतर्गत अनिल देशमुख  आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता.  सरकारी पदावर असताना त्याचा गैरवापर केल्याचा ठपका एफआयआरमध्ये ठेवण्यात आला आहे. सीबीआयचे  नवी दिल्लीतील उपअधिक्षक आर.एस.गुंजीयाल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.  तक्रारीनुसार, सरकारी पदावर असताना त्याचा गैरवापर झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दा

राज्यात सप्टेंबरमध्ये केवळ ९६,७४० घरांची विक्री

जुलै-ऑगस्टच्या तुलनेत मोठी घट, मुंबईत मात्र काहीशी वाढ मुंबई : जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेने राज्यातील सप्टेंबरच्या घरविक्रीत मोठी घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये राज्यात ९६ हजार ७४० घरांची विक्री झाली असून यातून राज्य सरकारला १ हजार ६२३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मुंबईतील घरविक्री मात्र ऑगस्टच्या तुलनेत काहीशी वाढली आहे. सप्टेंबरमध्ये मुंबईत ७ हजार ७१६ घरे विकली गेली असून यातून ५२४ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने मिळाला आहे. करोनाचे संकट अजूनही कायम असले तरी आता बांधकाम क्षेत्रातील आणि मालमत्ता बाजारपेठेतील व्यवहार हळूहळू सुरळीत होऊ लागले आहेत. नवीन प्रकल्प सुरू होत असून चालू प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढविण्याकडे विकासकांचा कल आहे. या पाश्र्वभूमीवर घरविक्री आणि महसुलात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना मागील तीन महिन्यांपासून घरविक्री घटत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबरमध्ये घरविक्री घटली आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कागदपत्रानुसार संपूर्ण सप्टेंबर महिन्यात ९६ हजार ७१६ घरे विकली गेली असून यातून १ हजार ७२३ कोटींचा महसूल मिळाला आहे. जुलै महिन्यातील घरविक्र

निवासी डॉक्टर आजपासून संपावर

राज्यातील रुग्णव्यवस्था कोलमडण्याची भीती मुंबई: शैक्षणिक शुल्क माफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही अनेक महिने उलटले तरी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने अद्याप कार्यवाही न केल्यामुळे संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने अखेर आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्व निवासी डॉक्टर संपावर जाणार असल्यामुळे रुग्णव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. निवासी डॉक्टर गेले जवळपास दीड वर्ष करोना सेवेमध्ये असल्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकविलेला नाही. तेव्हा शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी मार्डतर्फे गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत दोन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत मंत्री अमित देशमुख यांनीही या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतरही यावर ठोस कार्यवाही विभागाने केलेली नाही. त्यामुळे अखेर मार्डने शुक्रवारपासून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संपावर जाण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापा

नव्याने येणाऱ्या बसगाड्यांना आगप्रतिबंधक साधने अनिवार्य

मुंबई : देशभरात प्रवासादरम्यान खासगी किंवा सार्वजनिक बसगाड्यांना आग लागल्याने जीवितहानीबरोबरच वित्तहानीही बऱ्याच वेळा झाली आहे. अनेक घटनांमध्ये आगप्रतिबंधक साधने नसल्याने आगीवर नियंत्रणही मिळविता आले नाही. मात्र यापुढे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार असून नव्याने येणाऱ्या सर्व बसगाड्यांमध्ये आगप्रतिबंधक साधने बंधनकारक असून तशी प्रारूप अधिसूचना भूषृष्ठ वाहतूक मंत्रालयाने काढली आहे. ही यंत्रणा १ एप्रिल २०२२ पासून किंवा त्यानंतर नव्याने येणाऱ्या बसगाड्यांसाठी असेल. बसमधील प्रवासादरम्यान आग लागणे किंवा धूर येण्याच्या घटना घडतात. या प्रकारात अनेकदा प्रवाशांनाही इजा होते. मात्र, आगप्रतिबंधक साधने नसल्याने धोका अधिक वाढतो. आपत्कालीन परिस्थितीत बसमधून बाहेर येण्यासाठी दोन ते तीन मिनिटांचा अवधी लागतो. या सगळ्या पाश्र्वभूमीवर मंत्रालयाने काढलेल्या प्रारूप अधिसूचनेत आग लागताच भोंगा (अलार्म) वाजणारी यंत्रणा बसविण्याची सूचना केली आहे. आग विझवणारी पाणी किंवा रासायनिक प्रक्रिया यंत्रणा बसवण्याचाही सूचनेत समावेश आहे. ही यंत्रणा सध्याच्या काही बसमधील पुढील भागात असते. आता टाइप तीन प्रकारांतील बसगाड्य

३५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान

राज्यातील २२ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका  मुंबई/औरंगाबाद : राज्यात गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीमुळे २२ जिल्ह्यांतील सुमारे ३५ ते ४० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि खान्देशला बसला. हातातोंडाशी आलेली पिके  वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शेतीला बसल्याने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत देण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.   गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद तसेच जळगाव, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांत अजूनही पूरपरिस्थिती कायम असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावांत अजूनही यंत्रणा पोहोचलेली नाही. एकट्या मराठवाड्यात २५ लोकांना प्राण गमवावा लागला असून, अडीच हजार घरांचे तर ३५ लाख ६४ हजार शेतकऱ्यांचे  सुमारे २६-३० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच चार हजार ३०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे नुकसान झाले असून, १२०० पूल पाहून गेले आहेत. पुरामुळे ११० गावांचा संपर्क तुटला असून १०-२० गावांना पुराचा वेढा पडल

