Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

नदीवरील गाणं आणि ड्रग्ज प्रकरणावर नवाब मलिकांचे गंभीर आरोप, अमृता फडणवीसांचं २ ओळीत उत्तर

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज (१ नोव्हेंबर) दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही व्यक्ती जयदीप राणा असल्याचं सांगत त्याच्यावर गंभीर आरोप केले. तसेच फडणवीस आणि राणा यांचा ड्रग्ज व्यवसायाशी संबंध असल्याचा आरोप करत हल्लाबोल केला. यावर आता अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलंय. यात त्यांनी केवळ दोन ओळीचं ट्वीट करत मलिकांना लक्ष्य केलंय. अमृता फडणवीस म्हणाल्या, “चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते!” चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा ? कारण *विनाशकाले विपरीत बुद्धी* असते ! — AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 1, 2021 नवाब मलिक काय म्हणाले होते? देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोपही नवाब मलिक यांनी केलाय. मात्र पत्रकार परिषदेआधी मलिक यांनी ट्विटवरुन अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केल

किरीट सोमय्यांकडून दाऊद आणि पवार भेटीचे आरोप; नवाब मलिकांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे यांच्यावरील टीकेवरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं होतं. “समीर वानखेडे यांना “समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है” असं म्हणतात त्यांनी ठाकरे सरकारचे बाप असलेल्या शरद पवारांना १९९३-९४ मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं? हे विचारावं,” असं म्हणत गंभीर आरोप केला होता. त्यांच्या या आरोपांना मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. “पुरुषोत्तम सोलंकी यांचे छोट्या शकील आणि दाऊदशी संबंध होते. सोलंकीवर १९९२मध्ये आमचं सरकार असताना कारवाई करण्यात आली होती. हेच सोलंकी नंतर गुजरातच्या भावनगरला राहायला गेले आणि अपक्ष निवडून आले. त्यांना मोदी सरकारच्या काळात १० वर्ष मंत्रीपद देण्यात आलं. किरीट सोमय्या तुम्ही मोदींना विचारा की हा दाऊदशी संलग्न माणूस तुमच्या मंत्रिमंडळात कसा होता. याचं उत्तर तुम्हाला मिळेल,” असं मलिक म्हणाले. नवाब मलिकांचा आरोप काय ? किरीट सोमय्या म्हणाले, “समीर तु दलित नाही, तु मुस्लीम आहे. क्रांती रेडकर तुझा नवरा मुस्लीम आहे. त्याचं पहिलं लग्न नाही निकाह झाला

फडणवीसांचा दूत बनून नीरज गुंडे उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचा – नवाब मलिक

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. नीरज गुंडे ड्रग्ज व्यवसायिक असून तो फडणवीस सरकारच्या काळात वाद झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दूत बनून उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचा, असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. ते मुंबईत पत्रकार परिषदेच बोलत होते. नवाब मलिक म्हणाले, “फडणवीस सरकारच्या काळात नीरज गुंडे देवेंद्र फडणवीस यांचा दूत म्हणून उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचा. सरकार सुरू असताना फडणवीस आणि ठाकरेंचे नाते बिघडत होते. त्यावेळी नीरज गुंडे फडणवीसांचे निरोप घेऊन उद्धव ठाकरेंकडे मांडवली करण्यासाठी जायचा. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असतानाही गुंडे भाजपा आणि शिवसेना सोबत यावी यासाठी प्रयत्न करत होता. गुंडेचा उद्धव ठाकरेंशी काहीही संबंध नाही.” “महाराष्ट्रात नीरज गुंडेच्या माध्यमातून फडणवीसांकडून वसुली” “हे प्रकरण महाराष्ट्रातील मोठ्या ड्रग्ज व्यवसायाचं आहे. देवेंद्र फडणवीस यांचा एक वजीर याच शहरात राहतो. त्याचं नाव निरीज गुंडे असं आहे. फडणवीस

राजकारणाचा विचार केला तर हमाम मे सब नंगे है – संजय राऊत

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांचे ड्रग्ज पेडलरसोबत संबंध असल्याचा धक्कादायक आरोप करत अनेक खुलासे केले आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तपास यंत्रणांचा इतक्या मोठ्या प्रमाणात गैरवापर महाराष्ट्राने पाहिलेला नाही. राजकारणाचा विचार केला तर हमाम मे सब नंगे है, त्यामुळे ज्यांची स्वतःची घरं काचाची असतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडफेक करू नये,” असं संजय राऊत म्हणाले. “शरद पवारांवर आरोप करताना भाजपाच्या नेत्यांन लाज वाटली पाहिजे, असंही राऊतांनी म्हटलंय. आमच्याही हातात दगड असू शकतात. मात्र, आम्ही संयम बाळगला आहे. कंबरेखालचे वाद आम्हाला नको आहेत, मात्र समोरच्याला हे करण्याची इच्छा असेल तर ते फार वाईट पातळीवर जाईल. असं राऊत म्हणाले. तसेच शरद पवारांनी आतापर्यंत संस्कार असलेलं राजकारण केलंय,” असंही राऊत यांनी सांगितलं. आम्ही नवाब मलिकांच्या पाठिशी आहोत. तपास यंत्रणांचा गैरवापर करून सरकारमधील मंत्र्यांना त्रास दिला जातोय, असा आरोप राऊतांनी केला. The post राजकारणाचा विचार केला तर हमाम मे सब नंगे है – संजय राऊत appeared first on Loksatta . from मुंबई – Loksat

Drugs Case LIVE: “वाझे पाळायची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाही”; नवाब मलिकांना फडणवीसांचं उत्तर

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ड्रग विक्रेत्यांचे भाजपा नेत्याशी संबंध आहेत असा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर संपूर्ण महाराष्ट्रात अमली पदार्थांचा व्यापार सुरू आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्वतः समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांची भेट का घेतली, असा सवाल मलिक यांनी केला. आरोपींना पाठिंबा देणे दुर्दैवी असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय मंत्री संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंची बदली केली असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यावर

आरोग्य विभागाच्या परीक्षेत किती उमेदवारांची उपस्थिती? कसा होता पेपर?...जाणून घ्या

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद : हॉल तिकिटांमधील गोंधळ, ऐनवेळी वेळापत्रकातील बदल अशांमुळे चर्चेत आलेली सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ‘ड’ संवर्गातील पदांसाठीची परीक्षा रविवारी अखेर पार पडली. औरंगाबादमधून ६१ परीक्षा केंद्राहून १२ हजार ३७९ उमेदवारांनी परीक्षा दिली. नोंदणी केलेल्यापैकी ३० टक्के उमेदवार परीक्षेला गैरहजर राहिले. प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी ‘क’पेक्षा ‘ड’ची अधिक असल्याचे परीक्षार्थींनी सांगितले. अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली परीक्षा झाल्याने उमेदवारांचे निकालाकडे लक्ष लागले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘ड’ संवर्गातील तीन हजार ४६६ पेक्षा अधिक जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. आरोग्य विभागाच्या परीक्षा अनेक महिन्यांपासून चर्चेत होत्या. ‘क’ संवर्गातील विविध पदांसाठी २४ ऑक्टोबरला परीक्षा झाली तर ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी रविवार ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा झाली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा लांबल्या. त्यासह परीक्षेतील त्रुटींमुळे परीक्षा चर्चेत राहिली. दूरचे परीक्षा केंद्र, चुकीचे हॉलतिकीट यावरून मोठा गोंधळ उडाला होता. ‘ड’ संवर्गातील परीक्षेत एकाच विद्यार्थ्याला अनेक हॉल त

