Skip to main content

Posts

Showing posts from 2021

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मिळणार १२ लाख फ्री कूपन, जाणून घ्या तपशील

Free Coupon Scheme: उत्तम नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच स्किल डेव्हलपमेंटची गरज असते. उच्च शिक्षणाअंतर्गत स्किल डेव्हलपमेंटमध्ये डिजिटल कोर्स करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची सुवर्णसंधी आहे. एआयसीटीई (AICTE) ने विविध खासगी कंपन्यांच्या सहकार्याने NEAT (National Alliance) पोर्टल सुरू केले आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना कोर्ससाठी नोंदणी करता येणार आहे. यामध्ये एससी, एसटी, ओबीसी आणि इडब्ल्यूएस वर्गातील मुलांना १२ लाख मोफत कूपन देण्यात येणार आहेत. नोंदणीची तारीख एआयसीटीईची संलग्न विद्यापीठे, महाविद्यालये, संस्थांमध्ये शिकणारी मुले तसेच विद्यापीठे, महाविद्यालये, यूजीसी, इग्नू आणि इतर संस्थांशी संलग्न संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थ्यी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. पीपीपी मोडमध्ये सुरू झालेल्या NEAT पोर्टलवर नोंदणी करून कोणताही विद्यार्थी अभ्यास करू शकतो. एससी, एसटी, ओबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गातील मुलांना मोफत नोंदणीची संधी मिळते. ही सुविधा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना २ जानेवारी २०२२ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करणे आवश्यक आहे

गुड न्यूज! नव्या वर्षात एमपीएससीमार्फत ७५६० पदांची होणार भरती

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे () आणि सरळसेवेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. २०२१ वर्षाअखेरीपर्यंत ''ने राज्याच्या विविध विभागांकडून मागवलेल्या रिक्त जागांच्या माहितीपत्रात ७५६० जागा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे येत्या वर्षात 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळणार आहे. राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये 'अ', 'ब' आणि 'क' गटांतील एकूण किती पदे रिक्त आहेत, याबाबतचे मागणीपत्र देण्यास 'एमपीएससी'ने सांगितले होते. त्याप्रमाणे राज्याच्या २५ विभागांमधील रिक्त असलेल्या पदांची संख्या 'एमपीएससी'कडे प्राप्त झाली असून, राज्यात तिन्ही गटांच्या एकूण ७५६० जागा रिक्त आहेत. यामुळे यातील ४३२७ पदांसाठी जाहीराती यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या आहेत. या परीक्षांत पुढील काही महिन्यात होणार आहेत. याचबरोबर उर्वरित ३२३३ जागांसाठीच्या परीक्षा याच वर्षी घेण्यात येणार आहेत. यामुळे नवे वर्ष 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी घेऊन येणार आहे. राज्यातील सामान्य प्रशासन विभाग, क

गरजू विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात; दीड कोटींचे अर्थसहाय्य

मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागात शिकत असणाऱ्या गरजू, आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ाने मदतीचा हात पुढे करत रुपये १ कोटी ५७ लाख ८२ हजारांचे अर्थसहाय्य केले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध चार योजनांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. यामध्ये पुस्तकपेढी योजनेअंतर्गत ७१ लाख ५१ हजार रुपये, आर्थिकदृष्ट्या गरजू आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ३ लाख १७ हजार ५८० रुपये, महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५८ लाख ८१ हजार ५०० रुपये, तर विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागात शिकत असणाऱ्या एस.सी./ एस.टी./ डी.टी./ एन.टी. विद्यार्थ्यांना २४ लाख ३२ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागात शिकत असणाऱ्या गरजू, आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांअतर्गत योजना राबव

AIMA MAT Result 2021: मॅट परीक्षेचा निकाल जाहीर

MAT निकाल 2021: (AIMA)ने डिसेंबरमध्ये झालेल्या MAT परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार AIMA MAT च्या अधिकृत वेबसाइट mat.aima.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. विद्यार्थी त्यांचा MAT रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक टाकून डिसेंबर सत्रासाठी AIMA MAT निकाल 2021 पाहू शकतात. MAT डिसेंबर 2021 स्कोअरकार्ड एक वर्षासाठी वैध आहे आणि उमेदवारांना MAT स्कोअरकार्ड 2021 ची कोणतीही हार्ड कॉपी मिळणार नाही, हे ध्यानात घ्यावे. MAT निकाल 2021 कसा तपासायचा? - AIMA MAT ची अधिकृत वेबसाइट mat.aima.in ला भेट द्या. - होमपेजवर डाऊनलोड/व्ह्यू टॅबवर क्लिक करा. - ड्रॉपडाउन मेनूमधून, MAT Result टॅबवर क्लिक करा. - उमेदवारांसाठी एक नवीन पेज उघडेल. - विचारलेली माहिती भरा आणि सबमिट करा. - डिसेंबरसाठी MAT स्कोअरकार्डवर क्लिक करा. - स्क्रीनवर MAT स्कोअरकार्ड 2021 दिसेल. तुम्ही तुमचा निकाल मोबाईल एसएमएसद्वारे पाहू शकता (मोबाईलद्वारे निकाल तपासा) MAT निकाल 2021 उमेदवारांना SMS द्वारे देखील उपलब्ध आहे. एसएमएसद्वारे स्कोअर पाहण्यासाठी, MAT अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आदि माहिती भरून ५४२४२ या क्रमांकावर ए

NEET PG Counselling: ६ जानेवारीपूर्वी सुरू होणार नीट पीजी काऊन्सेलिंग

Schedule Updates: च्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. नीट पीजी २०२१ अॅडमिशन (NEET PG admission)साठी काऊन्सेलिंग प्रक्रिया ६ जानेवारी २०२२ च्या पूर्वी सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya)यांनी इंडियन मेडिकल एसोसिएशनला ()हे आश्वासन दिले आहे. आयएमए प्रेसिडेंट सहजानंद प्रसाद सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आयएमएने केंद्रीय आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांना आंदोलनकर्त्या ज्युनिअर डॉक्टरांविरुद्ध दाखल एफआयआर बिनशर्त मागे घेण्याचे आवाहन केले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांनी सांगितले की या डॉक्टरांविरुद्ध कोणतीही एफआयआर दाखल होणार नाही. आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष (IMA President) सहजानंद प्रसाद सिंह (Sahajanand Prasad Singh) यांनी ३० डिसेंबर २०२१ रोजी अन्य सदस्यांसह केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. आरोग्यमंत्र्यांना यावेळी मेडिकल पीजी कोर्सेसमधील प्रवेशांना होणाऱ्या विलंबावर तोडगा काढण्याचे आवाहन करण्यात आले. आयएमएने म्हटले आहे की‘हजारो डॉक्टर एक वर्ष किंवा अधिक काळापासून मेडिकल

शाळा सुरू राहणार की बंद होणार? काय म्हणाले आरोग्यमंत्री

‘करोना रुग्णसंख्या वाढत असली, तरी तूर्तास सुरूच राहिल्या पाहिजेत, हा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळेत लस न देता मुलांना लसीकरण केंद्रांवर नेऊन लस द्यावी, असा विचार पुढे आला आहे. त्यासाठी केंद्रांवर मुलांना बसने नेले जावे, अशी चर्चा झाली. त्याला मुख्यमंत्र्यांनी यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे,’ असेही टोपे म्हणाले. ‘राज्यातील ९० टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. तर ५७ टक्के लोकांचे दोन्ही डोस झाले आहेत. ज्या जिल्ह्यात कमी लसीकरण झाले आहे, त्या जिल्ह्यात लसीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत या संदर्भात प्रशासनाची बैठक होईल. लसीकरणात मागे असलेले जिल्हे राज्य सरासरीवर आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील,’ अशी माहिती टोपे यांनी दिली. राज्यात करोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या आणि ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या एक-दोन दिवसांत कठोर निर्बंध लागू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री यांनी गुरुवारी दिली.