कर परताव्याच्या नावाखाली ४५ कोटींची फसवणूक

|| अनिश पाटील मुंबई : प्रत्यक्षात खरेदी-विक्रीचा कोणताही व्यवहार न करता ४५ कोटींचा कर गैरव्यवहार केल्याप्रकरणी केंद्रीय वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने गिरगाव येथील एका व्यावसायिकाला अटक केली आहे. आरोपींकडून मिळालेल्या बोगस पावत्यांच्या सहाय्याने ४५ कोटींची कर सवलत देभरातील कंपन्यांनी मिळवल्याचा संशय आहे. याप्रकरणात आरोपीने सात कंपन्यांचा वापर केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. आरोपी व्यावसायिक भगवानराम बिष्णोई हे गिरगाव कुंभारवाडा येथील ब्राऊन इंटरप्रायजेस कंपनीचे मालक आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारावर ब्राऊन इंटरप्रायजेस व इतर कंपन्यांच्या व्यवहारांवर जीएसटी विभाग लक्ष ठेऊन होता. याप्रकरणी शोधमोहिमही राबवण्यात आली होती. त्यात ब्राऊन इंटरप्राईजेस , आदित्य ओव्हरसीज, जॉली इंटरप्राईजेस, ब्राऊन ट्र्रेंडग व रॉयल इम्पेक्स या कंपन्या एकमेकांना केवळ खरेदी-विक्रीच्या पावत्या देत असून प्रत्यक्षात कोणत्याही वस्तूची देवाण-घेवाण होत नसल्याचे जीएसटीच्या तपासणीत निष्पन्न झाले. त्याच्या माध्यमातून व्यवहार दाखवून करात सवलत मिळवली जाते. देशभरातील अनेक कंपन्यांसोबत या कंपन्यांचे कागदोपत्री व्यवहार

सिकल सेलग्रस्त मातांना करोनाचा धोका अधिक

|| शैलजा तिवले मुंबई : सिकल सेलग्रस्त मातांना करोनाचा धोका अधिक असून या मातांमध्ये तुलनेने मृत्यूचे प्रमाणही अधिक असल्याचे राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ संशोधन संस्था (एनआयआरआरएच) आणि वैद्यकीय संशोधन आणि शिक्षण संचालनालयाने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. हा अभ्यास नुकताच ‘इंडियन जे हिमॅटोल ब्लड ट्रान्सफ्युझ’ या वैद्यकीय संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला. सिकल सेल हा लाल रक्तपेशींच्या गुणसूत्राशी निगडित अनुवंशिक आजार असून राज्यात विदर्भ, मराठवाड्यात प्रामुख्याने आढळतो. जनुकीय दोषामुळे रक्ताच्या पेशींमधील हिमोग्लोबीनमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे हा आजार होतो. इतर मातांच्या तुलनेत सिकल सेलग्रस्त मातांमध्ये लक्षणे असण्याचे प्रमाण अधिक आढळले असून यामध्ये तापासह सर्दी, अतिसार आणि अंगदुखी ही लक्षणे प्रामुख्याने दिसून आली. प्रसूतीदरम्यान गुंतागुंत होण्याचे प्रमाणही इतर मातांच्या तुलनेत सिकल सेलग्रस्त मातांमध्ये अधिक आढळले आहे. प्रसूती काळातील उच्च रक्तदाबाचे प्रमाणही या मातांमध्ये तुलनेने अधिक आहे. इतर मातांमध्ये नियोजित वेळेआधीच प्रसूती होण्याचे प्रमाण सुमारे ४ टक्के होते, तर सिकल सेल ग्रस्त माता

सागरीहद्द नियमन आता ५० मीटरपर्यंतच!

मुंबईसह राज्यातील हजारो इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा मुंबई : मुंबई आणि उपनगरासाठी असलेल्या सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिल्यामुळे आता मुंबईसह राज्यात सागरी हद्द नियमन भरतीरेषेपासून फक्त ५० मीटरवरच लागू होणार आहे. त्यामुळे असंख्य जुन्या इमारती, कोकण किनारपट्टीवरील जुनी घरे, काही प्रकल्पांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. गेले दोन वर्षांपासून याबाबतचा निर्णय रखडला होता. मुंबई आणि उपनगरासह संपूर्ण राज्यासाठी २०११ मधील सागरी हद्द नियमन कायदा लागू होता. त्यामुळे भरतीरेषेपासून ५०० मीटरपर्यंत कुठल्याही बांधकामास परवानगी नव्हती. मुंबईसारख्या शहरात जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात या नियमनाचा अडथळा येत होता. या नियमानुसार पुनर्विकासासाठी १.३३ इतकेच चटईक्षेत्रफळ शहरात तर उपनगरात फक्त एक इतके चटईक्षेत्रफळ उपलब्ध होत होते. त्यामुळे इमारतींचा पुनर्विकासच होऊ शकत नव्हता. याचा सर्वाधिक फटका खासगी इमारतींसह म्हाडाच्या वसाहतींना बसला होता. ही मर्यादा ५० मीटरपर्यंत मर्यादित करावी अशी जुनी मागणी होती. ती मान्य होऊन अमलात येणार असल्यामुळे आता शहरात तीन

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा !

