मुंबई : बँकेची सुमारे ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रणवेश मळेकर याला अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. प्रणवेशने घराच्या कागदपत्रांवर दोन बँकांतून कर्ज काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत आहे. यापूर्वीही त्याला फसवणुकीच्या एका गुन्ह्यात गावदेवी पोलिसांनी अटक केली होती.
प्रणवेश हा जोगेश्वरी परिसरात राहतो.काही महिन्यांपूर्वीच त्याच्याविरुद्ध गावदेवी पोलीस ठाण्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.अटकेनंतर त्याला अंधेरीतील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला सोमवार १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
The post बँकेची ३१ लाखांची फसवणूक करणाऱ्याला अटक appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3rTUUtT

Comments
Post a Comment