Skip to main content

Posts

Showing posts from April, 2022

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

School Evaluation: 'नॅक'च्या धर्तीवर होणार शाळांचे मू्ल्यांकन

केंद्राच्या नॅक समितीच्या धर्तीवर शाळांचीही तपासणी करण्यासाठी शाळा मानक प्राधिकरण काम करणार आहे. त्यानुसार शाळा मानक प्राधिकरण स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2N3JHuq

CUET 2022: कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात

शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. ही नोंदणीची प्रक्रिया ३० एप्रिल २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट cuet.samarth.ac.in वर जाऊन नोंदणी करू शकतील. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4dxcRkJ

एलिमेंटरी, इंटरमिजिएट नोंदणीसाठी मुदतवाढ

एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेसाठी अद्याप काही केंद्रांनी नोंदणी केलेली नाही; तसेच परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी केंद्र नोंदणी, विद्यार्थी नोंदणी, परीक्षक, समालोचक आणि उपमुख्य समालोचक नोंदणी आणि परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JqIyTRN

IIT Madras: ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनाही करता येणार BSc डेटा सायन्ससाठी अर्ज

आयआयटी मद्रासमध्ये होणाऱ्या बीएससी डेटा सायन्स अभ्यासक्रमासाठी अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी देखील प्रवेश घेऊ शकणार आहेत. जेईई अॅडव्हान्स २०२१ परीक्षेसाठी पात्र झालेले शिकाऊ उमेदवार थेट मे २०२२ अभ्यासक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DAXZCwt

MPSC Result 2022: महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवार मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र असतील. यासोबतच आयोगाने मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले जाणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया ५ ऑक्टोबर रोजी सुरू झाली आणि १ जानेवारी २०२२ रोजी संपली. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण २९० पदांची भरती केली जाणार आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mUtf1W0

मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमधील नामफलक आता मराठीत

मुंबई विद्यापीठाच्या अलीकडेच पार पडलेल्या अधिसभेत युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यापीठाने परिपत्रक जारी केले आहे. महाविद्यालयाच्या नावाचे फलक आता मराठी भाषेत झळकणार आहेत. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UBroH9y

आर्किटेक्चर प्रवेशासाठी आता PCM आवश्यक, सर्व महाविद्यालयांना लागू होणार निर्णय

बॅचलर ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये पीसीएस हा अनिवार्य विषय घेणे आवश्यक आहे. आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पीसीएम अनिवार्य करण्याचा निर्णय सर्व महाविद्यालयांना लागू असणार आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Z1KgATN

Pariksha Pe Charcha 2022: परीक्षेला उत्सवी वातावरणात सामोरे जा - पंतप्रधान

विद्यार्थ्यांचा मनातील परीक्षेची भिती, परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी-पालकांशी संवाद साधला. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनालाही पंतप्रधान मोदींनी भेट दिली. सुमारे १५ लाख विद्यार्थी आणि अडीच लाख शिक्षकांनी देशभरातून या कार्यक्रमाला हजेरी लावली. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8JsAFKi

नवीन वैद्यकीय शिक्षण प्रणाली अंतर्गत विद्यार्थ्यांना 'हे' काम करणे अनिवार्य

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आपले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना डॉक्टर हिप्पोक्रॅटिक ओथऐवजी महर्षी चरक यांच्या नावाने शपथ घ्यावी लागणार आहे. यासोबतच शिक्षण घेत असलेल्या संस्थेच्या जवळचे गाव दत्तक घ्यावे लागणार आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nE2PVHd