राकेश वाधवान प्रकरणी न्यायालयाची विचारणा
मुंबई : पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँकेतील आर्थिक गैरव्यवहर प्रकरणी अटकेत असलेले हाऊसिंग डेव्हल्पमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे संस्थापक (एचडीआयएस) राकेश वाधवान यांना ‘पेसमेकर’ प्रत्यारोपणाची आवश्यकता असून सरकारी रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. ती नसल्यास वाधवान यांना खासगी रुग्णालयात स्वखर्चाने हे उपचार घेण्याची परवानी दिली जाईल, असेही न्यायालयाने यावेळी म्हटले.
वाधवान गेल्या वर्षभरापासून केईएम रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयातर्फे त्यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. तो पाहिल्यानंतर न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी विचारणा केली.
खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी वाधवान यांची वैद्यकीय तपासणी करण्याची परवानगीही न्यायालयाने नुकतीच दिली होती. केईएम रुग्णालयाने सादर केलेल्या वैद्यकीय अहवालानुसार, वाधवान यांना हृदयाच्या आजारासह अन्य आजार आहेत. ‘ड्युअल चेंबर पेसमेकर’ लावण्यासाठी वाधवन यांना ‘अँजिओप्लास्टी’ करणे आवश्यक आहे. परंतु या प्रत्यारोपणासाठी आवश्यक सुविधा केईएम रुग्णालयात उपलब्ध नसल्याचेही रुग्णालायतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.
वाधवान यांच्या हृदयाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे ही सुविधा मुंबईतील अन्य शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे का, अशी विचारणा करून त्याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.
The post शासकीय रुग्णालयात ‘पेसमेकर’ प्रत्यारोपणाची सुविधा आहे का? appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/39IAFVE

Comments
Post a Comment