मुंबई : ऑक्टोबरमध्ये शाळा सुरू करण्याची तयारी राज्य सरकारने केल्यामुळे पालिके ने लसीकरण केंद्रांवर येत्या मंगळवारचा दिवस शिक्षक व १८ वर्षे पूर्ण के लेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवला आहे. तर येत्या सोमवारचा दिवस फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर सोमवारी, २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. तसेच मंगळवारी, २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या पहिल्या सत्रात, शिक्षक तसेच १८ वर्षे व त्यावरील वयाचे विद्यार्थी यांचे लसीकरण होईल. याच दिवशी दुसऱ्या सत्रात म्हणजे दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत, दुसरी मात्रा घेणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या दुपारच्या सत्रात कोणालाही लशीची पहिली मात्रा दिली जाणार नाही.
महिला तसेच शिक्षक व विद्यार्थी यांना राखीव दिवशी पहिली किंवा दुसरी मात्रा घेता येणार आहे. या दोन्ही दिवशी, मुंबईतील सर्व शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर थेट येऊन संबंधित घटकातील पात्र नागरिकांना लस घेता येईल.
त्यासाठी पूर्वनोंदणीची आवश्यकता नाही. पात्र लाभार्थ्यांनी येताना, शासकीय ओळखपत्र आणणे आवश्यक असेल. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी शैक्षणिक संस्थांचे ओळखपत्रदेखील सोबत आणणे आवश्यक आहे.
The post मुंबईत लसीकरणासाठी राखीव दिवस appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3o9jvbZ

Comments
Post a Comment