CAT 2021 Result: कॅट परीक्षेचा निकाल कधी? जाणून घ्या...

कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2021) चा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमार्फत ही परीक्षा घेण्यात आली आहे. ३ जानेवारीपर्यंत कॅट परीक्षेचा निकाल अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे पर्सेंटाइल गुण आणि गुणपत्रिका अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर उपलब्ध होईल. निकाल कधीपर्यंत जाहीर केला जाणार त्याबाबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण मागील वर्षांचे ट्रेंड्स पाहता निकाल दुपारी १ वाजेपर्यंत जाहीर केला जातो. विद्यार्थ्यांना त्यांचा युजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने कॅट २०२१ स्कोअर कार्ड डाऊनलोड करता येईल. आयआयएम त्यांचे प्रवेशाचे निकष जाहीर करतील. विद्यार्थी त्यांचे कॅट पर्सेंटाइल तपासून पुढे प्रवेशाची प्रक्रिया पार पाडू शकतात. CAT 2021 परीक्षा यंदा दोन लाख विद्यार्थ्यांनी दिली आहे. परीक्षा २८ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. सर्व कोविड-१९ प्रोटोकॉल पाळून परीक्षा घेण्यात आली आहे. प्रोव्हिजनल उत्तरतालिका ८ डिसेंबर २०२१ रोजी जारी करण्यात आली होती. उमेदवारांना हरकती घेण्यासाठी मुदत देण्यात आली

पुणे विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाइनच घ्याव्यात: समिती

म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे () घेण्यात येणाऱ्या पदविका, पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 'ऑफलाइन' पद्धतीनेच घ्याव्यात, असा अहवाल परीक्षा समितीने विद्यापीठाकडे सुपूर्द केला आहे. अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, असेही या अहवालात नमूद करण्यात आल्याचे विद्यापीठातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा यंदा कशा पद्धतीने घ्यायच्या, यासाठी काही दिवसांपूर्वी विद्यापीठ प्रशासन व परीक्षा नियंत्रक मंडळाने अभ्यास समितीची स्थापना केली होती. ओमायक्रॉनचा धोका, विद्यार्थ्यांची महाविद्यालय; तसेच विद्यापीठातील अपुरी संख्या आणि वसतिगृहे बंद असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी याही वर्षी ऑनलाइन परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने परीक्षांबाबत अभ्यास करण्यासाठी समितीची नियुक्ती केली. या समितीने परीक्षांबाबत अहवाल सादर करणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे समितीने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळ

शिष्यवृत्ती परीक्षेचा बनावट निकाल व्हायरल

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी निकालापूर्वीच व्हायरल झाल्याने गुरुवारी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होण्यास सुरुवात झाली. मात्र ही यादी अधिकृत नसल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले. राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यंदा १२ ऑगस्ट रोजी पाचवीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी गुरुवारी दिवसभर व्हायरल झाली. या यादीच्या आधारे विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचे तसेच, शाळांचे आभार मानणारे फोनही सुरू झाले. मात्र शाळांच्या मुख्याध्यापकांनी सावध पवित्रा घेत अद्याप आमच्याकडे अशी कोणीतीही यादी आली नसल्याचे सांगत पालकांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. राज्य परीक्षा परिषदेने वेबसाइटवर अद्याप अधिकृत निकाल जाहीर झाला नसल्याचे दुपारी स्पष्ट केले. मग ही यादी व्हायरल कुठून झाली असा प्रश्न उपस्थित झाला. या परीक्षेचा तात्पुरता निकाल २४ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला होता. यावर हरकत नोंदविण्याची मुदत संपल्या

टीकाकार उमेदवारांविरुद्ध 'एमपीएससी'ची आचारसंहिता

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य लोकसेवा आयोगाच्या () परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. याचबरोबर यामध्ये वेगवेगळी विघ्नेही येत आहेत. यामुळे नाराज विद्यार्थी समाजमाध्यमांवरून तसेच प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त होत असतात; मात्र आयोगाविरोधातील अशा टीका-टिप्पणी रोखण्यासाठी नियमावली करण्यात आली आहे. आयोगाने अशा टीकेवर आक्षेप घेतल्यास उमेदवार काही वर्षे या परीक्षेस अपात्रही ठरू शकतात. याबाबत आयोगाने गुरुवारी परिपत्रक काढले आहे. उमेदवारांनी लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेसंदर्भात; तसेच आयोगाच्या विरोधात असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेतील टीकाटिप्पणी आणि संभाषण केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. या परिपत्रकानुसार एखाद्या उमेदवाराला आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीपासून कायमस्वरूपी अथवा काही विशिष्ट कालावधीसाठी अपात्र करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. आयोगाने हे परिपत्रक काढून उमेदवारांना याविषयी थेट इशारा दिला आहे; तसेच संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आयोगाच्या माहिती-तंत्रज्ञान

'अटल रँकिंग ऑफ इनोव्हेशन'मध्ये पुणे विद्यापीठ देशात आठवे

म. टा. प्रतिनिधी, पुणे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या 'अटल' ( achievements) या नवोपक्रम राष्ट्रीय क्रमवारीत सावित्रीबाई फुले ाने देशात आठवे स्थान मिळवले आहे. राज्य पातळीवरील विद्यापीठांमध्ये विद्यापीठाला पहिले स्थान मिळाले आहे. विद्यापीठातील नवोपक्रम केंद्राने केवळ अडीच वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय क्रमवारीत स्थान मिळवल्याने विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. देशातील शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये नवनव्या संकल्पना राबवून उद्योजकता विकास होण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे (AICTE) जाहीर केले जाते. २०२१ शैक्षणिक वर्षात देशातील १४३८ शिक्षणसंस्थांनी या क्रमवारीत सहभाग घेतला होता. त्यामध्ये आयआयटी, एनआयटी आयआयएससी आदी संस्थांचाही समावेश आहे. यामध्ये देशातील अभिमत व राज्य विद्यापीठांच्या पहिल्या दहा विद्यापीठाच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्थान मिळवले आहे. केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी बुधवारी ही क्रमवारी जाहीर केली. गेल्या वर्षभरात विद्यापीठामध्ये स्टार्टअप, नवोपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी विषय

भारतीय सैन्य दलात भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांना संधी

Indian Army Artillery Recruitment 2022: भारतीय सैन्यात (Indian Army) भरती होऊन देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय सैन्याने आर्टिलरी भरती २०२२ चे नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार भारतीय सैन्याची अधिकृत वेबसाइट indianarmy.nic.in च्या माध्यमातून अर्ज कर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ जानेवारी २०२२ आहे. या भरतीच्या माध्यमातून (Sena Bharti 2022) लोअर डिवीजन क्लर्क (LDC), मॉडल वर्कर, कारपेंटर, स्वयंपाकी, रेंज लस्कर, फायरमन आदि विविध पदांवर १०७ रिक्त पदे भरली जाणार आहेत. मागील भरती जाहिरातीच्या आधारे ज्यांनी अर्ज भरला आहे, त्या सर्वांना लेटेस्ट नोटिफिकेशनच्या आधारे नव्याने अर्ज दाखल करायचा आहे. भारतीय सेना आर्टिलरी भरती २०२२ नोटिफिकेशनची थेट लिंक या वृत्तात पुढे दिली आहे. Indian Army Artillery Vacancy 2022 Details: पदांची माहिती पुढीलप्रमाणे - लोअर डिवीजन क्लर्क (LDC) - २७ पदे मॉडल मेकर - १ पद कारपेंटर - २ पदे स्वयंपाकी - २ पदे रेंज लस्कर - ८ पदे फायरमन - १ पद अर्टी लस्कर -७ पदे न्हावी - २ पदे धोबी - ३ पदे मल्टी टा

