Government : इस्रायल सरकारने ()आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (scholarship for )जाहीर केली आहे. इस्रायल सरकारतर्फे भारतीय विद्यार्थ्यांसाठी तीन प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यात येत आहेत. आहे. याअंतर्गत शैक्षणिक वर्ष शिष्यवृत्ती (Academic Year Scholarships), आंशिक शैक्षणिक वर्ष शिष्यवृत्ती (Partial )आणि उन्हाळी भाषा अभ्यासक्रमासाठी (Summer Language Courses Scholarships) शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला असून बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. इस्त्रायली विद्यापीठाचे शैक्षणिक निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाच शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. पात्रता इस्त्रायल सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे बीए किंवा बीएससी पदवी आणि चांगली शैक्षणिक कामगिरीची असणे आवश्यक आहे. अर्जदार हा भारत देशाचा नागरिक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी असावे. इस्रायली नागरिक या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकत नाही. तसेच विद्यार्थ्यांकडे इंग्रजी किंवा हिब्रू भाषेतील प्राविण्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. संस्थेमार्फत अर्ज स्वीकारल्यानंतरच उमेदवारांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. इस्त्रायली दूतावासाने जाहीर केलेला विद्यार्थी व्हिसा असणे आवश्यक आहे. स्थानिक इस्रायली दूतावासाशी संपर्क साधून अर्ज प्रक्रिया आणि शिष्यवृत्तीसंबंधी अधिक माहिती मिळविता येणार आहे. आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी अर्ज पूर्णपणे भरला जाईल याची खात्री करा. अर्ज अपूर्ण असल्यास बाद ठरविला जाईल. इस्त्राईलमधील ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे तसेच ज्या विद्यापीठात शिक्षण घ्यायचे असेल त्याचा सविस्तर तपशील भरा. तुमचा रेझ्युमे आणि इस्रायली विद्यापीठांसह पत्रांची देवाणघेवाण केलेल्या प्रती सोबत जोडा. यासोबतच शिफारसीची किमान दोन पत्रे, तीन पासपोर्ट आकाराचे फोटो, हेल्थ सर्टिफिकेट सोबत जोडा. अंतिम तारीख या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्वाची कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहे. तसेच उमेदवारांनी देण्यात आलेले पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना ३० डिसेंबर २०२१ पूर्वी अर्ज करता येणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pi5FnS

Comments
Post a Comment