Bank of india : सरकारी बँकेमध्ये (Government ) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडियामध्ये () विविध पदांची भरती केली जाणार आहे. बॅंकेमध्ये मिडल मॅनेजमेंट ग्रेड/स्केल २ च्या स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर (SSO) भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँकेकडून यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील यामध्ये देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. बॅंक ऑफ इंडियामध्ये एकूण २५ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. त्यापैकी ११ पदे खुल्या वर्गासाठी आहेत. तसेच ९ पदे ओबीसी, २-२ पदे एससी आणि एसटीसाठी आणि १ पदं ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहे. बँक ऑफ इंडियामधील स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता युनियन बँक स्पेशालिस्ट सिक्युरिटी ऑफिसर रिक्रूटमेंट २०२२ च्या नोटिफिकेशननुसार, उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतील कोणत्याही शाखेतील पदवीधर असावी. उमेदवारांकडे किमान तीन महिन्याचा कॉम्प्युटर किंवा आयटी अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १ नोव्हेंबर २०२१ रोजी उमेदवारांचे वय २५ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. याचा अर्थ उमेदवाराचा जन्म २ नोव्हेंबर १९८१ पूर्वी झालेला नसावा आणि १ नोव्हेंबर १९९६ नंतर झालेला नसावा. सरकारी नियमांनुसार आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. पदभरतीचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया या पदभरतीची अर्ज प्रक्रिया २४ डिसेंबर २०२१ पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना ७ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. पदासाठी अर्ज करताना उमेदवाराला ८५० रुपये शुल्क भरावे लागेल. हे शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरता येणार आहे. एससी/एसटी उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30OStNW
Comments
Post a Comment