IAF Admit Card 2022: भारतीय हवाई दलाने (IAF) अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वर एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (Air Force Common Admission Test,AFCAT) चे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना ईमेल आयडी आणि पासवर्डसह त्यांचे वैध लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून त्यांचे AFCAT १ प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. AFCAT प्रवेशपत्रामध्ये उमेदवाराचे नाव, नोंदणी क्रमांक, रोल नंबर, फोटो आणि सही, परीक्षेची तारीख आणि वेळ, परीक्षेचे ठिकाण, श्रेणी इत्यादीसह महत्त्वाचे तपशील असतात. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी परीक्षेला येताना एएफसीएटी १ प्रवेशपत्र २०२२ आणणे आवश्यक आहे. यासोबतच वैध फोटो ओळख पुरावा आणावा लागेल. AFCAT १ प्रवेशपत्रामध्ये उमेदवारांना काही चूक आढळल्यास दुरुस्तीसाठी परीक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल. यासाठी ०२० २५५०३१०५/२५५०३१०६ या क्रमांकावर किंवा afcatcell@cdac.in वर ईमेल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. AFCAT 1 Admit Card 2022: असे करा डाउनलोड उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वर जा. होमपेजवरील 'उमेदवार लॉगिन' टॅबवर क्लिक करा. ड्रॉपडाउन मेनूमधून प्रवेशपत्र डाउनलोड लिंक 'AFCAT 1/2022-Cycles' निवडा. कोणतीही चूक न करता ईमेल पत्ता आणि पासवर्ड भरा. स्क्रीनवर AFCAT १ २०२२ प्रवेशपत्र पाहण्यासाठी लॉगिन बटणावर क्लिक करा. डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंटआउट घ्या. वेबसाइटनुसार, उमेदवारांना प्रवेशपत्र २८ जानेवारी २०२२ संध्याकाळी ५ वाजल्यापासून लॉगिनद्वारे डाउनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्रात दिलेले नाव, जन्मतारीख, लिंग, आधार क्रमांक, फोटो आणि सही नीट तपासा. AFCAT परीक्षा १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत होणार आहे. AFCAT ०१/२०२२ ची नोंदणी १ डिसेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://bit.ly/3IJUGKU
Comments
Post a Comment