मुंबई : मुंबईत शुक्रवारी १९२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या ७ लाख ६४ हजार ८५४ वर पोहोचली आहे. शुक्रवारी १८३ रुग्ण बरे झाले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७ लाख ४४ हजार १४९ झाली आहे. मुंबईत सध्या एक हजार ७७३ उपचाराधीन रुग्ण आहेत. शुक्रवारी दीर्घकालीन आजार असणाऱ्या ६० वर्षांवरील एका पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या १६ हजार ३५५ झाली आहे. ३६,५१५ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण एक कोटी २८ लाख १ हजार ३०६ चाचण्या करण्यात आल्या आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. ३ ते ९ डिसेंबरपर्यंत रुग्णवाढीचा दर ०.०३ टक्के होता. मुंबईत सध्या ११ इमारती प्रतिबंधित आहेत.
६९५ नवे करोना रुग्ण
राज्यात दिवसभरात करोनाच्या ६९५ नव्या रुग्णांचे निदान झाले असून, १२ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत नगर जिल्हा ४०, पुणे जिल्हा १७६, मराठवाडा ५६, विदर्भात १४ नवे रुग्ण आढळले. राज्यात ६,५३४ रुग्ण उपचाराधीन आहेत.
जिल्ह्यात ८६ नवे बाधित
ठाणे : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी ८६ करोना रुग्ण आढळून आले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ८६ करोनाबाधितांपैकी नवी मुंबई २३, ठाणे २०, कल्याण-डोंबिवली १२, मीरा-भाईंदर १२, ठाणे ग्रामीण आठ, उल्हासनगर पाच, बदलापूर तीन, अंबरनाथ दोन आणि भिवंडीत एक करोना रुग्ण आढळून आला, तर ठाणे महापालिका क्षेत्रातील एकाचा मृत्यू झाला.
The post दिवसभरात १९२ रुग्णांची नोंद appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3GvvhUf

Comments
Post a Comment