शेतकऱ्यांना मदतीची काँग्रेसची मागणी मुंबई : मराठवाड्यासह राज्यातील इतर भागांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी के ली आहे मे महिन्यात  तौक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला होता. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचा हवाई पाहणी दौरा केला आणि बैठक घेऊन गुजरातला एक हजार कोटी रुपयांची मदतही जाहीर केली. शेजारच्या महाराष्ट्रातही तौक्ते चक्रीवादळाने मोठे नुकसान केले असताना देशाच्या पंतप्रधानांनी त्याची दखलही घेतली नाही. त्यानंतरही राज्याने केंद्राकडे मदत मागितली; परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसण्यात आली. भाजप नेत्यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पटोले यांनी के ले. पंचनामे पूर्ण होताच  मदतीचा निर्णय : वडेट्टीवार  नागपूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या

पंतप्रधान आवास योजनेसाठी म्हाडा, एसआरएची गुंतवणूक

६०० कोटींचा निधी उभारण्याचा निर्णय मुंबई : राज्यात आर्थिक दुर्बल घटक व मध्यमवर्गीयांसाठी परवाडणारी घरे बांधण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेला गती देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए) आणि शिवशाही पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून निधी उभारण्यात येणार आहे. त्यानुसार या तिन्ही संस्था प्रत्येकी २०० कोटी रुपये याप्रमाणे ६०० कोटी रुपयांची महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळात गुंतवणूक करतील. राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने २०१५ मध्ये प्रत्येकाला हक्काचे घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. राज्यात ही योजना सुरू करण्यात आली असून, २०२२ पर्यंत १९ लाख ४० हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चिात करण्यात आले आहे. या योजेनाला गती देण्यासाठी व मोठ्या घरकु ल वसाहती उभारण्यासाठी २०१८ मध्ये राज्य शासनाने महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. या महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री व अतिरिक्त अध्यक्ष गृहनिर्माणमंत्री आहेत. या महामंडळामार्फत २०२२ पर्यंत न

आणखी एका संशयिताला ‘एटीएस’कडून अटक

दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप मुंबई : दहशतवादी कट रचल्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) ५० वर्षीय व्यक्तीला गुरुवारी अटक केली. आरोपी वांद्रे पूर्व परिसरातील रहिवासी असून न्यायालयाने आरोपीला ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.    मोहम्मद इरफान रेहमत अली शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. यापूर्वी या प्रकरणात झाकीर हुसेन शेख व रिझवान इब्राहिम मोमीन या दोघांना एटीएसने अटक केली होती. या कटात सहभागी इतर संशयितांच्या तो संपर्कात होता. शेख हा कपडे शिलाईचे काम करत असून वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात पत्नी व चार मुलांसोबत राहतो. तो झाकीर शेखचा निकटवर्तीय आहे. देशात घातपाती कारवायांच्या तयारीत असलेला पाकिस्तानातील अ‍ॅन्थोनी ऊर्फ अनस ऊर्फ अन्वर याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून झाकीर हुसेन शेख(५२) बेकादेशीर कृत्ये (प्रतिबंधक)अधिनियम, १९६७ अंतर्गत गुन्हा दाखल करून सर्वप्रथम एटीएसने अटक केली होती. याप्रकरणी झाकीरच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रिझवानला अटक केली. त्याच्या मुंब्रा येथील घरी एटीएसने घेतलेल्या झडतीत संशयित दस्तऐवज सापडले असून ते जप्त करण्यात आले

करोनाशी लढलो त्याच ईर्षेने स्वच्छतेसाठी लढा

मुख्यमंत्री ठाकरे यांचे सरपंचांना आवाहन मुंबई : करोनाशी आपण ज्या जिद्दीने लढलो आणि त्याचे चांगले परिणाम समोर आले. त्याच ईर्षेने स्वच्छ महाराष्ट्र घडविण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील सर्व सरपंचांना केले. गेल्या दोन वर्षांपासून करोनासह अनेक नैसर्गिक आपत्तींना समर्थपणे तोंड देत आहोत. परंतु अजिबात डगमगू नका, खचून जाऊ नका. सरकार खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी जनतेला दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानअंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ‘सरपंच – पाणी व स्वच्छता संवाद’ उपक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील २७ हजार ८३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून संवाद साधला.  देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना स्वच्छता हेच अमृत हा नवा मंत्र आहे हे ध्यानात ठेवून काम करा. वैयक्तिक स्वच्छता असेल तर रोगराईला वाव मिळणार नाही. त्यामुळे आपले आयुष्यमान वाढल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छतेच्या माध्यमातून

‘ईडी’च्या कारवाईविरोधात अडसूळ उच्च न्यायालयात

मुंबई : सिटी सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या समन्सविरोधात माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच कठोर कारवाईपासून तातडीचा दिलासा देण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी ठेवत त्यांना तोपर्यंत तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला. न्यायालयाने अडसूळ यांचे वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेशही यावेळी दिले. ईडीने अडसूळ यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. तसेच  त्यांचे कांदिवली येथील घर व कार्यालयाची झडतीही घेतली होती. दरम्यान अडसूळ यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता अडसूळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेत कारवाईपासून संरक्षण देण्याची तसेच ईडीने नोंदवलेली तक्रार रद्द करण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी या याचिकेवर तातडीने सुनावणी झाली. प्रतिपक्षाच्या नेत्याविरोधात जातपडताळणी प्रमाणपत्राबाबतची तक्रार केल्याने आपल्याला या प्रकरणी गोवण्यात आल्याचा दावा अडसूळ यांच्यात