“त्यांनी मला धमकी दिली, जास्त बोललात तर..”; अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांवर नवाब मलिकांचे आरोप

क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. एनसीबीचे दक्षता पथक समीर वानखेडे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या तपासात गुंतले आहे. दरम्यान, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी रविवारी समीर वानखेडे यांच्या घरी जात भेट घेतली. तत्पूर्वी, वानखेडे यांनी शनिवारी अरुण हलदर यांची भेट घेऊन त्यांच्यावरील धर्मांतराच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले होते. या बैठकीनंतर आयोगाचे उपाध्यक्ष म्हणाले होते की, जर कोणी अनुसूचित जातीच्या अधिकाऱ्यावर जातीच्या आधारावर आरोप केले तर आयोग अशा प्रकरणी गप्प बसणार नाही. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी हलदर यांच्या भेटीवरून टीका केली आहे.  “ज्या व्यक्तीला तुम्ही सामाजिक न्याय विभागाच्या पदावर बसवले आहे ती व्यक्ती विभागाचे अधिकार स्वतःकडे घेत आहेत. याची आम्ही राष्ट्रपतींकडे तसेच सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीने बनावट प्रमाणपत्र बनवून एका मागासवर्गीयाचे अधिकार हिरावून घेतले. त्यांनी मला धमकी दिलीय. जास्त बोललात तर अ‍ॅट्

“जातीचं प्रमाणपत्र खरं की खोटं हे ठरवण्याचा अधिकारी अनुसुचित जाती आयोगाला नाही, तर…”, नवाब मलिकांकडून हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी खंडणी घेतल्याचे गंभीर आरोप झालेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची पाठराखण केल्यावरून अनुसुचित जाती आयोगावर (SC Commission) हल्लाबोल केलाय. कुणाच्याही जातीच प्रमाणपत्र खरं की खोटं हे ठरवण्याचा अधिकारी अनुसुचित जाती आयोगाला नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. हा अधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या सामाजिक न्यायाविभाग आणि इतर यंत्रणेला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. नवाब मलिक म्हणाले, “प्रमाणपत्र खरं आहे की खोटं हे शेड्यूल कास्ट कमिशनने सांगण्याचा हक्क त्यांना नाही. १९९४ साली देशात खोट्या प्रमाणपत्रांची लाट आहे. प्रत्येक जिल्ह्यात खोट्या प्रमाणपत्रांच्या तपासासाठी आदेश दिला. संयुक्त सचिव स्तरावर याचा तपास करावा, पोलीस अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी असावा, न्यायालयाच्या आदेशानुसार तपास करावा असे आदेश आहेत. निर्णय चुकीचा वाटल्यास उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात जावं अशी प्रक्रिया आहे.” “समीर वानखेडे यांना क्लिन चीट देण्याची एवढी घाई काय?” “अनुसुचित

मुंबईत पेट्रोल ११५ रुपयांवर

नवी दिल्ली : इंधन दरात सलग चौथ्या दिवशी रविवारी ३५ पैशांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे मुंबईत पेट्रोल दराने ११५ रुपयांचा टप्पा ओलांडला. मुंबईत पेट्रोल दर ११५.१५ रुपये असून, डिझेलदर १०६.२३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलसाठी १०९.३४ रुपये, तर डिझेलसाठी ९८.०७ रुपये मोजावे लागत आहेत. देशातील जवळपास सर्वच मोठय़ा शहरांत पेट्रोलने शंभरी पार केली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडासह अनेक भागांत पेट्रोलने सर्वाधिक म्हणजे १२० रुपयांचा टप्पा ओलांडला. The post मुंबईत पेट्रोल ११५ रुपयांवर appeared first on Loksatta . from मुंबई – Loksatta https://ift.tt/2Y2WrkF

लोकल प्रवास सुलभ ; लसीकरण झालेल्या प्रवाशांना आता दैनंदिन तिकीट

मुंबई : लसीकरण (दोन्ही मात्रा) होऊन १४ दिवस झालेल्या प्रवाशांना उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी दैनंदिन तिकिटे देण्यास राज्य सरकारने रविवारी मंजुरी दिली. त्यामुळे रेल्वेनेही रविवारपासूनच दैनंदिन तिकीटविक्रीस सुरुवात केली. या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्येत अशीच घट होत राहिल्यास दिवाळीनंतर अन्य निर्बंधही शिथिल करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.  दोन्ही लसमात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र रेल्वे स्थानकातील पालिका कर्मचाऱ्यांकडून प्रमाणित केल्यानंतर ते तिकीट खिडक्यांवर दाखवावे लागेल. ते दाखवल्यावर प्रवाशांना तिकीट मिळेल किंवा ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ दाखवूनही तिकीट घेता येईल, असे रेल्वेने स्पष्ट केले. दैनंदिन तिकिटे दिली जात नसल्याने विनातिकीट प्रवाशांची संख्याही वाढली होती. करोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानेच राज्य सरकारने जास्तीत जास्त निर्बंध शिथिल करण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी दैनंदिन तिकिटे वितरित करण्यास परवानगी दिली. त्यानंतर लगेचच रेल्वेने खिडक्यांवर तिकीटविक्री सुरू केली. राज्य सरकारच्या निर्णयाने लाखो मुंबईकरां

प्रभाग फेररचनेचा आराखडा सादर ; शिवसेनेने सोयीचे बदल केल्याचा भाजपचा आरोप

मुंबई : फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई पालिकेची निवडणूक अपेक्षित असून या निवडणुकीसाठी पालिकेने प्रभागांच्या सीमा निश्चितीचे काम सुरू केले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पालिकेने २२७ प्रभागांच्या सीमांचा कच्चा आराखडा तयार करून तो नुकताच आयोगाला सादर केला. शिवसेनेच्या दबावाखाली हा आराखडा तयार केला असून त्यात पक्षाला पूरक असे बदल शिवसेनेने केले असल्याचा आरोप भाजपने केला आहे.  या निवडणुकीच्या प्रभाग रचनेला खूप महत्त्व असते. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने आपल्याला फायदा होईल अशा पद्धतीने प्रभागांची पुनर्रचना केल्याचा आरोप शिवसेना व काँग्रेसने केला होता. त्यामुळे येत्या निवडणुकीच्या तोंडावर प्रभागांची पुनर्रचना करण्याची मागणी शिवसेना व काँग्रेसने केली आहे. प्रभाग रचना बदलण्यासाठी नुकतीच झालेली जनगणना ग्राह्य़ धरली जाते. मात्र करोना व टाळेबंदीमुळे २०२१ ची जनगणना झालेली नाही. त्यामुळे यावेळच्या प्रभाग रचनेलाही २०११ च्या जनगणनेचीच आकडेवारी ग्राह्य़ धरली जाणार आहे. या वेळच्या प्रभाग सीमा या भौगोलिक बदलांवर आधारित असणार आहेत. गेल्या पाच वर्षांत काही महत्त्वपूर्ण भौगोलिक बदल झाले का याचा आढावा घेऊन हा

खरेदीला उधाण, नियम पालनासाठी कसरत !

