म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून () इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी (MHT CET) परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली. मात्र, परीक्षेचे वेळापत्रक अजूनही प्रसिद्ध झालेले नाही. त्यासोबतच एमबीए, एमसीए, लॉ, आर्किटेक्चर अशा महत्त्वाच्या अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षेची नोंदणी आणि वेळापत्रक कधी जाहीर होणार, अशी विचारणा विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. 'सीईटी सेल'कडून इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर, एमबीए, एमसीए, लॉ (तीन आणि पाच वर्षे), बीएड, बीपीएड, आर्किटेक्चर अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी साधारण १६ सीईटी परीक्षा होतात. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी या पात्रता परीक्षेत गुण मिळवणे अनिवार्य असते. त्यामुळे परीक्षांची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहतात. त्यामुळे 'सीईटी सेल'ने या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार 'सीईटी सेल'ने इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेसाठीची ऑनलाइन नोंद