BMC Recruitment 2021: मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये हाऊसमन (मेडिसिन) पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत हाऊसमन पदाच्या एकूण ९ जागा भरण्यात येणार आहेत. १ फेब्रुवारी २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीसाठी ही भरती होणार आहे. या पदासाठी उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय ३३ वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयात ३८ वर्षांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारानी खोटी किंवा बनावट कागदपत्रे पाठविल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल. ऑफिस ऑफ मेडिकल सुप्रीडेंटेंट, कस्तुरभा हॉस्पीटल, साने गुरुजी मार्ग मुंबई-४०००११ या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. या पदासाठी इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज १० जानेवारीपर्यंत पाठवता येतील. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3t8rWa0

Comments
Post a Comment