मुंबई : दोन दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या खरेदीनिमित्त रविवारी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. स्थानिक दुकानदारांपासून ते मोठय़ा बाजारपेठांपर्यंत सकाळपासूनच ग्राहकांची झुंबड उडाली होती. त्याचवेळी मुखपट्टी आदी करोना निर्बंधांच्या पालनासाठी प्रशासन आणि पोलिसांना कसरत करावी लागत आहे. दादर बाजारपेठेत तर खरेदीला उधाण आले होते. मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतील नागरिक येथे खरेदीसाठी येतात. स्थानक परिसर, किर्तीकर मार्केट, रानडे रोड आणि आसपासच्या परिसरात माणसांची दाटी झाली होती. कंदील, तोरण, रांगोळ्या, रंग, दिव्यांच्या माळा, पितळी वस्तू, सजावटीचे साहित्य घेऊन बसलेल्या फेरीवाल्यांना ग्राहकांपासून उसंत मिळत नव्हती. कपडे, साडय़ांची दुकाने गजबजली होती. नागरिकांमध्ये खरेदीचा प्रचंड उत्साह, आनंद दिसत होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मुखपट्टी आदी नियमांचे पालन करतील याकडे पोलिसांचे विशेष लक्ष होते. फेरीवाल्यांनी बाजारपेठांतून टांगलेले कंदील, दीपमाळा, तोरणे आणि उत्साहाने खरेदी करणारे ग्राहक असे चित्र होते.  फुलबाजारात मात्र जेमतेम प्रतिसाद होता. लक्ष्मीपूजनाला अजून तीन दिवस बाकी असल्याने फुलां

गुप्त मतदानामुळे सत्ताधाऱ्यांची कसोटी

विधान परिषद पोटनिवडणूक २९ नोव्हेंबरला मुंबई : काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी २९ नोव्हेंबरला पोटनिवडणुकीचा कार्यक्र म निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर के ला. गुप्त मतदान पद्धतीने पोटनिवडणूक होणार असल्याने बिनविरोध न होता प्रत्यक्ष मतदान झाल्यास सत्ताधारी महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी ९ ते १६ नोव्हेंबर या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून, २२ तारखेपर्यंत माघार घेता येईल.  खुल्या पद्धतीने मतदान असल्याने राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती. विधान परिषदेकरिता गुप्त मतदान पद्धतीची कायद्यात तरतूद आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फाटाफू ट होण्याची नेतेमंडळींना बहुधा भीती असावी. यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे पावसाळी अधिवेशनात टाळण्यात आले होते. यावर मार्ग म्हणून विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रि येत बदल करून गुप्तऐवजी आवाजी मतदानाने निवड करण्याची नियमात सुधारणा करण्यात येणार आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात हा बदल करून मगच अध्यक्षांची निवडणूक घेण्याची योजना आहे.

अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयकडून एकाला अटक

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्य़ात एकाला अटक केली आहे. ही या प्रकरणातील पहिली अटक आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल के ला होता. संतोष जगताप असे अटक केलेल्याचे नाव आहे. ठाण्याचा रहिवासी असलेल्या जगताप अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मध्यस्थ म्हणून काम करायचा, असा आरोप आहे.  रविवारी त्याला ठाण्यातून सीबीआयने अटक केली.  ४ नोव्हेंबपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख  व इतरांविरोधात गुन्हा दाखल आहे.  पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  तक्रारीनुसार, पदावर असताना त्याचा गैरवापर झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून त्यानुसार  गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच वाझेला पोलीस सेवेत घेणे व त्यानंतर संवेदनशील गुन्ह्य़ांचा तपासही देणे, हे देशमुख यांना माहिती होते, असे तक्रारीत म्हटले आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून मिळालेल्या म

कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन: राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष राजीनाम्याच्या तयारीत

उमाकांत देशपांडे, लोकसत्ता मुंबई : राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष आणि उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांना कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे पगार देण्यात आल्याने ते नाराज असून  ते एक- दोन दिवसांत राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आयोगावरील अन्य न्यायिक सदस्यांची मुदत संपत असून नागपूर व औरंगाबाद येथेही न्यायिक सदस्य नसल्याने राज्य ग्राहक आयोगाचे कामकाज ठप्प होण्याची भीती आहे. मात्र बोरा यांची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणावर (मॅट) औरंगाबाद येथे नियुक्ती झाली आहे, म्हणून ते राजीनामा देत आहेत, नाराजीमुळे नाही. त्यांना तेथे तीन वर्षे अधिक कार्यकाळ मिळेल. त्यांना नियुक्तीच्या वेळीच कंत्राटी कर्मचारी म्हणून वेतन मिळेल, याची कल्पना होती याकडे  शासकीय उच्चपदस्थांनी लक्ष वेधले. बोरा यांची राज्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून ९ जून २०२१ रोजी नियुक्ती करण्यात आली असून त्यांची मुदत २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत (वयाची ६५ वर्षे) आहे. ग्राहक आयोगाच्या अध्यक्ष पदासाठीची नियुक्ती वैधानिक असून कंत्राटी नाही. त्यामुळे आपल्याला ‘ पगार’  या शीर्षांखाली वेतन मिळावे, अशी मागणी त्यांनी शासनाकडे पत

