मुंबई : दोन वष्रे पूर्ण झालेले महाविकास आघाडी सरकार फक्त ‘पुत्र, मुलगी आणि पुतण्या’ याभोवतीच फिरणारे असल्याची टीका भाजप आमदार आशीष शेलार यांनी केली. हे सरकार म्हणजे ‘तीन पशांचा तमाशा’ या नाटकाप्रमाणे तीन पक्षांचा तमाशा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आजचा दिवस वेदनांच्या प्रगटीकरणाचा दिवस आहे. असंख्य वेदना महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला गेल्या दोन वर्षांपासून भोगाव्या लागल्या, त्या मांडत आहोत. एखाद्याला आपल्या मुलाने चांगले काम करून मोठे व्हावे असे वाटते. त्याच्या नेतृत्वाखाली यश मिळावे, यासाठी पायाभरणी करण्यात चूक नाही. पण दुर्दैवाने राज्याची जगासमोर पब, पेग, पार्टी आणि पेंग्विन, अशीच प्रतिमा गेली. जेव्हा मुंबईकर लोकल सुरू करा, असे म्हणत होते, तेव्हा पब आणि बार सुरू केले गेले. जेव्हा मंदिरे उघडण्याची मागणी झाली, तेव्हा मदिरालये सुरू केली. असे निर्णय पुत्रप्रेमाने झाले.
तसेच मुलीच्या प्रेमापोटी गृहमंत्रिपदी अनिल देशमुख यांना बसविले. त्यानंतर वसुली, मटका किंग, बुकी यांच्यासोबत व्यवहार, पोलीस दलात गटबाजी, बदल्यांमधील भ्रष्टाचार असे राज्याचे चित्र समोर आले, असे शेलार यांनी सांगितले. त्यांना पुतण्यावर प्रेम असल्याने त्याला सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान द्यावे लागले. पुतण्याची एक हजार कोटींची बेनामी संपत्तीची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी उघड केली. ही संपत्ती कुठून आली? सहकारी कारखाना उघडायचा, सरकारकडून जमीन, वीज सगळे सवलतीत मिळवायचे, शेतकऱ्यांकडून पसा घ्यायचे, पण कारखाना तोटय़ात दाखवायचा. मग बँकेने लिलाव करायचा, तोच कारखाना पुतण्याने विकत घ्यायचा, असे पुतण्याचे नवीन उद्योग समोर आले, असे शेलार यांनी नमूद केले.
‘सरकार असंवेदनशील’
पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी केली, तर विदेशी दारूवरील कर कमी केला. वायनरीला अनुदान दिले. पण शेतकऱ्यांसाठी काही करायला तयार नाही. ओबीसींचे राजकीय आरक्षण सरकारच्या नाकत्रेपणाने गेले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकार मान्य करीत नाही. हे सरकार असंवेदनशील असल्याची टीका शेलार यांनी केली.
The post राज्य सरकार हा तीन पक्षांचा तमाशा! आमदार आशीष शेलार यांची टीका appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3E5geQ8
Comments
Post a Comment