मुंबई : वडाळा येथील कोठडी मृत्यूप्रकरणातील प्रमुख साक्षीदार अंकित मिश्रा याचा शोध घेऊन त्याला दोन आठवड्यांत न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले. पोलिसांनी धमकावल्यानंतर अंकित बेपत्ता झाल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. विजय सिंह याचा २७ ऑक्टोबर २०१९ मध्ये वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात कोठडीत असताना मृत्यू झाल्याचा आरोप आहे. अंकित हा विजयचा मित्र असून उच्च न्यायालयात याचिका करणाऱ्यांत विजयसह त्याचाही समावेश होता. विजय कोठडीत असतानाही अंकितही त्यावेळी तेथे होता. परंतु पोलिसांनी अंकितचा जबाब नोंदवला नाही. गेल्या वर्षभरापासून अंकित बेपत्ता आहे.
The post कोठडी मृत्यूप्रकरण : साक्षीदाराला हजर करण्याचे आदेश appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3zBQFU1

Comments
Post a Comment