मुंबई : सीबीडी बेलापूर येथे मे २०१२ मध्ये दोन महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने एकाला सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द करत त्याची प्रकरणातूनही निर्दोष सुटका केली. न्यायालयाचे तपशीलवार निकालपत्र रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाले.
शीव ते पनवेल महामार्गावरील सीबीडी बेलापूर उड्डाणपुलाखाली ही घटना घडली होती. दोनपैकी एका महिलेचा आरोपींच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तर दुसरी महिला तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरली होती. अर्धवट शुद्धीत असलेल्या महिलेने तेथून जाणाऱ्यांची मदत मागितली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली होती.
या घटनेतून वाचलेली महिला वाशी स्थानकाजवळील पदपथावर राहात होती. तिने दिलेल्या जबाबानुसार, लग्न समारंभात खानपानसेवा देणाऱ्यांकडे नोकरीला लावण्याचे सांगून ती आणि तिच्या मैत्रिणीला दोन तरुणांनी बेलापूर उड्डाणपुलावर नेले. दोघेही तरुण नवी मुंबईतीलच रहिवाशी होते आणि त्यांनी ठरवून या दोघींवर बलात्काराचा कट रचल्याचा पोलिसांचा आरोप होता. मृत महिला घाटकोपर येथील रहिवाशी होती आणि आपल्याला भेटण्यासाठी नवी मुंबईला जात असल्याचेही तक्रारदार तरुणीने पोलिसांना सांगितले होते.
The post बेलापूर सामूहिक बलात्कार खटला : आरोपीची फाशी रद्द; निर्दोष सुटका appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3nQbwA1

Comments
Post a Comment