विधी अभ्यासक्रमांच्या नोंदणीत वाढ; LLB तीन आणि पाच वर्ष अभ्यासक्रमांना मागणी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई विधिज्ञांची वाढती मागणी लक्षात घेत विधी अभ्यासक्रमालाही मागणी वाढली आहे. यावर्षी एलएलबी तीन वर्ष या अभ्यासक्रमासाठी ४६ हजार १६७ अर्ज आले आहेत. गतवर्षी करोनामुळे ही संख्या कमी होती. विधी क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी कोणत्याही शाखेतील पदवी घेतल्यानंतर तीन वर्षांचा कायदेविषयक अभ्यासक्रम (एलएलबी) किंवा बारावी उत्तीर्ण होऊन पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाकडे लक्ष वेधत आहेत. गेल्यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे विद्यार्थ्यांची नोंदणी कमी दिसली. यंदा सुमारे नोंदणीत ६ हजारांनी वाढ झाली आहे. एलएलबी अभ्यासक्रमासाठी अर्ज भरण्याचे दिसून येते. यावर्षी एलएलबी तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी ४६ हजार १६७ अर्ज आले होते. त्यापैकी प्रवेशात ४२ हजार ९३८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. तर पहिल्या फेरीसाठी ४१ हजार विद्यार्थ्यांनी कॉलेजांचे पसंतीक्रम भरल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3z8WzNE

Change in Syllabus: फार्मसी डिप्लोमाच्या अभ्यासक्रमात बदल

म. टा. प्रतिनिधी, पुणे औषधनिर्माण (Pharmacy) पदविका (Diploma ) अभ्यासक्रमांसाठी गेल्या २५ वर्षांपासून राबवण्यात आलेला अभ्यासक्रम अखेर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य तंत्रशिक्षण मंडळाने () शैक्षणिक वर्ष २०२१ पासून नवा अभ्यासक्रम लागू केला आहे. या अंतर्गत अध्यापन व परीक्षा पद्धती तयार केली असून, त्याला 'जे स्कीम' असे नाव देण्यात आले आहे. या शैक्षणिक वर्षापासूनच हा अभ्यासक्रम लागू होणार असल्याने यंदा फार्मसीच्या डिप्लोमाला प्रवेश घेणारे विद्यार्थी नव्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेणार आहेत. केंद्र सरकारतर्फे फार्मसीच्या डिप्लोमासाठी शैक्षणिक अधिनियम २०२० प्रसिद्ध करण्यात आले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (Pharmacy Council of India, PCI) दिल्या होत्या. यामुळे यंदा फार्मसीचे विद्यार्थी नव्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेतील, असा निर्णय तंत्रशिक्षण मंडळाने घेतला आहे. तंत्रशिक्षण मंडळाने संबंधित अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यासाठी अध्यापन आणि परीक्षा पद्धती तयार केली असून, ही पद्धत 'जे स्कीम' म्हणून राबविण्यात येईल. ह

दहावी, बारावीच्या परीक्षार्थ्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे आगामी दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अर्जात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाकडे आतापर्यंत दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांचे १४ लाख ४७ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्या परीक्षा २०२१ मध्ये होणार होत्या त्यासाठी दहावीच्या १६ लाख ६३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते; तर बारावीच्या १३ लाख ९० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. गेल्या वर्षीची ही संख्या लक्षात घेतल्यास डिसेंबर महिन्यात दोन्ही परीक्षांसाठी इतके अर्ज दाखल झाल्याने यंदा दोन्ही परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. गेल्या वर्षी करोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षांचे अर्ज केले नव्हते. शहरी आणि ग्रामीण भागांत विद्यार्थ्यांच्या घरात करोनाचा प्रादुर्भाव असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षांचे अर्ज भर

Government Job: राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेत भरती; मुंबईत नोकरीची संधी

राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई येथे विविध पदांची भरती आहे. केंद्र सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या संस्थेत व्यवस्थापक प्रणाली आणि सॉफ्टवेअर, कार्यकारी अभियंता, व्यवस्थापक शैक्षणिक प्रणाली, व्यवस्थापक ERP प्रणाली, ग्रंथालय अधिकारी, लेखाधिकारी, लेखापरीक्षण अधिकारी, वैयक्तिक सचिव, कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक विद्यार्थी सुविधा आणि सुविधा, लेखापाल आदि विविध पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या एकूण १२ पेक्षा अधिक रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जानेवारी २०२२ आहे. पदाचे नाव – व्यवस्थापक प्रणाली आणि सॉफ्टवेअर, कार्यकारी अभियंता, व्यवस्थापक शैक्षणिक प्रणाली, व्यवस्थापक ERP प्रणाली, ग्रंथालय अधिकारी, लेखाधिकारी, लेखापरीक्षण अधिकारी, वैयक्तिक सचिव, कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक विद्यार्थी सुविधा आणि सुविधा, लेखापाल पद संख्या – १२ हून अधिक जागा शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. नोकरीच

AFCAT Results 2021 इंडियन एयरफोर्स प्रवेश परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी यंदा ही परीक्षा दिली आहे, ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन मेरिट लिस्ट चेक करु शकतात. आपली निवड झाली की नाही हे उमेदवारांना या यादीनुसार कळेल. एएफसीएटी परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटवर – दिलेल्या नोटीसनुसार उमेदवार त्यांची एलिजबिलिटी, ऑडर्र ऑफ मेरिट, मेडिकल फिटनेस टेस्ट आणि उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार ब्रांचेस आदी माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना अकॅडमीत रिपोर्ट करण्याचा दिवस आणि वेळ कॉल लेटरच्या माध्यमातून नंतर कळवले जाईल. उमेदवारांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे. पोस्ट किंवा ईमेलच्या माध्यमातू आले कॉल लेटर उमेदवारांनी अर्ज करताना जो ईमेल आणि पत्ता दिला होता, त्यावर रजिस्टर्ड पोस्टने कॉल लेटर पाठवले जाईल. कॉल लेटरमध्ये दिलेल्या वेळेत उमेदवारांना कॉल लेटरमध्ये दिलेल्या वेळेत रिपोर्टिंगसाठी उपलब्ध व्हायचे आहे. from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EDG2T9

JEE Main 2022 परीक्षा फेब्रुवारीत नव्हे मार्चमध्ये होण्याची शक्यता

जर तुम्ही इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा म्हणजेच जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट ()मेन परीक्षेची तयारी करत jeeअसाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. देशभरातील प्रतिष्ठित इंजिनीअरिंग संस्थांमध्ये बॅचलर डिग्री अभ्यासक्रमांसाठी प्रवेशांसाठी जॉइंट एन्ट्रन्स परीक्षेचे आयोजन मार्च २०२२ मध्ये केले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA)द्वारे या परीक्षेचे आयोजन केले जाते. यापूर्वी अशी शक्यता वर्तवली जात होती की २०२१ प्रमाणेच २०२२ मध्ये देखील जेईई परीक्षेचा आयोजन टप्प्याटप्प्याने फेब्रुवारीपासून सुरू होईल. पण विविध मिडीया रिपोर्ट्सनुसार, एनटीए जेईई मेन २०२२ चे आयोजन मार्चपासून एकूण चार टप्प्यांमध्ये होऊ शकते. मार्चमध्ये होण्याची शक्यता का? यंदा बोर्ड परीक्षांचे आयोजन दोन टप्प्यात करण्यात आले आहे. पहिला टप्पा डिसेंबर २०२१ मध्ये पार पडला आहे तर दुसऱ्या टप्प्यातील बोर्ड परीक्षा मार्च २०२२ मध्ये आयोजित होणार आहेत. परिणामी जेईई मेन परीक्षेचे आयोजनही फेब्रुवारीऐवजी मार्चमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय पुढील वर्षी पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे देखील ही परीक्षा मार्चमध्ये आयोजित