आधुनिक मोटारींचे विलोभनीय दर्शन

मुंबई : देशातील पहिल्या श्रेष्ठ दर्जाच्या आधुनिक ४० मोटारींच्या ताफ्याची झलक याचि डोळा पाहण्यासाठी रविवारी वांद्रे-कुर्ला संकुलात उत्साही आणि हौशी मोटारप्रेमींनी गर्दी केली होती. देशातील या पहिल्या ‘मॉडर्न क्लासिक कार रॅली’मध्ये १० ते ३० वर्षे जुन्या म्हणजे १९७० ते २००० या कालावधीत उत्पादित श्रेष्ठ दर्जाच्या मोटारी सहभागी झाल्या होत्या. श्रेष्ठ दर्जाच्या मोटारींचा हा ताफा वांद्रे-वरळी सी-लिंकवरून मार्गस्थ होऊन वांद्रे-कुर्ला संकुलातील सोफीटेल हॉटेलकडे परतला. या ‘मॉडर्न क्लासिक कार रॅली’त जग्वार ई-टाइप, बीएमडब्ल्यू ई३० (या मोटारी कधीकाळी कला आणि मोटारस्पोर्टप्रेमी जहांगीर निकोलसन यांच्या मालकीच्या होत्या.) यांच्यासह मर्सिडीस- बेन्झ एसएलएस, पॉन्टियाक फायरबर्ड्स आणि होंडा एनएसएक्स या मोटारी सहभागी झाल्या होत्या. श्रेष्ठ दर्जाच्या आधुनिक मोटारींसाठी प्रामुख्याने असा उपक्रम राबवल्याबद्दल ‘मॉडर्न क्लासिक कार रॅली’त सहभागी झालेल्या मोटारप्रेमींनी समाधान व्यक्त केले. यशवर्धन रुईया हे आपल्या सहा वर्षांचा मुलगा रेयांश याच्यासह सहभागी झाले होते. ते म्हणाले, आम्ही नेहमीच व्हिन्टेज कार रॅलीत सहभ

तारण मालमत्तांबाबत माहिती मिळणे सुलभ

महारेराला ‘सीईआरएसएआय’ची कागदपत्रे सादर करणे विकासकांना बंधनकारक मुंबई : महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातील घरांवर किं वा मालमत्तेवर कर्ज घेतले असल्यास वा घरे तसेच मालमत्ता तारण ठेवली असल्यास त्याबाबतचे सीईआरएसएआयची (सेंट्रल रजिस्ट्री सिक्युरिटायजेशन अ‍ॅसेट रिकंस्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ इंडिया) कागदपत्रे महारेराला सादर करणे आता विकासकांना बंधनकारक असणार आहे. महारेराच्या या निर्णयामुळे ग्राहकांना घरावर कर्ज किं वा तारण आहे की नाही हे समजणार आहे. तर याअनुषंगाने ग्राहकांची होणारी फसवणूकही आता रोखली जाणार आहे. महारेराकडे नोंदणी करताना विकासकांना आपल्या गृहप्रकल्पावर कर्ज घेतले आहे का, प्रकल्पातील घरे तारण ठेवली आहेत का याची माहिती द्यावी लागते. ग्राहकांच्या संरक्षणासाठी, त्यांची फसवणूक रोखण्यासाठी ही माहिती विकासकांकडून घेतली जाते. एका घोषणापत्राअंतर्गत विकासक ही माहिती महारेराकडे सादर करतात; पण माहिती अधिकृत आहे की नाही याची काही खात्री नसते. एकार्थाने विकासक लेखी माहिती देतात. त्यामुळे माहिती खरी आहे की खोटी हे समजत नाही आणि मग कर्ज वा तारण असलेले घर खरेदी केल्यास ग्राहकांना त्या

ऑक्टोबरमध्ये घरविक्रीत वाढ

मुंबई : करोनाच्या संकटातून उद्योगधंदे सावरत असून मालमत्ता बाजारपेठाही स्थिरस्थावर होताना दिसत आहे.  सणासुदीच्या निमित्ताने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून परिणामी ऑक्टोबरमध्ये घरविक्रीत आणि महसुलात वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये राज्यात १ लाख ६ हजार ८३१ घरे विकली गेली असून यातून मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने राज्य सरकारला १ कोटी ८३१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मार्च २०२० मध्ये करोनाचे संकट आले आणि त्याचा मोठा फटका मालमत्ता बाजारपेठेला बसला. त्यामुळेच एप्रिल २०२० मध्ये राज्यात सर्वात कमी केवळ ७७८ इतकीच घरे विकली गेली होती. पुढे जसजशी परिस्थितीत सुधारणा होऊ लागली तसतशी मालमत्ता बाजारपेठही सावरत गेली. मात्र घरविक्रीत म्हणावी तशी वाढ होत नसल्याने, महसुलात घट होत असल्याने राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात सवलत लागू केली. याचा चांगला परिणाम सप्टेंबर २०२० मध्ये झाला आणि घरविक्रीचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊ लागला. डिसेंबर २०२० मध्ये तर विक्रमी घरविक्री झाली. तब्बल २ लाख ५५ हजार ५१० घरे डिसेंबरमध्ये विकली गेली आणि यातून २ हजार २१२ कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळाला. करोनाकाळात केंद्र

राज्यात वाहतूक नियमभंगाबद्दल वाहनमालकांकडून २२ कोटींची दंडवसुली

मुंबई : वाहतूक नियम धुडकावणाऱ्या वाहनचालकांकडून ई-चलन दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी राज्यातील ६ लाख ७९ हजार ६७५ वाहनधारकांना लोकअदालतमार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२१ पर्यंतची थकीत एकू ण १०३ कोटी ३८ लाख रुपयांपैकी २२ कोटी ७७ लाख १९ हजार रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी राज्यात ई-चलन पद्धत अमलात आणण्यात आली. त्यासाठी वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात सीसीटीव्हींमार्फत कारवाई करण्यास सुरुवात केली. प्रथम मुंबईत याद्वारे कारवाईला सुरुवात केल्यानंतर राज्यातील सर्वच भागांत त्याची व्याप्ती वाढवली. ई-चलनद्वारे झालेला दंड भरण्यास चालकांचे दुर्लक्ष आणि त्याची वसुली करण्यास वाहतूक पोलिसांसमोरही असलेल्या अडचणींमुळे राज्यात २०१९ पासून ते सप्टेंबर २०२१ पर्यंत दंडाची थकीत रक्कम एक हजार १९ कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाली आहे. आता दंडवसुलीला वेग देण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी लोकअदालतमार्फत वसुली के ली जात आहे. या अदालतमध्ये जाऊन दंड कमी करून तो भरण्याचा पर्यायह

समीर वानखेडेचा लढा जाती-धर्माविरोधात नाही तर…; क्रांती रेडकर संतापली

समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेले आरोप निराधार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. रामदास आठवले म्हणाले, “नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर सर्व प्रकारचे बिनबुडाचे आरोप केले आहेत. ते आमच्या समाजाची बदनामी करत आहेत. समीरच्या वडिलांचे नाव दाऊद नाही. मी त्यांची सर्व कागदपत्रेही पाहिली आहेत.” यावेळी बोलताना क्रांती रेडकर यांनी म्हटलं की, “माझ्या पतीचा लढा अमली पदार्थांविरुद्ध आहे, कोणत्याही धर्म किंवा जातीविरुद्ध नाही. आपल्या पतीवर आणि तिच्या कुटुंबावर होत असलेल्या आरोपांचा देत क्रांती रेडकर म्हणाल्या की, समीर वानखेडेंचा त्यांच्या कामाप्रती असलेला निश्चय कमी झालेला नाही. समीर वानखेडे यांचा लढा अमली पदार्थांविरुद्ध आहे, कोणत्याही धर्माविरुद्ध नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आमच्या कुटुंबासोबत  जे काही घडले आहे, त्यात त्यांचा कामाप्रती निश्चय कमी झालेला नाही. लोक समीरला खाली खेचण्याचा प्

