UPSC CSE extra attempts Demand: केंद्रीय लोकसेवा आयोग, नागरी सेवा परीक्षा (UPSC CSE) उमेदवार नागरी सेवा परीक्षेत सरकारकडून एक्स्ट्रा अटेम्प्ट (extra attempts)आणि वयोमर्यादेत शिथिलता (Age Relaxation)देण्याची मागणी करण्यात येत आहे. करोनामुळे परीक्षेची तयारी नीट झाली नाही. त्यामुळे वयोमर्यादा आणि एक्स्ट्रा अटेम्प्टमध्ये शिथिलता द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून सोशल मीडियावर सातत्याने केली जात आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे अनेक उमेदवार परीक्षेला बसू शकले नाहीत. तसेच इंटरनेट समस्या, लॉकडाऊन, कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू आणि मानसिक तणाव अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अशा परिस्थितीत परीक्षेवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे नागरी परीक्षेत एक्स्ट्रा अटेम्प्टची सवलत देण्यात यावी असे काही उमेदवारांचे म्हणणे आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग, नागरी सेवा परीक्षा (UPSC CSE) परीक्षेत केवळ ६ वेळा बसण्याची परवानगी आहे. काही उमेदवार करोनामुळे अंतिम परीक्षा देऊ शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर यूपीएससी नागरी परीक्षेत वयोमर्यादेच सवलत द्यावी, अशी मागणी अनेक उमेदवारांनी सरकारकडे केली आहे. यूपीएससीची प्राथमिक परीक्षा पूर्ण झाली असून मुख्य परीक्षा सुरू आहे. ७,८,९,१५ आणि १६ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. परीक्षेसाठी ९,२०० उमेदवारांनी नोंदणी केली असून आयोगाकडून ९ पेपर घेण्यात येत आहेत. सोशल मीडियावर एका यूजरने लिहिले की, करोनामुळे २ वर्षे कशी गेली हे कळले नाही. अशा परिस्थितीत परीक्षेची योग्य तयारी करता आली नाही. त्यामुळे परीक्षेत वयात सवलत देण्यात यावी. तर दुसरीकडे 'यूपीएससी सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण होणे माझ्या आयुष्याचे एकमेव स्वप्न आहे, पण करोनाच्या परिस्थितीमुळे काही करता आले नाही, दोन वर्षे अशीच वाया गेली', असे दुसऱ्या युजर्सने लिहिले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Gn2Yrc

Comments
Post a Comment