ESIC Recruitment 2022: ईएसआयसीत क्लर्क भरती; महाराष्ट्रात ५०० हून अधिक जागा

2022: कर्मचारी राज्य विमा निगम (Employees' State Insurance Corporation, ESIC)ने विविध पदांवरील भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ () या पदांच्या एकूण ३,८४७ जागांवर ही भरती होणार आहे. यापैकी महाराष्ट्रात ५९४ जागा आहेत. अर्ज प्रक्रिया १५ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२२ आहे. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) अंतर्गत 'अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)' पदाच्या महाराष्ट्रातील एकूण रिक्त जागा ५९४ आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पदाचे नाव – अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पद संख्या – ५९४ जागा शैक्षणिक पात्रता – दहावी, बारावी आणि पदवी उत्तीर्ण (पदानुसार विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता) नोकरी ठिकाण – महाराष्ट्र वयोमर्यादा – MTS आणि – १८ ते २७ वर्षे UDC – १८ ते २५ वर्षे अर्ज शुल्क – SC/ST/PWD/ विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक – रु. २५०/- इतर

अभियांत्रिकीच्या ५७ हजार जागा रिक्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य सामाइक परीक्षा कक्षाकडून (CET Cell) दोन फेऱ्या राबविल्यानंतरही राज्यात अभियांत्रिकीच्या ५७ हजार जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनासारखे महाविद्यालय आणि विद्याशाखा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी समुपदेशन फेरीची वाट पाहणे पसंत केल्याचे दिसत असून आतापर्यंत ७३ हजार १०९ प्रवेश निश्चित झाले आहेत. अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशातील पहिल्या व दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर 'ऑप्शन फॉर्म' भरलेल्या एक लाख ८ हजार ४१७ विद्यार्थ्यांपैकी दोन्ही फेऱ्यांमध्ये ७३ हजार १०९ प्रवेश निश्चित झाले आहेत. यामुळे ५७ हजार ७२७ जागा रिक्त असल्याने आता या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. राज्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी पहिल्या प्रवेशाच्या यादीत ७७ हजार ८७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले होते; तर दुसऱ्या फेरीत ८७ हजार २७२ विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ केले. यातील बहुतांशी विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश न घेतल्याचे चित्र आहे. या विद्यार्थ्यांना आता समुपदेशन

आणखी एक पेपरफुटी उजेडात; 'न्यासा' कंपनीचाही हात

म. टा. प्रतिनिधी, पुणे आरोग्य भरतीच्या गट 'ड'च्या पेपरफुटीमध्ये सहभागी आरोपींच्या तपासातून गट 'क'चाही पेपर फुटल्याचे समोर आले आहे. मुंबईतील आरोग्य विभागाच्या कार्यालयाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांच्यासह परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या 'न्यासा' कंपनीचा पेपरफुटीमध्ये हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. पेपर छापला त्या ठिकाणाहूनच एजंटना पेपर पाठविला गेल्याचे आढळून आले असून, या प्रकरणी पुणे पोलिसांनी निशीद रामहरी गायकवाड आणि राहुल घनराज लिंघोट या एजंटांना अटक केली गेली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातही प्रशांत बडगिरे, डॉ. संदीप जोगदंड, राजेंद्र सानप यांचा समावेश असल्याचे आढळल्यानंतर त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. आरोपींना १ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. आरोग्य विभागाच्या भरतीसाठी गट 'ड'चा पेपर ३१ ऑक्टोबरला तर, गट 'क'चा पेपर २४ ऑक्टोबरला झाला होता. गट 'ड'चा पेपर फोडल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात डॉ.

Health Department Recruitment: आरोग्य अधिकाऱ्यांची ३७० पदे भरणार

म. टा. प्रतिनिधी, मुंबई राज्यातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदभरती, नव्याने इमारतींचा विकास तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दर्जाची ३७० पदे भरली जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. काँग्रेसचे सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी राज्यातील आरोग्य विभागाशी संबधित उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना टोपे बोलत होते. सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. रिक्त जागांची १०० टक्के भरती करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत विशेष तज्ज्ञांच्या आठ हजार ३३५ जागांपैकी सात हजार ९८१ जागांवर भरती करण्यात आली आहे. तीन हजार ३५७ वैद्यकीय अधिकारी जागा भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी दोन हजार ६११ जागांवर भरती करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर ४६२ जागा पदोन्नतीने भरल्या आहेत. तर ३७० पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र् राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठवण्या

मुंबई विद्यापीठाचे ऐतिहासिक दीक्षांत सभागृह महाविद्यालयांसाठी खुले

मुंबई: देशातील अग्रगण्य म्हणून समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाचा गौरवशाली इतिहास आहे. अलीकडेच विद्यापीठाला 'नॅक'कडून ए प्लस प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान असणाऱ्या मुंबई विद्यापीठाची ख्याती जगभर व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाने सतत प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली. राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचा २०२१ या वर्षाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानंतर संलग्नित महाविद्यालयांना पदवी वितरण सोहळ्यासाठी विद्यापीठाचे सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृह महाविद्यालयांना दिले जाणार असल्याचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सांगितले. याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून राज्याचे मा. मंत्री, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार, आदित्य ठाकरे, प्रा. सुनील कुमार सिंह, मा. संचालक, राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था, गोवा हे लाभले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर

इंडियन कोस्ट गार्डमध्ये भरती, प्रवेशपत्र येथे करा डाऊनलोड

ICG Admit Card 2021: भारतीय तटरक्षक दलाने ( Recruitment) सहाय्यक कमांडंट भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र ( Exam Admit Card) जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट- joinindiancoastguard.gov.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant Batch ) या पदावरील भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ६ डिसेंबर २०२१ पासून सुरू झाली. भारतीय तटरक्षक दलाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशन ग्रुप ए अंतर्गत सहाय्यक कमांडंटच्या एकूण ५० पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांकडून १७ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले होते. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या नोटिफिकेशनद्वारे परीक्षेचा संपूर्ण तपशील तपासू शकतात. ICG Admit Card 2021: असे करा डाऊनलोड प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथमअधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.gov.in वर जा. वेबसाइटच्या होमपेजवरील डाउनलोड सेक्शनवर क्लिक करा. आता ई-अॅडमिट कार्ड प्रिंट करण्यासाठी FETCH DETAILS च्या लिंकवर जा. सहाय्यक कमांडंट ०२/२०२२ बॅच या लिंकवर क्लिक करा. आता उमेदवार

Government Job: GAIL मध्ये विविध पदांची भरती, २ लाखांपर्यंत मिळेल पगार

Recruitment 2021 : गेलमध्ये सरकारी नोकर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाची कंपनी गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये विविध विभागांमध्ये भरती आहे. गेलमध्ये वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून यामध्ये पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. याद्वारे पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, व्हिजिटिंग सोनोलॉजिस्ट आणि एंडोक्राइनोलॉजिस्टच्या ०७ पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता पॅथॉलॉजिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमसीआयद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून MBBS पदवी असणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्याकडे क्लिनिकल पॅथॉलॉजीमध्ये एमडी / डिप्लोमा देखील असावा. वैद्यकीय अधिकारी भरतीसाठी (Medial officer Recruitment) उमेदवाराने MCI मान्यताप्राप्त संस्थेतून AFIH (Associate Fellow of Industrial Health)