भाजपा नेत्याने नवाब मलिकांवर दाखल केला १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा; जाणून घ्या कारण

मुंबईतील क्रुझवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत भाजपाशी संबधित असलेल्या मोहित कंबोज यांचा मेव्हणा ऋषभ सचदेवा याला एनसीबीनं ताब्यात घेतल होते. पण त्याला नंतर सोडून देण्यात आले. तर, मुंबईतील भाजपाच्या नेत्याने फोन केल्याने ऋषभ याला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सोडून दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मोहित कंबोज नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं म्हणत फेटाळून लावले होते. त्यानंतर त्यांनी शनिवारी मुंबई हायकोर्टात नवाब मलिक यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. “माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर बिनबुडाचे आरोप लावल्याबद्दल मी नवाब मल्लिक यांच्याविरुद्ध मुंबई हायकोर्टात १०० कोटींच्या नुकसानीचा दावा दाखल केला आहे,” असं त्यांनी ट्विट करून सांगितलं. 2nd Case : Today I Have Filled Damages Suit Against मियाँ Nawab Mallik For 100 Crores in High Court Mumbai For Putting Baseless Allegations Against Me and My Family ! pic.twitter.com/6Ck7XuWXpP — Mohit Bharatiya

“चंद्रकांत पाटील मला कधी खिशात टाकताय याची वाट पाहतोय, मग…”, नवाब मलिकांकडून प्रत्युत्तर

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यासारखे नेते आपल्या खिशात असल्याचं वक्तव्य केलं. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. “चंद्रकांत पाटील मला कधी खिशात टाकताय याची वाट पाहतोय, मग मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे,” असं मत नवाब मलिक यांनी व्यक्त केलं. त्यांनी चंद्रकांत पाटलांचा व्हिडीओ ट्वीट करत त्यांना प्रत्युत्तर दिलंय. नवाब मलिक म्हणाले, “भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगत आहेत मी नवाब मलिक यांना खिशात ठेवतो. त्यांचा खिसा इतका मोठा आहे हे मला माहीत नाही. मी वाट बघतोय ते कधी त्यांच्या खिशात टाकत आहेत. मी त्यांच्या खिशात काय काय आहे हे जनतेसमोर आणणार आहे त्यासाठी चंद्रकांतजी मला तुमच्या खिशात टाका.” धनंजय मुंडेंकडूनही चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर धनंजय मुंडे म्हणाले, “चंद्रकांत पाटलांना अशी भाषा शोभत नाही. चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत किंवा भाजपाच्या कुठल्याच राज्य किंवा केंद्रातील नेत्यांचे खिसे मोठे नाहीत. ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलायला पाहिजे.” नवाब

“दिवाळीनंतर ३ मंत्री आणि ३ जावयांचे फटाके फोडणार”, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या भ्रष्टाचाराबाबत दिवाळीनंतर ६ जणांचे फटाके फोडणार आहे. यात ३ मंत्री आणि ३ जावई असल्याचं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं. त्यांनी लवंगी फटाके फोडले, मात्र मी एकदम बॉम्ब फोडणार आहे, असाही सोमय्यांनी दावा केला. ठाकरे आणि पवारांनी महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण केल्याचाही आरोप त्यांनी केला. ते मलाड पूर्वमध्ये भाजपा दिंडोशी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना बोलत होते. किरीट सोमय्या म्हणाले, “सध्या दिवाळी सण येतोय, दिवाळीत फटाके फोडतात. मात्र, किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक, दोन, तीन, चार किंवा पाच नाही तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे. घोटाळेबाज ठाकरे-पवारांनी १२ दिवस नाटकं केली. यात ३ मंत्र्यांच्या ३ घोटाळ्यांचा आणि त्यांच्या ३ जावयांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये जावयांचं राज्य आहे. अजित पवार यांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. हसन मुश्रीफांनी त्यांच्या जावयाला आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. एकदम बॉम्ब फोडण्याचं काम किरीट सोमय्या करणार आहे. यांनी केवळ लवंगी फटा

आर्यनपाठोपाठ मुनमुन धमेचाही तुरुंगातून बाहेर; अरबाज मर्चंटच्या सुटकेबाबतही घडामोडींना वेग

क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानची जवळपास २६ दिवसांनंतर शनिवारी तुरुंगातून सुटका झाली. सुटकेनंतर तो थेट वांद्रे येथील मन्नत या निवासस्थानी गेला. तसेच मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानसोबत सहआरोपी असलेल्या मुनमुन धमेचाची रविवारी भायखळा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. तसेच अन्य एक आरोपी असलेल्या अरबाज मर्चंटचीही आज आर्थर रोड तुरुंगातून सुटका होणार आहे.    केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) क्रूझ टर्मिनसवर केलेल्या कारवाईत आर्यन खानसह मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ मर्चंट यांना अटक केली होती. त्यांच्याकडून १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या आणि एक लाख ३३ हजार रोख रुपये जप्त केले होते. आर्यनला २ ऑक्टोबरला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर ३ ऑक्टोबरला त्याला ‘एनसीबी’ने अटक केली. त्यामुळे २ ते ७ ऑक्टोबरपर्यंत तो ‘एनसीबी’च्या कोठडीत होता. त्यानंतर ७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत तो मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात होता. आर्यनची जामीन प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झा

“‘समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है’ म्हणतात, मग शरद पवारांना विचारा…”, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे यांच्यावरील टीकेवरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलंय. समीर वानखेडे यांना “समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है” असं म्हणतात त्यांनी ठाकरे सरकारचे बाप असलेल्या शरद पवारांना १९९३-९४ मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं? हे विचारावं, असं मत व्यक्त केलं. ते मलाड पूर्वमध्ये भाजपा दिंडोशी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना बोलत होते. “शरद पवार यांना विचारा १९९३-९४ मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं?” किरीट सोमय्या म्हणाले, “समीर तु दलित नाही, तु मुस्लीम आहे. क्रांती रेडकर तुझा नवरा मुस्लीम आहे. त्याचं पहिलं लग्न नाही निकाह झाला होता. ‘समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है’, त्यांचा बाप नाही, ठाकरे सरकारचा बाप असलेल्या शरद पवार यांना विचारा १९९३-९४ मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं? दाऊदसोबत कोण बसलं होतं हे शरद पवार विसरले का? ठाकरे आणि पवारांना लाज वाटली पाहिजे. दाऊदचा संबंध कुणाशी आहे, दाऊद कुणाचा बाप आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलंय.” “नवाब मलिक यांनी तक्रारदारांचं अपहरण केलं” “स

