मुंबई: राज्यातील काँग्रेस- राष्ट्रवादीला सत्तेवर येताच मुस्लिम आरक्षणाचा विसर पडला आहे. या दोन्ही पक्षांनी समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप करतानाच राज्यात मुस्लिम आरक्षणावरून तीव्र आंदोलन उभारण्याची घोषणा इंडिया मजलिस-ए- इत्तेहाद- उल मुस्लिमीन (एमआयएम)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी येथे केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेलाही जमावबंदी लागू करणार का असा सवालही त्यांनी केला.
मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जागांचे संरक्षण या मागणीसाठी एमआयएमतर्फे औरंगाबाद ते मुंबई तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत खासदार ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलिल यांनी राज्य सरकारवर टीका केली. धर्मनिरपेक्षतेने मुस्लिम समाजास काय मिळाले अशी विचारणा करीत समाजाच्या हितासाठी एकत्र येऊन लढा उभारण्याचे आवाहन केले.
खासदार इम्तियाज जलील यांनीही आपणास मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी सरकारने पूर्ण ताकद लावल्याचा आरोप केला. मराठा बांधवांकडून खूप शिकण्यासारखे आहे. आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चामध्ये ते फक्त मराठा म्हणून उतरले. ते कोणत्याही पक्षाचे नव्हते. ते फक्त मराठा म्हणून मैदानात उतरले होते.
The post काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मुस्लिमांचा विश्वासघात -ओवेसी appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3yoXaKL

Comments
Post a Comment