आयोगाकडे माहिती पाठविण्याची मुदत हुकली

मुंबई : ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) सरळ सेवा भरतीसाठी रिक्त पदांची माहिती देण्याच्या मुदतीत सर्व खात्यांकडून माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे प्राप्त झाली नाही. परिणामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निश्चित केलेली मुदत हुकली.  राज्य सरकारमधील ११,३५१ पदे लोकसेवा आयोगामार्फ त भरली जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. विभागांकडून माहिती जमा होण्यास विलंब झाल्याबद्दल नापसंती व्यक्त करीत निश्चित केलेल्या मुदतीत ३० तारखेपर्यंत माहिती सादर झालीच पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावले होते. सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव सर्व विभागांशी समन्वय साधून माहिती मागवीत आहेत. एरवी प्रत्येक विभाग बिंदुनामावलीनुसार त्याच्याकडील रिक्त पदांचा आढावा घेऊन भरतीचे मागणीपत्र परस्पर लोकसेवा आयोगाला पाठवत असते. परंतु पुण्याच्या स्वप्निल लोणकर या तरुणाने एमपीएससीच्या भरती प्रक्रि येला विलंब होत असल्याने निराशेच्या भरात आत्महत्या केल्याने लोकसेवा भरतीचे प्रकरण तापले. ऐन अधिवेशन काळातच हा प्रकार झाल्याने हा विषय चांगलाच तापला.  अनेक विभाग

आरोग्य विभागाची परीक्षा वादग्रस्त ‘न्यासा’कडूनच

मुंबई : आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या पदभरतीकरिता अनुक्रमे २४ व ३१ ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा आधी घोळ घातलेल्या वादग्रस्त कंपनीकडूनच घेतली जाणार आहे. राज्य सरकारने ‘न्यासा’ या कंपनीला काळ्या यादीत टाकलेले नसल्याने त्यांच्यामार्फतच परीक्षेची प्रक्रिया पार पाडली जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. तसेच परीक्षेसाठी महसूल व पोलीस विभागांची मदत घेतली जाणार आहे. कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य विभागाची पदभरतीसाठीची परीक्षा ऐन वेळी पुढे ढकलावी लागल्याने सुमारे आठ लाखांहून अधिक उमेदवारांनी रोष व्यक्त केला होता व राज्य सरकारवर टीका झाली होती. त्याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच आरोग्यमंत्री टोपे, विभागाचे अधिकारी, महा आयटी व अन्य संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांना परीक्षा प्रक्रियेबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. कंपनीला आवश्यक सर्व सूचना देण्यात आल्या असून त्याचे पालन होत आहे की नाही आणि गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांबरोबरच पोलीस व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांकडूनही प्रक्रियेवर देखरे

सीए डिसेंबर परीक्षांच्या नोंदणीसंदर्भात महत्वाची अपडेट

CA December 2021: फाऊंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल कोर्सेससाठी सीए डिसेंबर २०२१ परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. ३० सप्टेंबर २०२१ या अभ्यासक्रमांच्या डिसेंबर २०२१ परीक्षेसाठी नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) डिसेंबर २०२१ च्या सीए परीक्षांसाठी अर्ज भरण्याची अर्ज विंडो बंद करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत परीक्षा फॉर्म भरला असेल ते CA परीक्षा पोर्टल icaiexam.icai.org वर जाऊन अर्ज करू शकतात. असे असले तरीही विद्यार्थ्यांनी ६०० रुपयांच्या विलंब शुल्कासह ३ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येऊ शकेल. नोंदणी प्रक्रिया आणि फी सीए डिसेंबर २०२१ च्या परीक्षेला बसू इच्छिणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. अर्ज करताना उमेदवारांना आयसीएआयने अंतिम (जुने आणि नवीन), इंटरमीडिएट (आयपीसीसी), इंटरमीडिएट आणि फाउंडेशन अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी शुल्क भरावे लागेल. भारतीय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क १५०० ते २७०० रुपयांपर्यंत आहे. उमेदवा

शाळांची घंटा सोमवारपासून वाजणार; पालकांचे संमतीपत्र बंधनकारक

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिका आयुक्तांनी () करोनाच्या नियमांचे पालन करत शहरातील इयत्ता आठवी ते बारावीच्या सर्व मंडळाच्या सर्व शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास (maharashtra ) बुधवारी परवानगी दिली. त्यामुळे आता तब्बल दीड वर्षांनंतर मुंबईतही ४ ऑक्टोबरला शाळेची घंटा वाजणार आहे. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती बंधनकारक असणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते आठवी आणि शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला. मात्र, मुंबईतील शाळांसंदर्भातील निर्णय पालिका घेणार होती. त्यानुसार बुधवारी पालिका आयुक्तांनी शहरातील सर्व माध्यमांचे इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, शाळा सुरू करताना राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे सर्व शाळांना बंधनकारक असणार आहे. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी शाळा प्रशासनाने आवश्यकतेनुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवावे. शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर

परमबीर सिंग अटकेपासून वाचण्यासाठी देश सोडून फरार?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार झाले असावेत असा संशय तपास यंत्रणांना आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ऑगस्ट महिन्यात अनेकदा समन्स बजावूनही परमबीर सिंग यांचा कुठेही पत्ता नाही. यामुळे परमबीर सिंग अटकेच्या भीतीपोटी देश सोडून फरार झाले असावेत असा संशय एनआयए आणि राज्य सरकारला आहे. एनआयएने अँटिलिया स्फोटकं तसंच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंग यांना समन्स बजावलं होतं. सचिन वाझेच्या अटकेनंतर एप्रिल महिन्यात एनआयएने सर्वात प्रथम परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला होता. सचिन वाझेवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईसंबंधी माहिती घेण्यासाठी हा जबाब नोंदवण्यात आला होता. प्रकरण उजेडात आलं होतं तेव्हा सचिन वाझे थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होते. एनआयएने नुकतंच दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंग यांचाही सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा उल्लेख आहे. एनआयएच्या सूत्रांनुसार, ऑगस्टमध्ये परमबीर सिंग यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं होतं, मात्र त्यांनी उत्तर दिलं नाही. अधिकारी हरियाणात चंदीगड आणि रोहतकमधील त्यांच्या निवासस्थानीदेखील गेले होते, पण ते सापडले नाहीत