समीर वानखेडे आणि अरुण हलदर यांच्या भेटीनंतर पुन्हा नवाब मलिकांचे वानखेडे कुटुंबीयांवर आरोप; म्हणाले…

आर्यन खानच्या अटकेनंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते, ते अद्यापही सुरूच आहेत. नवाब मलिक समीर वानखेडे यांच्यावर रोज नवनवे आरोप करत आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहेत. “समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय जन्माने मुस्लीमच आहेत. त्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली आहे,” असा दावा आज पुन्हा मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील लोकांना अटक केल्यानंतर समीर वानखेडे माध्यमांसमोर आले. परंतु २०१५ पासून त्यांनी स्वतःची ओळख लपवली, असंही नवाब मलिकांनी म्हटलंय. समीर वानखेडे यांनी शनिवारी मुंबईत एससी/एसटी आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर अरुण हलदर यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना समीर वानखेडे यांनी कोणताही धर्म परिवर्तन केलेला नाही, असे सांगितले होते. त्यानंतर नवाब मलिक यांनी आज पुन्हा वानखेडे आणि कुटंबीयांवर निशाणा साधलाय. हलदर यांच्या वक्तव्यावर नवाब मलिक म्हणाले, “हलदर जी तुम्ही संवैधानिक पदावर बसला आहात, त्यांची

मुंबईकरांना दिलासा! एका दिवसाच्या प्रवासासाठी मिळणार लोकलचं तिकीट; मात्र ‘ही’ अट असणारच…

करोना प्रादुर्भावामुळे दीर्घकाळापासून बंधनांमध्ये अडकलेल्या मुंबई लोकलला आता मोठा दिलासा मिळाला आहे. प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने टप्प्याटप्प्याने लोकल रेल्वे सुरू तर केली होती. मात्र त्यासाठी महिन्याभराचा पास काढणं बंधनकारक करण्यात आलं होतं. एका दिवसाच्या प्रवासासाठीचं तिकीट मिळत नव्हतं. पण आता एका दिवसासाठीचं तिकीटही दिलं जाणार आहे. आता लसीकरण पूर्ण होऊन १५ दिवस झालेल्या व्यक्तींना लोकलचं तिकीट मिळणार आहे. राज्य सरकारने लोकलची तिकीट विक्री बंद करून सर्वांना फक्त मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते. मात्र त्यामुळे गेले काही दिवस प्रचंड गोंधळ आणि संताप बघायला मिळाला होता. रेल्वेने ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्या नंतर राज्य सरकारने पुन्हा एक पत्र रेल्वेला लिहिले आहे. या पत्रात लसीकरण पूर्ण झालेल्या, अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या, अशा सर्वच प्रवाशांना एक दिवसीय तिकीट देण्यात यावे अशी विनंती केली आहे. यासंदर्भात एबीपी माझाने सविस्तर वृत्त दिलं आहे. ताज्या घडामोडींसाठी येथे क्लिक करा. त्यासाठी रेल्वेने अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावे, फ

“मी नशीबवान कारण माझी मुलं…”, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया

अभिनेते आणि नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सध्या चर्चेत असणाऱ्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचसोबत आपल्याला आपल्या तिन्ही मुलांचा अभिमान वाटतो, असंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी बॉलिवूड आणि ड्रग्जची समस्या याविषयावरही भाष्य केलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा बॉलिवूडच्या ड्रग्ज वापराबद्दल म्हणाले, हे कदाचित आव्हानात्मक असेल, पण प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना मार्गदर्शन करायला हवं. माझं आधीपासूनच हे स्पष्ट म्हणणं आहे. मी तंबाखूविरोधी मोहिमेचं समर्थन करतो. व्यसनांना, ड्रग्जला नाही म्हणा हे माझं सतत म्हणणं आहे. आणखी वाचा – “तो नशीबवान होता म्हणून नाहीतर…”, आर्यन खानच्या जामिनानंतर वकील सतीश मानेशिंदेंचं मोठं वक्तव्य आपलं व्यस्त वेळापत्रक सांभाळून मुलांना समजावायला, त्यांना मार्गदर्शन करायला बॉलिवूड सेलिब्रिटींना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, आज मी स्वतःला या बाबतीत नशीबवान समजतो. मला तीन मुलं आहेत, लव,कुश आणि सोनाक्षी. या तिघांनाही मी खूप चांगल्या पद्धतीने मोठं केलेलं आहे हे मी

“देशात चुली विझत आहेत, पण आपले पंतप्रधान स्वतःसाठी विशेष…” महागाईवरून संजय राऊतांचा हल्लाबोल

सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देशातील इंधन दरवाढ आणि एकूणच महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. महागाईचा भडका उत्साह जाळून टाकीत आहे. त्यावर सत्ताधारी भाजप पाकिस्तानात पेट्रोल १३७ रुपयांवर पोहचल्याची मखलाशी करत आहे. मात्र, ही वकिली करणाऱ्यांनी पाकिस्तानचे १३७ रुपये हिंदुस्थानात ५९ रुपये असल्याचं लक्षात घ्यावं, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसेच देशात चुली विझत असताना, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःसाठी विशेष विमान खरेदी करत आहे, अशीही टीका राऊत यांनी सामनाच्या ‘रोखठोक’ या सदरातकेली. संजय राऊत म्हणाले, “दिवाळी येत आहे. दिवाळी असली काय नसली काय, आतषबाजी कमी आणि फटाकेच जास्त फुटत असतात. राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके तर ३६५ दिवस फुटत असतात. कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यामुळे या वेळची दिवाळी मोकळ्या वातावरणात साजरी होईल; पण सण साजरे करावे असे वातावरण आज खरेच आहे काय? महागाईचा भडका उत्सवांचा उत्साह जाळून टाकीत आहे. त्या आगीत सत्ताधाऱ्यांच्या जळजळीत वक्तव्यांची भर पडत आहे. महागाई टोकाची आहे. ती कमी करता येत नसेल तर होरपळणाऱ्या जनतेच्य

आर्यन खान प्रकरण: सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाच्या वकिलांनी NCB ला फटकारलं; म्हणाले, “ते प्रसिद्धीसाठी…”

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाची कायदेशीर बाजू संभाळणारे ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीला (NCB) फटकारलं आहे. एनसीबीची कार्यपद्धती पाहता ते प्रसिद्धीसाठी उत्सूक असतात आणि ज्या केसमुळे माध्यमांच्या प्रसिद्धीझोतात येता येईल अशीच प्रकरणं निवडली जात असल्याचा गंभीर आरोप विकास सिंह यांनी केलाय. ते ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची अटक आणि जामीन या पार्श्वभूमीवर एनडीटीव्हीशी बोलत होते. “दिल्लीतील शक्तीशाली लोकांच्या पार्टीवर छापे टाका” विकास सिंह म्हणाले, “एनसीबी प्रसिद्धी माध्यमांमध्ये झळकायला आतूर झालेली असते. मुळात ही सर्व प्रकरणं प्रसिद्धीझोतात येण्यासाठीच निवडली जातात. ते केवळ कमी कालावधीसाठी ड्रग्जच्या सापळ्यात अडकलेल्या लोकांना लक्ष्य करत आहे. आमची मुलं आम्हाला सांगतात की दिल्लीत वेगवेगळ्या पार्टींमध्ये मुलं ड्रग्जचं सेवन करतात. जर एनसीबीचा काम करण्याचा स्तर हा असेल तर त्यांनी दिल्लीत शक्तीशाली लोकांच्या सुरू असलेल्या पार्टींवर छापे टाकावेत.” “एनसीबी मोठ्या माशांवर कारवाई करण्याऐवजी लोकांचं लक्ष दुसरीकडे नेत आ

