Upsc : केंद्रीय लोकसेवा आयोगाने(UPSC) (NDA) आणि (NA I) परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर आता गुण जाहीर केले आहेत. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर NDA आणि NA I परीक्षेचे गुण पाहता येणार आहेत. सर्व उमेदवार वेबसाइटवर जाऊन त्यांचे गुण तपासू शकतात. यासाठी उमेदवारांना त्यांचे आवश्यक तपशील भरावे लागतील. यानंतर त्यांना क्रमांकाची पीडीएफ पाहता येईल. ज्यामध्ये ते त्यांचे गुण तपासू शकतात. उमेदवारांच्या सोयीसाठी बातमीत देण्यात आलेल्या थेट आणि सोप्या स्टेप्स फॉलो करुन देखील निकाल पाहता येणार आहे. हेल्प डेस्क यूपीएससी एनडीए आणि एनए I परीक्षेच्या निकालात काही विसंगती आढळल्यास, उमेदवार यूपीएससी हेल्प डेस्कशी ०११-२३३८५२७१/०११-२३३८११२५/०११-२३०९८५५४३ वर कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी १९ ते संध्याकाळी ५ दरम्यान संपर्क करू शकतात. UPSC NDA आणि NA परीक्षा मार्कशीट २०२१ संबंधी अधिक अपडेट मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या वर्षी परीक्षेत ओंकार आशुतोषने परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. अनिश, रोहन वीरसिंग रावत, चैतन्य पांडे, प्रियांशू यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी पहिल्या पाचमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. भरती परीक्षेच्या निकालाशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3euuYNr

Comments
Post a Comment