चार वर्षाच्या भाच्यावर हल्ला करत बिबट्याने ओढत नेलं; मामानेही मागोमाग जंगलात घेतली धाव अन्…

मुंबईतील आरे कॉलनीत २५ वर्षीय तरुणाने बिबट्याच्या मागे जंगलात धाव घेत आपल्या भाच्याची अक्षरश: मृत्यूच्या पंजातून त्याची सुटका करत जीव वाचवला आहे. २६ सप्टेंबरला संध्याकाळी आयुष घराच्या अंगणात खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. सुदैवाने यावेळी आयुषचा मामा विनोद कुमार तिथेच होता. त्याने तात्काळ बिबट्याच्या मागे धाव घेत आयुषला वाचवलं. “मी दरवाजात उभा असताना बिबट्याने आयुषवर हल्ला केल्याचं पाहिलं. आयुषची मान पकडून बिबट्या जंगलाच्या दिशेने धावत होता. हे पाहिल्यानंतर यानंतर मी आरडाओरडा करत बिबट्याच्या मागे धाव घेतली. यानंतर बिबट्याने आयुषचं डोकं पकडलं होतं. पण नंतर त्याची पकड सैल झाली आणि आयुष खाली पडला. मी लगेच त्याच्या दिशेने धाव घेतली आणि आपल्याजवळ ओढून घेतलं,” असं विनोद कुमारने सांगितलं आहे. मुंबई: घराच्या अंगणात दबा धरुन बसला होता बिबट्या, महिला येताच…; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ बिबट्याच्या हल्ल्यात आयुष जखमी झाला असून त्याच्या गळा आणि डोक्यावर टाके पडले आहेत. हल्ल्यानंतर स्थानिक सुर्योदयानंतर घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. आयुषची आई आरती यादव यांनीही आपण घाबरलो असून आपला मुल

मुंबई: घराच्या अंगणात दबा धरुन बसला होता बिबट्या, महिला येताच…; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

मुंबईत एका वयस्कर महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आरे कॉलनीत घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी महिलेने हातात असणाऱ्या काठीने बिबट्याचा प्रतिकार करत आपला जीव वाचवला. अंगावर काटा आणणारा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. व्हिडीओत आरे डेअरी परिसरात हा बिबट्या आल्याचं दिसत आहे. यानंतर काही वेळातच तिथे एक वयस्कर महिला चालत येताना दिसते. नीट चालायला जमत नसल्याने महिलेने काठीचा आधार घेतलेला होता. निर्मला देवी सिंग असं या ५५ वर्षीय महिलेचं नाव असून काही वेळाने त्या तिथे पायरीवर बसतात. यावेळी आपल्या मागे बिबट्या बसला आहे याची त्यांन कल्पनाच नव्हती. काही वेळाने बिबट्या महिलेच्या दिशेने पावलं टाकत येतो आणि काही कळण्याआधीच हल्ला करतो. यावेळी महिला हातातल्या काठीने प्रतिकार करण्यास सुरुवात करते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खाली जमिनीवर पडलेल्या महिलेवर बिबट्या पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र महिलेचा प्रतिकार पाहता काही वेळाने तो तिथून पळ काढतो. *Viewers discretion advised* Scary visuals of a woman being attacked by a leopard in Aarey colony tod

५० पेक्षा जास्त घरांच्या प्रकल्पातील गृहनोंदणी ऑनलाइन

पुढील आठवडय़ापासून प्रारंभ, नवी संगणकीय प्रणाली कार्यान्वित मुंबई : महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील घरांची थेट ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग सज्ज झाला असून २ ऑक्टोबरपासून नवीन संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. विकासकांना ऑनलाइन दस्त जमा नोंदवता येणार आहेत. पुढील आठवडय़ापासून नव्या प्रणालीद्वारे ऑनलाइन नोंदणीस प्रारंभ होणार असून सध्या ५० पेक्षा जास्त घरे असलेल्या गृहप्रकल्पातील घरांची ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे. त्याच वेळी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील कर्मचारी तसेच विकासकांना नव्या प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  पहिल्या टप्प्यात महारेरा नोंदणीकृत मोठय़ा प्रकल्पातील पहिल्या विक्रीतील घरांसाठी ऑनलाइन नोंदणी ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. त्यानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून नवीन संगणकीय प्रणाली विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर साधारणत: वर्षभरापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली होती. यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रणालीत अनेक त्रुटी होत्य