UGC NET परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर

CSIR UGC NET 2021: सीएसआयआर यूजीसी नेट (Council of Scientific and Industrial Research University Grant Commission National Eligibility Test किंवा CSIR UGC NET 2021) परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी किंवा NTA ने या तारखांची घोषणा केली आहे. या संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा २०२१ (Joint CSIR UGC NET Exam)च्या सुधारित तारखा आहेत. उमेदवारांना परीक्षेसंबंधी अधिक माहिती हवी असल्यास आणि या संकेतस्थळांना भेट द्यावी. NTA Official Notification नुसार, परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर केल्या आहेत, कारण तशी उमेदवारांची मागणी होती. २९ जानेवारी, ५ आणि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी या परीक्षा होणार होत्या. पण आता नव्या सुधारित वेळापत्रकानुसार आता परीक्षा २९ जानेवारी, १५ फेब्रुवारी आणि १८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत होणार आहेत. CSIR UGC NET Exam चे आयोजन दोन सत्रात केले जाईल. पहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होईल, तर दुसरे सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत होईल. अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू आहे. इच्छुक उमेदवार csirnet.nta.nic.in वर जाऊन ३ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन अर

चीफ जस्टीसना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार, सुप्रीम आणि हायकोर्टच्या न्यायाधीशांचा पगार जाणून घ्या

नवी दिल्ली: देश चालवताना कायदेमंडळ, न्यायपालिका आणि कार्यपालिका या तीन व्यवस्था काम करीत असतात. विधीमंडळ सामान्य जनतेनुसार कायदे बनवते. सरकारची धोरणे आणि कार्यक्रम राबविण्याचे काम कार्यपालिका करते. तर न्यायपालिकेमध्ये कायद्याची व्याख्या आणि न्याय दानाचे काम होते. न्यायव्यवस्थेचे प्रमुख हे चीफ जस्टीस (Chief Justice of India)असतात. संपूर्ण देशातील कायदा व सुव्यवस्था राखताना न्याय देण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. चीफ जस्टीसना किती पगार मिळतो? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांना किती पगार आणि इतर कोणत्या सुविधा मिळतात याची माहिती आपण घेऊया. चीफ जस्टिस पगार भारताच्या सरन्यायाधीशांचा पगार देशाच्या पंतप्रधानांपेक्षा जास्त आहे. CJI यांना महिन्याला २ लाख ८० हजार रुपये इतका पगार मिळतो. हा पगार देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यानंतर सर्वाधिक आहे. याशिवाय, त्यांना पाहुण्यांचे आदरतिथ्य करण्यासाठी सरकारकडून दरमहा ४५ हजार रुपये आदरातिथ्य भत्ता देखील मिळतो. इतर सुविधा आणि पेन्शन सर्वोच्च

GATE २०२२ परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' तारखेला होणार जाहीर

2022: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूरच्या वतीने ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (GATE) २०२२ परीक्षा आयोजित केली जात आहे. गेट परीक्षेसाठी ३ जानेवारी २०२२ रोजी प्रवेशपत्र ( Admit Card 2022) जाहीर केले जाणार आहेत. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट gate.iitkgp.ac.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्रावर उमेदवाराचे नाव, नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, फोटो आणि सही, पेपर कोड, परीक्षा केंद्र कोड, परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता, परीक्षेची तारीख आणि दिवस, परीक्षेची वेळ आणि परीक्षेसंबंधित महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. गेट २०२२ परीक्षा ५ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत घेतली जाईल. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र घेऊन येणे अनिवार्य आहे. यासोबतच उमेदवाराने एक ओळखपत्र देखील सोबत बाळगणे आवश्यक आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी वेबसाइटवरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्या. उमेदवारांनी त्यांच्या पेपरशी संबंधित माहिती, पेपरच्या तारखा आणि इतर माहिती नीट तपासून घ्यावी. ते मागील वर्षांच्या नमुना पेपरमधून गेट परीक्षा २०२

UPSC कडून एनडीए आणि एन I परीक्षांचे गुण जाहीर, 'येथे' तपासा

Upsc : केंद्रीय लोकसेवा आयोगाने(UPSC) (NDA) आणि (NA I) परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर आता गुण जाहीर केले आहेत. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर NDA आणि NA I परीक्षेचे गुण पाहता येणार आहेत. सर्व उमेदवार वेबसाइटवर जाऊन त्यांचे गुण तपासू शकतात. यासाठी उमेदवारांना त्यांचे आवश्यक तपशील भरावे लागतील. यानंतर त्यांना क्रमांकाची पीडीएफ पाहता येईल. ज्यामध्ये ते त्यांचे गुण तपासू शकतात. उमेदवारांच्या सोयीसाठी बातमीत देण्यात आलेल्या थेट आणि सोप्या स्टेप्स फॉलो करुन देखील निकाल पाहता येणार आहे. हेल्प डेस्क यूपीएससी एनडीए आणि एनए I परीक्षेच्या निकालात काही विसंगती आढळल्यास, उमेदवार यूपीएससी हेल्प डेस्कशी ०११-२३३८५२७१/०११-२३३८११२५/०११-२३०९८५५४३ वर कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी १९ ते संध्याकाळी ५ दरम्यान संपर्क करू शकतात. UPSC NDA आणि NA परीक्षा मार्कशीट २०२१ संबंधी अधिक अपडेट मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या वर्षी परीक्षेत ओंकार आशुतोषने परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. अनिश, रोहन वीरसिंग रावत, चैतन्य पांडे, प्रियांशू यांच्या

'बोर्ड परीक्षार्थी व परीक्षेतील शिक्षकांना बूस्टरडोस लसीकरणात प्राधान्य द्या'

मुंबई: राज्यात ओमायक्रॉनचे संकट दिवसेंदिवस वाढत असून येत्या मार्च महिन्यापासून इयत्ता दहावी व बारावी ऑफलाइन होणार आहे त्यामुळे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रथम लसीकरण व बोर्ड परीक्षेशी संबंधित असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे बूस्टर डोस चे लसीकरण प्रथम प्राधान्याने करण्याच्या मागणीचे निवेदन भाजप शिक्षक आघाडीने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण नवीन वर्षात ३ जानेवारी पासून करण्याची घोषणा केलेली आहे. राज्यात १५ मार्चला इयत्ता दहावी व ४मार्च ला बारावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात इयत्ता दहावी व बारावीचे २६ लाखांच्यावर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत व लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या परीक्षा प्रक्रियेत समाविष्ट होणार आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर बोर्ड परीक्षा योग्य पद्धतीने घेण्याची जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रथम प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे तसेच , महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच शिक्षकांचे लसींचे पहि

NTPC मध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील

NTPC Recruitment 2021: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने () विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत सहाय्यक कायदा अधिकारी () पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया क्लॅट परीक्षेद्वारे (CLAT Exam) केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण १० पदे भरली जाणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in वर अर्ज करता येणार आहे. कोणत्याही इतर वर्षाचा CLAT स्कोअर किंवा इतर कोणत्याही परीक्षेचा स्कोअर विचारात घेतला जाणार नाही. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ७ जानेवारी २०२२ रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. NTPC ने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण रिक्त पदांपैकी ६ पदे खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी, १ पद इडब्ल्यूएससाठी, २ पदे ओबीसी वर्गासाठी आणि १ पद एससी वर्गासाठी राखीव असणार आहे. अर्ज शुल्क असिस्टंट लॉ ऑफिसर पदांसाठी सामान्य / ईडब्ल्यएस / ओबी

