मुंबई : संस्कृत विषयाकडे हमखास गुण मिळवण्याचा विषय म्हणून पाहिले जाते. परंतु त्यापलीकडे जाऊन संस्कृत भाषा जपली आणि मनामनांत जागवली गेली तर आपली संस्कृती कळेल व चांगले संस्कार होतील. त्यामुळे केवळ भाषांतर किंवा पाठांतरापुरता या भाषेचा विचार करून चालणार नाही तर या भाषेतील ज्ञान आणि संस्कार मनामनांत बिंबवले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले. तर संस्कृत विद्यापीठाची पुणे, परभणी, जळगाव व ठाणे येथे भविष्यात उपकेंद्रे स्थापन करण्याचे नियोजित असून त्यास शासनाने सहकार्य करावे अशी अपेक्षा कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांनी व्यक्त केली.
रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वाविद्यालयाच्या रत्नागिरी येथील उपकेंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. प्रत्यक्ष व दूरचित्रसंवादाच्या माध्यामातून पार पडलेल्या या कार्यक्रमास रत्नागिरीचे पालकमंत्री तथा परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वाविद्यालयाचे कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती, कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी, रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे आदी उपस्थित होते.
The post ‘संस्कृत भाषा जपणे आवश्यक’ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/39CNjW9

Comments
Post a Comment