पुणे सामूहिक बलात्कार प्रकरण : तीन आरोपींची जन्मठेप

उच्च न्यायालयाकडून कायम मुंबई : हिंजवडी येथे २०१० मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिघा आरोपींना सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली. मात्र हा निर्णय देताना न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचे पीडित तरुणीच्या उलटतपासणीवेळीचे वर्तन तसेच त्याला आक्षेप न घेता मौन बाळगणाऱ्या सत्र न्यायाधीशांच्या कृतीवर प्रश्न उपस्थित केला. खटल्यादरम्यान पीडित तरुणीच्या सन्मानाचे संरक्षण करण्यात संबंधित सत्र न्यायाधीश अपयशी ठरल्याचे ताशेरे न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने ओढले. आरोपींच्या वकिलांकडून पीडितेला अयोग्य प्रश्न विचारले जात असताना सत्र न्यायाधीशांनी निष्क्रियता दाखवण्याऐवजी हस्तक्षेप करायला हवा होता.  सरकारी वकिलांनाही पीडितेला बचाव पक्षाकडून अयोग्य प्रश्न विचारले जात असताना आक्षेप घ्यावासा वाटला नाही, याबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सुभाष भोसले, गणेश कांबळे आणि रणजित गाडे या तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय मात्र योग्य ठरवला.  The post पुणे सामूहिक बलात्कार प्रकरण : ती

चिपी विमानतळ उद्घाटनासाठी ठाकरे-राणे एकाच मंचावर

मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे दोघेही निमंत्रित असून त्यामुळे ठाकरे-राणे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. के ंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री   ज्योतिरादित्य शिंदे या उद्घाटन समारंभासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत. तर राजशिष्टाचारानुसार  तिसऱ्या क्रमांकावर स्थानिक नेते व केंद्रीय मंत्री या नात्याने नारायण राणे यांचे नाव निमंत्रितांच्या यादीत आहे. भाजप-शिवसेनेतील श्रेयवाद आणि चिपी विमानतळाच्या उद् घाटनासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांना बोलावण्याची गरज नाही या नारायण राणे यांच्या विधानामुळे राजकीय वाद रंगला होता. त्या पाश्र्वभूमीवर ९ ऑक्टोबरला काय होते याबाबत उत्सुकता आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी चिपी विमानतळाच्या तयारीचा आणि कार्यक्रमाचा आढावाही घेतला. केंद्र सरकारचा सहभाग असल्याने राणे यांना निमंत्रित करणे राज्य सरकारला आवश्यकच होते. The post चिपी विमानतळ उद्घाटनासाठी ठाकरे-राणे एकाच मंचावर appeared first on Loksatta .

मुंबईतील शाळाही ४ ऑक्टोबरपासून

पालिका आयुक्तांची मंजुरी; आठवी ते बारावीच्या वर्गाना परवानगी मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांमधील किलबिल पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मुंबईतील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली. मात्र पालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय पालिका आयुक्तांनी घ्यावा असेही राज्य सरकारने म्हटले होते. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने सोमवारी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता. त्याला पालिका आयुक्तांनी बुधवारी मंजुरी दिली. त्यानंतर शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी याबाबतचे परिपत्रक काढले. मुंबईत, राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर टाळेबंदी लागू झाली आणि सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने मार्च २०२० मध्ये घेतला.  स

मुंबईत लष्करी संग्रहालय!

तातडीने जागा निश्चित करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश मुंबई : भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे, शौर्य, पराक्रम, धैर्य आणि संयमाच्या काळातील अनुभूतीची प्रचिती देणारे राज्य युद्ध स्मारक आणि लष्कर संग्रहालय मुंबईत उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयासाठी तातडीने जागा निश्चित करण्याचा आदेश देत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षां निमित्ताने या संग्रहालयाचे काम वेगाने पूर्णत्वाला नेऊन पुढील वर्षी १५ ऑगस्टपर्यंत यातील काही भाग नागरिकांसाठी सुरु करावा अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  व्यक्त केली. वर्षां येथील समितीकक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे,  लेफ्टनंट जनरल एस.के. पराशर, ब्रिगेडियर डॉ. आचलेश शंकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,नगरविकास विभागाचे प्रधानसचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते. हे संग्रहालय कसे असावे, यात कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा हे निश्चित करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांचा सहभाग असलेली एक सल्लागार आणि आराखडा समिती स्थापना करण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. The post मुंबईत लष्करी संग्रहालय! a

शहरातील करोना रुग्णसंख्येत वाढ ; ५२७ नवे रुग्ण, सहा जणांचा मृत्यू

मुंबई : बुधवारी मुंबईत ५२७ नवे करोना रुग्ण आढळले, तर सहा करोनाबाधितांचा मृत्यू झाला. बुधवारी नव्याने सापडलेल्या करोना रुग्णांमुळे बाधितांची एकू ण संख्या ७ लाख ४२ हजार ५३८ झाली आहे. तर ४०५ रुग्ण बरे झाल्याने करोनामुक्त झालेल्यांची संख्या ७ लाख १९ हजार २१८ झाली आहे. सध्या मुंबईत ४ हजार ७२४ उपचाराधीन रुग्ण आहेत. मृत्यू झालेल्यांपैकी तीन रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये तीन पुरुष व तीन महिला होत्या.  ठाणे जिल्ह्यात ३१५ बाधित ठाणे :  ठाणे जिल्ह्य़ात बुधवारी ३१५ करोना रुग्ण आढळून आले. तर, तीन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.  ३१५ करोना रुग्णांपैकी कल्याण-डोंबिवली ९६, ठाणे ७६, नवी मुंबई ५६, मीरा-भाईंदर ३३, ठाणे ग्रामीण २१, बदलापूर १८, अंबरनाथ सात, उल्हासनगर सात आणि भिवंडीमध्ये एक रुग्ण आढळून आला. तर, तीन मृतांपैकी ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात ३,१८७ जणांना संसर्ग राज्यात दिवसभरात ३१८७ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली तर ४९ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ३२५३ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ३६ हजार ६७५ इतकी आहे.