रेल्वे ग्रुप डी परीक्षेला बसलेल्या लाखो उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट

Exam: रेल्वे भरती बोर्ड (RRB) ग्रुप डी परीक्षेंसाठी मॉडिफिकेशन लिंक बंद करण्यात आली आहे. बोर्डातर्फे लवकरच अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर आरआरबी ग्रुप डी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केले जाणार आहे. ग्रुप डी परीक्षा २३ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे. देशभरातून या परीक्षेला बसलेल्या लाखो उमेदवारांना परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रमासंबंधीची आवश्यक माहिती असणे गरजेचे आहे. इंग्रजी विषयाचा पेपर होणार नाही RRB ग्रुपडी ची निवड प्रक्रिया २ टप्प्यात असेल. पहिला टप्पा कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT)माध्यमातून असेल. ज्यामध्ये इंग्रजीचा पेपर नसेल. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. फिजिकल टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. असे असेल मार्किंग CBT मध्ये एकूण १०० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. याशिवाय परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग देखील असेल. प्रत्येक चुकीच्या ३ प्रश्नांसाठी 1 गुण वजा केला जाईल. उमेदवारांना परीक्षेसाठी ९० मिनिटांचा वेळ दिला जाईल. या अंतर्गत जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगमधून ३० प्रश्न, गणित

OMICRON च्या पार्श्वभूमीवर NCERT चा अभ्यासक्रमाबाबत मोठा निर्णय

Effect: देशातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आगामी सत्र २०२२-२३ पासून नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने शाळांचा अभ्यासक्रम आणि पुस्तके कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना महामारीचा देशातील शिक्षण क्षेत्रावर झालेला परिणाम पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. महामारीच्या उद्रेकामुळे देशातील शाळा बराच काळ बंद होत्या. सध्या करोनाच्या केसेसमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराचा धोका असून देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अनेक शाळांमध्ये संसर्गाची प्रकरणेही समोर येत आहेत. त्यामुळे शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) येण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता, NCERT ने येत्या वर्षापासून सर्व वर्गांची पुस्तके आणि अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी NCERT चे प्रभारी श्रीधर श्रीवास्तव यांनी १५ डिसेंबर २०२१ रोजीच सर्व विभाग प्रमुखांना तज्ञांचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते. विभाग प्रमुखांना २८ डिसेंबर २०२१ पर्यंत अहवाल पाठवायचा होता. माहितीनुसार, २०२२-२३ या शैक्षणिक स

अकरावीसाठी पुन्हा संधी; आजपासून विशेष प्रवेश फेरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक प्रवेशाच्या तीन फेऱ्या, दोन विशेष फेऱ्या, स्पॉट अॅडमिशनची सुविधा, प्रवेश संपल्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वाने विशेष फेरी राबवल्यानंतरही अकरावीसाठी आजपासून प्रवेशाची अजून एक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या फेरीत ३० डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना आपले प्रवेश निश्चित करता येणार आहेत. राज्यात नाशिकसह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती आणि नागपूर या महानगरांमध्ये ऑनलाइन पद्धतीने अकरावीच्या प्रवेश फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. जवळपास सात फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया संपल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, त्यानंतरही मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती येथील २७० विद्यार्थ्यांनी अकरावीत प्रवेश देण्याची विनंती केली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना २८ ते ३० डिसेंबरदरम्यान होणाऱ्या फेरीमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयामार्फत महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे. करोना परिस्थितीमुळे अनिश्चितता, माहिती वेळेत न मिळणे, पालकांचे स्थलांतर या कारणांमुळे प्रवेश न घेतल्याची कारणे या विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालकांपुढे मांडली आहेत. ही सर्व कारणे

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री यांना () करोनाची लागण झाली आहे. गायकवाड () यांनीच सोशल मिडियाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, 'मी कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे मला आजच कळले आहे. सोमवार सायंकाळपासून मला प्राथमिक लक्षणं आढळायला सुरुवात झाली. पण ही लक्षणं तुलनात्मक सौम्य आहेत. माझी तब्येत ठणठणीत आहे आणि मी विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घ्यावी, हि विनंती.' गेल्या काही दिवसात राज्यातली करोना संक्रमणग्रस्तांची आकडेवारी वाढत चालली आहे. देशाच्या काही भागांत आणि राज्यात करोना तसेच ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्यात रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. खबरदारी म्हणून काही कठोर निर्बंध लावले जात आहे. राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण जास्त राज्यात सध्याच्या घडीला ओमायक्रॉनचे रुग्ण अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. हा वेग वेळीच रोखण्यासाठी खबरदारीची पावले उचलणे गरजेचे होते. त्यामुळेच लग्न समारंभ, हॉटेल्स, सिनेमा हॉल्स याबाबत निर्ब

CBSE सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपसाठी नोंदणी सुरू, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Registration: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने विद्यार्थ्यांकडून मेरिट स्कॉलरशिप स्कीम फॉर सिंगल गर्ल चाइल्डसाठी ( Scholarship) अर्ज मागविले आहेत. यासोबतच २०२० मध्ये सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्यांना सीबीएसई मेरिट स्कॉलरशिप स्कीमच्या ऑनलाइन अर्जांचे नूतनीकरण करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून १७ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. याचे पात्रता निकष आणि अर्ज बोर्डाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. पात्रता निकष सीबीएसईने सिंगल गर्ल चाईल्ड (ज्या मुली पालकांच्या एकुलत्या एक आहेत म्हणजेच त्यांना कोणी भाऊ बहिण नाही) कडून अर्ज मागविले आहेत. इयत्ता दहावीमध्ये मध्ये अर्जदाराची शैक्षणिक फी १५०० रुपयांपेक्षा जास्त नसावी. सिंगल गर्ल चाईल्ड स्कॉलरशीप मिळण्यासाठी सीबीएसईच्या कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून पास होणे गरजेचे आहे. यासोबतच दहावीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. यासोबतच अकरावी किंवा बारावीचे शिक्षण सुरु असणे आवश्यक आहे. ज्या शाळेमध्ये सिंगल गर्ल चाइल्ड शिकत असेल त्या शाळेची ट्युशन फी दरमहा १५०० रुपयांपेक्षा जास्त नसावी. असा करा अर्ज

MIT Pune: 'एमआयटी'मधील १३ विद्यार्थ्यांना करोनाची लागण

म. टा. प्रतिनिधी, पुणे एमआयटी विश्व शांती विद्यापीठाच्या (MIT) कोथरूड येथील कॅम्पसमधील १३ विद्यार्थ्यांना करोनाची (Corona) लागण झाल्याचे समोर आले आहे. हे विद्यार्थी मॅकॅनिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी असल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले आहे. हे विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्तरावरील 'सुप्रा' या स्पर्धेची तयारी करत होते. करोनाची लागण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून स्पर्धेची तयारी करण्यासाठी 'एमआयटी'च्या २५ विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वर्कशॉपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. या वर्कशॉपमध्ये हे सर्व विद्यार्थी एकत्र वावरत होते. यापैकी काही विद्यार्थी करोनाबाधित विद्यार्थ्यांच्या संपर्कात आल्याने २५ पैकी १३ विद्यार्थ्यांमध्ये करोनाचा संसर्ग झाला आहे. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची करोना चाचणी 'निगेटीव्ह' आली असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वर्कशॉपच्या एका बाजूला स्पर्धेची तयारी करीत असल्याने या विद्यार्थ्यांचा संपर्क इतर कोणाश

