महाराष्ट्राला अद्याप नव्या व्हेरिएंट प्रसाराचा धोका नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले. तसेच शाळा सुरू होण्यासही काही हरकत नसल्याने शाळा ठरल्या वेळेनुसार सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग सुरू होण्याबाबतचा संभ्रम तूर्त तरी दूर झाला आहे. राज्यातील शाळांमधील उर्वरित पहिली ते चौथीपासूनचे वर्गही येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यादृष्टीने सर्व पालिका, शाळा प्रशासनही सज्ज आहे. मात्र नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार जगातील १२ देशांमध्ये झाला आहे. या नव्या करोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन शाळांबाबत सावध भूमिका राज्य सरकार घेते का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र महाराष्ट्राला अद्याप ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका नाही, मात्र सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. तसेच शाळा ठरल्या दिवशीच १ डिसेंबरपासून सुरू होणार, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शाळा सुरू होण्यासंबंधीची नियमावली शिक्षण विभागाने जारी केली आहे. शाळांसाठीची नियमावली १. शाळेचा सर्व परिसर निर्जंतुक केलेला असावा. २. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यापूर्वी स्वच्छतेच्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. ३. शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी लशीचे दोन्ही डोस तातडीने पूर्ण करावेत. ४. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, फेस मास्क याचा पुरवठा करावा. ५. शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी गर्दी करणार नाहीत, याची शाळांनी काळजी घ्यावी. विद्यार्थी आणि पालकांसाठी सूचना १. विद्यार्थ्यांनी शाळेत इतर विद्यार्थ्यांसोबत एकत्र येऊ नये. २. पालकांनी विद्यार्थ्यांना वाहनांमधून शाळेत पाठवताना वाहनांचे निर्जंतुकीकरण केले आहे की नाही, हे तपासून पाहावे. ३. विद्यार्थ्यांनी सामूहिक खेळ खेळू नयेत. ४. शाळेत एकत्र येऊन डबा खाण्यास, जेवण्यास सक्त मनाई
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xzKQ9X
Comments
Post a Comment