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२६ पर्यंत

मुंबई: अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्रातील भूसंपादन धीम्या गतीने सुरू आहे. मात्र, गुजरातमध्ये वेगाने भूसंपादन झाल्याने येथील कामांना गती दिली जात असून पहिल्या टप्प्यात सुरत ते बिलिमोरा मार्गावर पहिली बुलेट ट्रेन २०२६ मध्ये धावेल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. पश्चिम रेल्वेच्या विविध विभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती देण्यासाठी मंगळवारी ऑनलाइन पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाबद्दल सांगताना महाराष्ट्रातील भूसंपादन पाहता हे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे असून त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती दिली. बुलेट ट्रेन प्रकल्पातील सुरत ते बिलिमोरा पहिला टप्पा २०२६ मध्ये सुरू करण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट केले. हा मार्ग ५० किलोमीटरचा असून बुलेट ट्रेनमुळे १५ मिनिटांत अंतर पार करता येणार आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात एकूण ४३२.६७ हेक्टर जमिनीची गरज असून आतापर्यंत नॅशनल

पदभरतीसाठी प्रशासनाची धावाधाव

प्रस्ताव दाखल करण्यासाठी एक खिडकी यंत्रणा; आजची मुदत मात्र हुकणार मुंबई : राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत रिक्त पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे प्रस्ताव पाठवण्याचा आदेश मिळाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागात धावपळ सुरू आहे. विलंब टाळण्यासाठी तात्काळ छाननी करून त्रुटींची पूर्तता करून घेण्यासाठी एक खिडकीच्या धर्तीवर उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची समन्वय यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. रिक्त पदांची संख्या हजारोंच्या संख्येत असल्याने प्रस्ताव दाखल करण्याची ३० सप्टेंबरची मुदत हुकणार असली तरी पुढच्या काही दिवसांत प्रक्रिया पार पाडण्यात येईल, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकारने विविध विभागांतील रिक्त पदांच्या भरतीला हिरवा कं दील दाखवत प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश प्रशासनाला दिला होता. मात्र, अनेक विभागांनी प्रस्तावच पाठवलेले नाहीत. परिणामी राज्य लोकसेवा आयोगाकडे त्याबाबतची मागणी नोंदवता येत नाही, याकडे सामान्य प्रशासन विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. मंत्रिमंडळ बैठकीत यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नाराज व्यक्त केली. मुख्यमंत्री व उपमु

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत

मराठवाडय़ातील नुकसानीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांची ग्वाही मुंबई : मराठवाडय़ात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली असली तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत के ली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली. मराठवाडय़ात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहोचवावी असे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचावकार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने विशेषत: मराठवाडय़ातले जिल्हे प्रभावित झाले आहेत. सध्या बचाव व तातडीच्या मदतकार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत असेही निर्देश त्यांनी दिले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान

हृदयाबाबत शरीराचे संकेत वेळीच ओळखा!

तातडीने उपचार केल्यास धोका कमी; डॉ. अन्वय मुळे यांचा सल्ला मुंबई : शरीराला  कोणताही त्रास होत आहे हे बहुतांश रुग्ण मान्य करत नाहीत. विशेषत: स्त्रिया हृदयाशी संबंधित आजार महिला बराच काळ अंगावर काढतात आणि आजाराची तीव्रता वाढल्यावरच उपचारासाठी येत असल्याचे दिसून येते. शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखून वेळेत उपचारासाठी आल्यास धोका नक्कीच टाळता येईल, असा मोलाचा सल्ला विख्यात हृदयशल्यविशारद डॉ. अन्वय मुळे यांनी ‘लोकसत्ता आरोग्यमान भवमध्ये दिला. जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने बुधवारी आयोजित केलेल्या ‘लोकसत्ता आरोग्यमान भव या वेबसंवादात ‘ठणठणीत हृदयासाठी’ या विषयावर डॉ. मुळे यांनी मार्गदर्शन केले. ‘लोकसत्ता’चे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर प्रतिनिधी भक्ती बिसुरे यांनी सूत्रसंचालन केले. आहार, व्यायाम या सर्व बाबींचे पालन, कोणतेही व्यसन नाही किंवा कधी आजारी पडलो नाही, तरीही मला हृदयरोग कसा झाला असा प्रश्न अनेक रुग्णांना पडतो. हृदयरोगाचे मूळ दोन प्रकारांमध्ये आहे. एक म्हणजे आपल्या आई किंवा वडील अथवा जवळच्या नातेवाईकांना हा आजार झाला असल्यास तो होण्याची श

खड्डय़ांबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक : रस्तेदुरुस्तीत कामचुकार अधिकारी-कंत्राटदारांची यापुढे गय नाही!

मुंबई : राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मात्र या निधीचा वापर नीट झाला नाही व कामचुकारपणा झाल्यास  संबंधित अधिकारी व कंत्राटदाराची गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यातील खड्डय़ांबाबतच्या बैठकीत दिला. तसेच पाऊस अधिक असलेल्या भागात सिमेंटचे रस्ते बांधण्याच्या मुद्दय़ावर त्यांनी भर दिला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी अनेक मंत्र्यांनी राज्याच्या विविध भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यामुळे लोकांना होत असलेल्या त्रासाबाबत नाराजी व्यक्त के ली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी या विषयावर बैठक बोलावली होती.  या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, राहुल शेवाळे, आमदार सुनील प्रभू, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी उपस्थित होते. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवरील खड्डय़ांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ

मनोरा आमदार निवास पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

डिसेंबरपासून कामाला सुरुवात मुंबई : मनोरा आमदार निवास पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार असून पुनर्विकासाच्या बांधकाम निविदेला प्रतिसाद मिळाला आहे. तीन कंपन्यांनी पुनर्विकासासाठी उत्सुकता दर्शविली आहे. त्यानुसार महिन्याभरात या तीन कंपन्यांपैकी एका कंपनीला कंत्राट देऊन पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने के ले आहे. नरिमन पॉइंट येथे राज्यातील आमदारांच्या निवासासाठी १९९४ मध्ये बांधण्यात आलेले मनोरा आमदार निवास २०१७ मध्ये अतिधोकादायक इमारतींच्या यादीत गेले. इमारतीचा काही भागही कोसळला. त्यानंतर मनोराचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेत २०१९ मध्ये ही वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. तर २०२१ मध्ये नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनकडून (एनबीसीसी) पुनर्विकासाचे काम काढून घेत ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले. त्यानुसार हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी काही महिन्यांपूर्वी निविदा मागविण्यात आली. १८ ऑगस्टला निविदा उघडण्यात आली. मात्र या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. केवळच एकच निविदा सादर झाली. ९०० कोटींच्या

‘पीओपी’ बंदीची अमलबजावणी

महापालिकेची मोर्चेबांधणी, मूर्तिकारांशी लवकरच चर्चा नीलेश अडसूळ मुंबई : येत्या काही दिवसांतच मुंबईमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसवरील (पीओपी) बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा विचार सुरू आहे. गतवर्षी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आगामी गणेशोत्सवात पूर्णत: पर्यावरणपूरक मूर्ती घडवल्या जातील यासाठी पालिकेने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मूर्ती व्यवसायातील पीओपीवर बंदी आणून दहा वर्षे झाली तरी अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. उत्सवादरम्यान होणारी जलस्रोतांची हानी आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची समस्या लक्षात घेत गेल्यावर्षी १२ मे २०२० रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्सवासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. ज्यामध्ये पीओपीच्या मूर्ती घडवू नयेत, अशी स्पष्टता दिलेली आहे.  गेल्या वर्षी उत्सवाच्या तोंडावर ही नियमावली जाहीर केल्याने मूíतकारांनी या निर्णयाला विरोध दर्शवत पीओपीच्या मूर्ती घडवल्या. यंदाही या नियमांच्या अंमलबजावणीसाठी नागपूर खंडपीठाने २५ ऑगस्ट रोजी आदेश दिले. परंतु तोवर उत्सवाची तयारी सुरू झाली असल्याने याही वर्ष

दादर मासळी बाजाराचा पेच कायम

मत्स्यविक्रीसाठी विक्रेत्यांची रस्त्यावरच पथारी; पर्यायी जागेला विरोध कायम मुंबई : जागेच्या प्रश्नावर तोडगा निघत नसल्याने दादर येथील मासळी बाजारातील मासे विक्रेत्यांनी गेल्या महिन्यापासून थेट रस्त्यावर मासे विक्री सुरू केली आहे. हा मासळी बाजार जमीनदोस्त करून दीड महिना लोटला तरी अद्याप या मासळी विक्रेत्यांचा प्रश्न सुटलेला नाही. पालिकेने दिलेल्या पर्यायी जागेला विरोध करीत विक्रेत्यांनी थेट रस्त्यावरच मासळी विक्री सुरू केली आहे. रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, मासळी बाजारातून येणारा कचरा, भुसा आणि नागरिकांना होणारा त्रास अशा अनेक कारणांचा विचार करून पालिकेने दादर मासळी बाजारावर हातोडा चालवला. कोणतीही पूर्वसूचना न देता हा बाजार जमीनदोस्त केल्याने विक्रेत्यांनी आंदोलन केले. त्यानंतर न्यायालयात धाव घेतली. या वेळी पालिकेने दिलेल्या पर्यायी जागाही मासळी विक्रीसाठी अयोग्य असल्याचे न्यायालयात पुढे मांडण्यात आले. न्यायालयाने हे निष्कासन अन्यायकारक असल्याचे सांगत त्यावर स्थगिती आणली. तसेच मासळी विक्रेते व पालिका अधिकारी यांनी वाद मिटवून यावर तोडगा काढण्याचेही सूचित केले. सप्टेंबर महिन्यात हे प्

घाटकोपर-मानखुर्द पुलाचे ग्रहण कायम

उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांमुळे अवजड वाहतुकीस मज्जाव इंद्रायणी नार्वेकर मुंबई : घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपूल वाहतुकीस खुला झाला असला तरी, अवजड वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. या पुलावरून उच्च दाबाच्या वीजवाहिन्या जात असल्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी त्या वाहिन्यांची उंची वाढवल्यानंतरच परवानगी देण्यात येईल. मात्र यासाठी राज्य सरकारची परवानगी आणि प्रत्यक्ष स्थानांतर यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाबाबतचे अडथळे काही संपण्याचे नाव घेत नाही. १ ऑगस्टला हा पूल सुरू झाल्यापासूनच या पुलावरून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली होती. त्यामुळे इतके कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल कमकुवत आहे का,, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. या पुलावर केवळ तीन मीटर उंचीपर्यंतच्या हलक्या वाहनांना प्रवेश दिला जातो. अवजड वाहनांनी पुलावरून वाहतूक करू नये म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूला उंचीमर्यादा खांब (हाईट बॅरियर) लावलेले आहेत. त्यामुळे वाशी, नवी मुंबईतून मुंबईत येणारे कंटेनर, अवजड वाहने पुलाच्या खालूनच जात आहेत. तसेच देवनार