UBI Recruitment 2021: युनियन बँकेत भरती; आजच करा अर्ज

Bank Job 2021: बँकेत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑफ इंडिया म्हणजेच यूबीआयने ( of India,UBI Recruitment 2021 notification) विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यूबीआयद्वारे डिजिटल टीम, (Digital Team) अॅनालिटिक्स टीम (Analytics Team), इकॉनॉमिस्ट टीम (Economist Team), रिसर्च टीम (Research Team), एपीआय मॅनेजमेंट टीम (API Management Team) आणि डिजिटल लँडिंग अँड फिनटेक टीम (Digital Lending & Fintech team) साठी विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जे उमेदवार अर्ज करू इच्छितात ते अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. यूबीआयद्वारे जारी नोटिफिकेशननुसार एकूण २५ पदांवर ही भरती होणार आहे. अर्ज प्रक्रिया १८ डिसेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ जानेवारी २०२२ आहे. UBI Recruitment 2021: अॅनालिटिक्स टीम सह अन्य पदांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज अॅनालिटिक्स टीम, इकॉनॉमिस्ट टीम सहित पदांसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट- Unionbankofindia.co.in वर जा. यानंतर रिक्रूटमेंट टॅब वर क्लिक करा आणि करंट रिक्रूटमेंट टॅब व

CLAT 2022: क्लॅट परीक्षेसाठी अर्जप्रक्रियेला सुरूवात

CLAT Registration 2022: नॅशनल लॉ यूनिवर्सिटीज ()च्या कंसोर्टियमने कॉमन लॉ एडमिशन टेस्ट (CLAT) २०२२ साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. क्लॅट २०२२ परीक्षेसाठी रजिस्‍ट्रेशन प्रक्रिया १ जानेवारी, २०२२ पासून सुरू होणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज ऑनलाइन डाऊनलोड करू शकतात. अर्ज प्रक्रिया जमा करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च २०२२ आहे. ची परीक्षा ८ मे २०२२ रोजी होणार आहे. परीक्षा दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होईल. ही एक राष्ट्रीय स्तरावरील विधी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा आहे. २२ राष्ट्रीय विधी विद्यापीठांमधील पाच वर्षीय एलएलबी आणि एक वर्षीय एलएलएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात येते. ही परीक्षा ऑफलाइन असेल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्र तयार केले जातील. परीक्षेसाठी पात्रता उमेदवारांनी किमान ४५ टक्के गुणांसह (एससी / एसटी उमेदवारांसाठी ४० टक्के गुण) बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मार्च / एप्रिल २०२२ मधील परीक्षा देणारे उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांकडे किमान ५० टक्के गुणांसह (एससी / एसटी उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण) एलएलबीची पदवी आ

UPSC Recruitment 2021: यूपीएससीत विविध प्रकारच्या १८७ पदांवर भरती

युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने ()नोटिफिकेशन जारी केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने असिस्टंट इंजिनीयर (Assistant Engineer), असिस्टंट कमिशनर क्वालिटी इंश्युरन्स (Assistant Commissioner Quality Assurance) असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) ज्युनियर टाइम स्केल (Junior Time Scale, JTS) सहित अन्य पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. याअंतर्गत एकूण १८७ पदे भरली जाणार आहेत. जे इच्छुक उमेदवार अर्ज करू इच्छितात ते ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अखेरची मुदत १३ जानेवारी २०२२ आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करताना उमेदवारांना २५ रुपये अर्ज शुल्क द्यावे लागेल. मात्र, अनुसूचित जाति, अनुसूचित जमाति, पीडब्ल्यूबीडी, महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे ही त्यांना जन्मतारीख, स्वाक्षरीची इमेज, शैक्षणिक प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्रे जमा करावी लागतील. उमेदवारांना असा सल्ला देण्यात येतो की अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. सोबतच भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची एक प्रिंट

MU Convocation 2021: दोन लाखांवर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

MU Convocation 2021: मुंबई विद्यापीठाचा वार्षिक विद्यापीठाच्या फोर्ट येथील दीक्षांत समारंभात समारंभपूर्वक पार पडला. दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. यंदा हा समारंभ करोनाकाळानंतर प्रथमच ऑफलाइन पद्धतीने पार पडला आहे. डॉ. श्रीनिवासन कन्नन यांना संस्कृत विषयात डिलीट पदवी तर डॉ. मुकुंद चोरघडे यांना रसायनशास्त्र विषयात डिएस्सी पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. मुकुंद चोरघडे यांनी अमेरिकेतून ऑनलाईन पद्धतीने या दीक्षांत समारंभात सहभागी झाले. चोरघडे यांना डीएस्सी ही पदवी ऑनलाईन देण्यात आली. दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे गोव्यातील राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेचे संचालक प्रा.सुनील कुमार सिंह हे होते. राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विविध विद्याशाखेतील २४३ स्नातकांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. यावर्षी पदवीधर झालेल्यांमध्ये १ लाख ९ हजार १७३ मुले तर १ लाख ३ हजार ४०६ मुलींचा समावेश आहे. पदवीसाठी १ लाख ७९ हजार ७०६ तर पदव्युत्तरसाठी ३२ हजार ८७३ विद्यार्थी आहेत. तसेच मुलींमध्ये पदवी स्नातकांची संख्या ८३ हजार १५८

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी नोंदणीला २८ डिसेंबरपासून होणार सुरुवात

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या 'परीक्षा पे चर्चा २०२२' कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होत आहे. ज्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना २०२२ कार्यक्रमात () सहभागी व्हायचे आहे, ते २८ डिसेंबर २०२१ ते २० जानेवारी २०२२ पर्यंत आपले रजिस्ट्रेशन करू शकतात. पीएमओ द्वारे यासंबंधी ट्वीट करण्यात आले आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना परीक्षा पे चर्चा २०२२ कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंबंधी एका स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार आहे. पीएमओ द्वारे ट्वीट करून असं म्हटलं आहे की इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. वेबसाइट MyGov.in वर जाऊन नोंदणी करता येऊ शकेल. यासाठी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एका ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमांतर्गत देशातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात चर्चाच करतात. पुढील वर्षी २०२२ मध्ये बोर्ड परीक्षांआधी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. मागील वर्षी

आयआयटी मुंबईला माजी विद्यार्थ्यांकडून १७ कोटींची भेट!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई आयआयटी मुंबईतून १९९६मध्ये पदवीधर झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी रविवारी पार पडलेल्या माजी विद्यार्थी कार्यक्रमात संस्थेला तब्बल १७ कोटींची आर्थिक मदत केली. यातून विविध शैक्षणिक आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. आयआयटी मुंबईने माजी विद्यार्थी दिवस हायब्रिड स्वरूपात साजरा केला. यावेळी रौप्य महोत्सवी बॅचने संस्थेला विविध प्रकल्पांच्या स्वरूपात १७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या विद्यार्थ्यांनी 'गो आयआयटी बॉम्बे' या नावाने निधी संकलन मोहीम हाती घेतली होती. यातून उभ्या राहिलेल्या निधीतून संस्थेतील प्रयोगशाळा अद्ययावत करणे, तरुण प्राध्यापकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यावेळी आयआयटीचे माजी विद्यार्थी प्रमोद चौधरी यांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून स्थापन झालेल्या 'प्रमोद चौधरी अॅलुमनी कंटिन्युइंग एज्युकेशन सेंटर'चे अनावरण करण्यात आले. संस्थेत जागतिक स्तरावरचे अद्ययावत वसतिगृह उभारण्यासाठी या बॅचने 'हॉस्टेल ८ कॉम्प