“त्यांनी हे प्रकरण खूपच…”; आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांचे NCB वर गंभीर आरोप

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा कालच कारागृहातून जामिनावर सुटून घरी परतला. २ ऑक्टोबरपासून त्याच्यासंदर्भात घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींबद्दल त्याचे वकील मुकुल रोहतगी यांनी भाष्य केलं आहे. आर्यनविरोधातली केस NCBने फार खेचली, असं मत रोहतगी यांनी व्यक्त केलं आहे. आर्यनविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. याबद्दल त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. रोहतगी म्हणाले, तपास यंत्रणा लोकांना अटक झाल्यानंतर तुरुंगात ठेवण्याचा प्रयत्न करतात. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणांना संवेदनशील करणे तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या जामिनाच्या निर्णयावर बोलताना ते म्हणाले, या प्रकरणात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे- आर्यनकडे कोणतंही ड्रग सापडलं नाही. तो अरबाझ मर्चंट सोबत तिथे होता आणि दुसरं म्हणजे त्याने ड्रग्जचं सेवन केल्याचे, सोबत बाळगल्याचे किंवा विक्री-खरेदी केल्याचे कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत. तरी NCB ने हे प्रकरण व्यावसायिक बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ते लांबलं. हेही वाचा –

खरेदीला उत्साहाचे उधाण..; दिवाळीनिमित्त मुंबई ठाण्यासह राज्यभरातील बाजारपेठांमध्ये गजबज

दिवाळीनिमित्त मुंबई ठाण्यासह राज्यभरातील बाजारपेठांमध्ये गजबज मुंबई, नागपूर, पुणे : गेल्या वर्षी करोनामुळे दिवाळीचा आनंद क्षीणक्षीण झालेला पाहायला मिळाला. त्या वाया गेलेल्या वर्षाची भरपाई करणारा सणउत्साह राज्यात सप्ताहअंती सर्वत्र दिसला. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिकसह सर्वच शहरगावांतील बाजारपेठा  शनिवारी तुडुंब भरल्या. कपड्यांपासून आकाश कंदीलांपर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून दागिन्यांच्या खरेदीसाठी नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. दीड वर्षानंतर मोठी खरेदी होत असल्याने व्यापारी वर्गातही आनंदाचे वातावरण आहे. मुंबईतील महत्त्वाच्या बाजारपेठांसह उपनगरांतील खरेदीगल्ल्यांमध्ये नागरिकांची झुंबड उडाली होती. दुपारनंतर बाजारपेठा गजबजल्या. एरव्ही संध्याकाळी कार्यालयातून घरी परतणारा नोकरदारवर्ग दुपारीच बाजारपेठेत दाखल झाला. रांगोळ्या, रंग, छाप, तोरण, फुले, माळा, सजावटीच्या वस्तू, कपडे विक्रेत्यांभोवती ग्राहकांचा गराडा होता. साड्यांची दुकाने महिला वर्गाने भरून गेली होती.  ग्राहक वाढल्याने बाजाराला लागून असलेल्या खाऊगल्ल्यांचाही थाट वाढला होता. दादर कबुरतरखाना, स्थानक परिसर, किर्ती

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची नियमावलीही रखडली

|| उमाकांत देशपांडे जिल्हा व राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाबाबत अधिसूचना काढण्यात सरकार उदासीन मुंबई : केंद्र सरकारने नवीन ग्राहक संरक्षण कायदा लागू केला असला तरी तंटा निवारणाची आर्थिक मर्यादा वाढवून देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात राज्य सरकार उदासीन आहे. तर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची नियमावलीही रखडल्याने कामकाजात कायदेशीर व तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारने ग्राहक आयोगांच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्यांमध्ये उदासीनता दाखविली असतानाच या तांत्रिक बाबींकडेही दुर्लक्ष केल्याने मुंबई ग्राहक पंचायतीने आता केंद्र व राज्य सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देशात नवीन ग्राहक संरक्षण कायदा २० जुलै २०२० रोजी लागू झाला होता. पण त्याबाबतची अधिसूचनाच केंद्र सरकारने काढली नव्हती आणि आयोगांचे कामकाज सुरू होते. ते बेकायदेशीर ठरण्याचे निदर्शनास आणून दिल्यावर केंद्र सरकारने १५ मार्च २०२१ रोजी पूर्वलक्षी प्रभावाने अधिसूचना जारी केली. त्यानंतर राज्य सरकारने जिल्हा व राज्य ग्राहक आयोगांसाठी अधिसूचना जारी करण्याच्या सूचना केंद्राने सर्व राज्य सरकारां

आर्यनची तुरुंगातून सुटका; शाहरूखच्या चाहत्यांची गर्दी

मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानची जवळपास २६ दिवसांनंतर शनिवारी तुरुंगातून सुटका झाली. सुटकेनंतर तो थेट वांद्रे येथील मन्नत या निवासस्थानी गेला. शाहरूख खान याच्या चाहत्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करीत आर्यनचे तुरुंगाबाहेर स्वागत केले. केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) क्रूझ टर्मिनसवर केलेल्या कारवाईत आर्यन खानसह मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ मर्चंट यांना अटक केली होती. त्यांच्याकडून १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या आणि एक लाख ३३ हजार रोख रुपये जप्त केले होते. आर्यनला २ ऑक्टोबरला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर ३ ऑक्टोबरला त्याला ‘एनसीबी’ने अटक केली. त्यामुळे २ ते ७ ऑक्टोबरपर्यंत तो ‘एनसीबी’च्या कोठडीत होता. त्यानंतर ७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत तो मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात होता. आर्यनची जामीन प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. त्यानंतर तुरुंगातील प्रक्रिया शनिवारी सकाळी पूर्ण झाल्यानंतर आर्यनला सकाळी ११ वाजता सोडण्यात आल

