मुंबई: चेंबूर येथे शस्त्राचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपी पीडित मुलीच्या ओळखीचा आहे.
तक्रारदार तरुणी तिच्या मित्रासोबत मरीन ड्राईव्ह येथे शनिवारी पहाटे फिरण्यासाठी गेली होती. तेथून ती मित्रासोबत चेंबूर कॅम्प येथे परत आली. घरी चालत जात असताना आरोपी धीरज सिंह(२४ ) याने नॅशनल सर्वोदया स्कुल या ठिकाणी तक्रारदार व तिच्या मित्राला लोखंडी हत्याराचा धाक दाखवला. त्यावेळी मित्राने घाबरून तेथून पळ काढला. सिंह याने तरुणीला जबरदस्तीने शाळेच्या समोरील गल्लीत नेऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी त्या ठिकाणाहुन पळून गेला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण पथक, निगराणी पथक यांची दोन वेगवेगळी पथके तयार केली. आरोपीला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. तो मुलीच्या ओळखीचा असून बेरोजगार आहे.
The post चेंबूरमध्ये बलात्कार; आरोपीस अटक appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3kFNgPG

Comments
Post a Comment