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइनच! फेब्रुवारीत सत्र परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या सत्र परीक्षा फेब्रुवारी महिन्यात परीक्षा केंद्रांवरच ऑफलाइन घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा विभागातील सूत्रांनी दिली. अंतिम वर्षाच्या सर्वच परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय झाला असून, पहिल्या ते तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा नियोजनाबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी प्रत्यक्ष परीक्षा घेण्याचा आदेश देऊनही पदविका अभ्यासक्रमांसाठी यंदा ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, पुणे विद्यापीठाने मात्र शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या सत्र परीक्षा प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती या विभागातील सूत्रांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या परीक्षांपैकी सर्व अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर होणार आहेत. पहिल्या वर्षाच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेतल्या जाणार आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने ओएमआर शीटच्या माध्यमातून किंवा ऑनलाइन

अभ्यास तोंडपाठ, लेखनात सपाट! ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या लेखनक्षमतेवर परिणाम

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत अनुत्तीर्ण करणारी एकही परीक्षा झालेली नाही. त्यातच करोनासंकटामुळे दीड वर्षाहून अधिक काळ विद्यार्थ्यांची शाळा ऑनलाइनच भरली. आता प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर उत्तरपत्रिका लिहिताना दहावीच्या विद्यार्थ्यांच्या लेखन, आकलन क्षमतेवर झालेला परिणाम पाहून पालक आणि शिक्षकांची चिंता वाढली आहे. गणित, विज्ञान आणि भाषा विषयात विद्यार्थी पडत मागे असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. यामुळे करोनापूर्वी शाळांमध्ये २० ते २५ टक्के विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीच्या वाटेवर मागे पडत असल्याचे चित्र होते. आता हे प्रमाण ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे मुख्याध्यापक सांगत आहे. राज्यात शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर पहिली ते आठवीपर्यंत नापास न करण्याच्या नियमामुळे विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेत मागे पडत असले तरी पुढील वर्गात जात होते. हेच विद्यार्थी गतवर्षी इयत्ता नववीमध्ये होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना सराव परीक्षा, घटक चाचण्या आदींच्या आधारे मूल्यमापन करून इयत्ता दहावीमध्ये प्रवेश देण्याबाबत सांगण्यात आले होते. या विद्यार्थ

अरेच्चा! परीक्षेत विचारले करीनाच्या मुलाचे नाव; शाळेला नोटीस

वृत्तसंस्था, खंडवा मध्य प्रदेशातील खंडवा येथील एका खासगी शाळेतील परीक्षेत करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचे नाव लिहिण्यास सांगण्यात आल्याने त्या शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. खंडवा शहरातील अॅकेडमिक हाइट्स पब्लिक स्कूलमधील परीक्षेदरम्यान सामान्य ज्ञान विषयात सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांना 'करीना कपूर अणि सैफ अली खान यांच्या मुलाचे पूर्ण नाव लिहा,' असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर पालक-शिक्षक संघाने आक्षेप घेत शिक्षण विभागाकडे तक्रार केली. तसेच ही प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरही व्हायरल झाली. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा शिक्षण अधिकारी संजीव भालेराव यांनी शाळेला नोटीस बजावली आहे. 'देशहित आणि वैयक्तिक आयुष्यात उपयुक्त ठरतील असे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले पाहिजेत. यासंदर्भात शाळेला नोटीस बजावण्यात आली असून त्यांचे उत्तर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ,' असे भालेराव यांनी सांगितले. दरम्यान, 'ही प्रश्नपत्रिका दिल्लीस्थित एका संस्थेकडून आली आहे. या संस्थेशी अमाच्या शाळेचा करार आहे. य

MPSC भरती प्रक्रिया अद्याप प्रलंबित; पोलिस उपनिरीक्षक पदाच्या मैदानी चाचणीची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा होऊन अडीच वर्षे झाले असून यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मैदानी चाचणीची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारामुळे मराठवाडा आणि विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना इतर संधीवरही पाणी सोडावे लागते आहे. शारीरिक चाचणीच्या दृष्टीकोनातून तयारी करणाऱ्यांपैकी अनेक जणांना खर्च परवडत नाही तर काहींना दुखापत झाली. वेळ आणि पैसा खर्च होते आहे. त्यात आता ओमायक्रॉनमुळे लॉगडाउनची चर्चा असल्याने प्रक्रिया पुन्हा लांबणार का, या भीतीने विद्यार्थी चिंतेत आहेत. एमपीएससीने २०१८मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाची जाहिरात काढली. ४९६ पदांसाठी आयोगाकडून प्रक्रिया करण्यात येत आहे. पदभरतीची प्रक्रिया २०१८मध्ये सुरू झाली. २०२२ नवीन वर्ष सुरू होत आहे. मात्र, प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. चार-चार वर्षे एका परीक्षेसाठी लागत असतील तर, इतर परीक्षांची तयारी कशी करणार असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. मुख्य परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी होणे बा

RTE Admission 2022: पुढील वर्षाच्या प्रवेशांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'शिक्षण हक्क कायद्यां'तर्गत () देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांचे २०२२-२३ या वर्षासाठीचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने गुरुवारी जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार २८ डिसेंबर ते नऊ मे दरम्यान 'आरटीई' प्रवेश प्रक्रियेचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या २८ डिसेंबरपासून राज्यातील 'आरटीई'अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळांची पुनर्तपासणी सुरू होणार आहे. १७ जानेवारी पर्यंत तपासणी सुरू राहणार असून, त्यानंतर 'आरटीई' प्रवेशांसाठी राज्यात उपलब्ध शाळा आणि प्रवेशांच्या जागा जाहीर करण्यात येतील. १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान, पालकांना 'आरटीई' प्रवेशांसाठी अर्ज करता येणार आहेत. आठ किंवा नऊ मार्चला 'आरटीई' प्रवेशांची सोडत निघणार असून, त्यानंतर प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होईल, असे संभाव्य वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे. 'आरटीई'च्या सोडतीत नाव लागलेल्या पालकांना १० मार्च ते ३१ मार्च दरम्यान शाळांमध्ये जाऊन मूळ कागदपत्रे सादर करून प्रवेशनिश्चिती करता येईल. एक एप्रिलपासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशफेऱ्

SSC CGL Exam 2022: स्टाफ सिलेक्शन भरती परीक्षा; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

SSC CGL Application 2022: कर्मचारी निवड आयोगाने (SSC)संयुक्त पदवी परीक्षा स्तरावरील भरतीसाठी म्हणजेच एसएससी सीजीएल २०२२ (SSC CGL 2022) भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. एसएससी सीजीएल 2022 अर्ज ऑनलाइन पद्धतीने वर भरता येणार आहेत. इच्छुक उमेदवार ग्रुप बी आणि सी च्या सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतात. २३ जानेवारी २०२२ पर्यंत हे अर्ज भरता येणार आहेत. एसएससी द्वारा जारी नोटिफिकेशननुसार, गॅझेटेड म्हणजेच राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांच्या विविध पदांवरील भरतीसाठी एसएससी संयुक्त पदवी स्तर (Combined Graduate Level Exam, CGL)रिक्त पदांची घोषणा स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. उमेदवारांना एसएससी सीजीएल अर्ज भरण्यापूर्वी एसएससी सीजीएल (SSC CGL 2022) पात्रतेचे निकष पाहावे लागतील. कारण पात्रता एसएससी सीजीएल पदांनुसार विविध प्रकारची असते. परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २३ जानेवारी २०२२ आहे. एसएससी सीजीएल परीक्षा २०२२ च्या नोटिफिकेशननुसार, एसएससी सीजीएल सीबीटी (CBT) १ परीक्षा एप्रिल २०२२ मध्ये आयोजित केली जाणार आहे. एसएससी सीजीएल सीबीटी २ (CBT 2) परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. महत्त