कोपरी रेल्वे उड्डाणपुलाचे काम दिवाळीनंतरच

आढावा बैठकीतून स्पष्ट ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी रेल्वे उड्डाणपुलाच्या मुख्य मार्गिकांच्या निर्माणासंदर्भातील आढावा बैठक ठाणे पालिकेच्या यूआरसीटी केंद्रात आयोजित करण्यात आली होती. सेवा रस्त्यांची डागडुजी तसेच काही उपाययोजना केल्यानंतरच मुख्य मार्गिकांचे काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठी आठवडा लागणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. त्यामुळे दिवाळीनंतरच कोपरी पुलाच्या मुख्य मार्गिकेचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे उड्डाणपुलावरून दिवसाला हजारो वाहने मुंबई, ठाण्याच्या दिशेने वाहतूक करतात. मात्र हा पूल अरुंद असल्याने त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होतो. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे एमएमआरडीए आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच पुलाच्या दोन नव्या मार्गिका बांधून पूर्ण झाल्या असून या नव्या मार्गिकांवरून वाहतूक सुरू झाली आहे. प्रशासनाकडून आता मुख्य मार्गिकांच्या निर्माणाचे काम हाती घेतले जाणार आहे. मुख्य मार्गिका   बंद झाल्यास सकाळी आणि रात्रीच्या वेळी या भागात वाहतूक कोंडी    होण्याची शक

दिवाळी भेट योजनेअंतर्गत पोलिसांना ७५० रुपयांची सवलत

मुंबई: दिवाळीनिमित्त मुंबई पोलिसांना आवश्यक साहित्यावर ७५० रुपये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.  पोलीस कल्याण निधीतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, प्रोत्साहन, विविध अधिकारी कर्मचारी सत्कार, आरोग्यविषयक सुविधा, व्यायामशाळा, वाचनालय तसेच पोलिसांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलीस आयुक्तालय दिवाळी शुभेच्छा, मिठाई आणि भेटवस्तू स्वरूपात दरवर्षी देत होते.  ‘या निर्णयामुळे पोलीस सबसिडीयरी कॅन्टीनमधून खरेदी केलेल्या साहित्यावर तीस टक्के सवलत मिळते आहे. याबरोबरच यावर्षी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पसंतीचे व आवश्यक असे दिवाळी सणासाठी लागणाऱ्या साहित्यामधील ७५० रुपये किमतीचे साहित्यदेखील मोफत मिळणार आहे. The post दिवाळी भेट योजनेअंतर्गत पोलिसांना ७५० रुपयांची सवलत appeared first on Loksatta . from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mrmLOU

आर्यनचा मित्र असल्याच्या बढाया मारणारा अटकेत

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी आर्थर रोड तुरुंगात झालेल्या मैत्रीबाबत वृत्तवाहिन्यांना मुलाखती देणे आणि बढाई मारणे एका आरोपीला महाग पडले. जुहू पोलीस याच आरोपीचा घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये शोध घेत होते. मुलाखत पाहिल्यानंतर पोलिसांनी तुरुंगासमोरच त्याला अटक केली.    धारावीचा रहिवासी श्रावण नाडर याला माटुंगा पोलिसांनी एका चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. याप्रकरणी न्यायालयीन कोठडी झाल्यावर तो आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात होता. तो आणि आर्यन खान साधारण एकाच वेळी तुरुंगात होतो, असा दावा त्याने केला आहे. सुमारे १० दिवसांपूर्वी नाडरला जामीन मिळाला.मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनला गुरुवारी जामीन मंजूर केला तेव्हा वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांवर बातमी पाहून आर्यन बाहेर येईल, या अपेक्षेने नाडर गुरुवारी रात्री आर्थर रोड तुरुंग परिसरात गेला होता. पण आर्यन त्या रात्री तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही. नाडरने उपस्थित वाहिन्यांच्या प्रतिनिधींना तो तुरुंगात आर्यनसोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रतिनिधी नाडरची मुलाखत घेऊ लागले. The post आर्यनचा मित्र असल्याच्या बढाया मारणारा अटकेत appear

तयारीविना दहावीचा ‘ऑनलाइन’ निकाल; चौकशी समितीचा ठपका

|| रेश्मा शिवडेकर मुंबई : तांत्रिक तयारी नसताना इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्याचा अट्टहास निकालाचे संके तस्थळ कोलमडून पडण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका या प्रकारची चौकशी करणाऱ्या समितीने ठेवला आहे. ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’चा दहावीचा निकाल १६ जुलैला ऑनलाइन जाहीर करण्यात येणार होता. मात्र निकाल जाहीर होण्याच्या (दुपारी १ वाजता) आधीच म्हणजे दुपारी १२.५८च्या सुमारास मंडळाचे संकेतस्थळ कोलमडून (क्रॅश) पडले होते. ते पाच-सहा तासांनी म्हणजे सायंकाळच्या सुमारास पूर्वपदावर आले. तोपर्यंत या परीक्षेला बसलेले १६ लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक, शाळाचालक निकाल पाहता येत नसल्याने चांगलेच हवालदिल झाले. मंडळाने दहावी-बारावीचे निकाल ऑनलाइन लावण्यास सुरुवात केल्यानंतर असे प्रथमच घडत होते. या अभूतपूर्व गोंधळानंतर शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून या प्रकाराचा छडा लावण्याचा निर्णय घेतला. या समितीचा अहवाल विभागाला सादर करण्यात आला आहे. मंडळाची तांत्रिक तयारी नसताना निकाल जाहीर करण्याची घाई या गोंधळाला कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण स

चिकुनगुनियाचे पाच वर्षांतील सर्वाधिक रुग्ण; राज्यातील रुग्णसंख्या दोन हजारांवर

 मुंबई:  राज्यात गेल्या चार वर्षाच्या तुलनेत यावर्षी चिकुनगुनियाचा प्रसार वेगाने वाढला असून ऑक्टोबरमध्येच रुग्णसंख्येने दोन हजाराचा आकडा पार केला आहे. पाच वर्षांपूर्वी २०१६ मध्ये राज्यात २ हजार ९४९ रुग्ण आढळले होते. राज्यात करोनाच्या साथीचा प्रसार गेल्या काही महिन्यांपासून मंदावत असला तरी डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव मात्र वाढला आहे. राज्यात २०१६ साली चिकुनगुनियाचा उद्रेक वाढल्यानंतर २०१७ पासून दरवर्षी प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मात्र या काळात रुग्णसंख्या दोन हजारांपेक्षा कमी राहिली. गेल्यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव जास्त चिकुनगुनियाच्या चाचण्या फारशा झाल्या नाहीत. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठी घसरण झाल्याचे आढळले. २०२० मध्ये चिकुनगुनियाचे ७८२ रुग्ण आढळले होते. यावर्षी मात्र चिकुगुनियाचा प्रसार वेगाने झाला असून जानेवारी ते ऑक्टोबर या काळातच २ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ‘चिकुनगुनिया आणि डेंग्यूचा प्रसार हे एडिस इजिप्ती या एकाच डासापासून होत असल्यामुळे डेंग्यूचा फैलाव वाढला की चिकुनगुनियाचा प्रसारही वाढतो. राज्यात २०१८ पासून डेंग्यूचा प्रसार वाढत असल्याने चिकुनगुनियाचे प्र