SWAYAM Online Courses: इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (ICSE) अकरावी आणि बारावीच्या नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT)स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स (SWAYAM) ऑनलाइन कोर्ससाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. २४ जानेवारी रोजी यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. एनसीईआरटीतर्फे ११ विषयांवर ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. यामध्ये अकाऊंट्स, बिझनेस स्टडीस, बायोलॉजी, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, गणित, भौतिकशास्त्र, मानसशास्त्र, इंग्रजी आणि समाजशास्त्र या विषयांचा समावेश आहे. या कोर्ससाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ciet.nic.in वर ३१ मार्चपर्यंत मोफत व्हर्च्युअल कोर्ससाठी अर्ज करू शकतात. २० डिसेंबरपासून सुरु झाले आहे असून ३१ मे रोजी संपणार आहेत. 'सध्या एनसीईआरटी २० डिसेंबर २०२१ ते ३१ मे २०२२ पर्यंत इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ११ विषयांमध्ये २८ एमओओसी (MOOC) ऑफर करत आहे. या अभ्यासक्रमांसाठी ३१ मार्चपर्यंत नावनोंदणी करता येईल. करोनाची सद्यस्थिती पाहता ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत. NCERT Enrolment: अशी करा नोंदणी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम स्वयम पोर्टल swayam.gov.in ला भेट द्या. होमपेजवरील साइन-इन वर क्लिक करा आणि क्रेडेन्शियल्स वापरून नोंदणी करा. एकदा नोंदणी केल्यानंतर, होमपेजवरील 'Continue with SWAYAM' या लिंकवर क्लिक करा. 'माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रम (NCERT)' वर क्लिक करा. नवीन पेज खुले झाल्यावर पाहिजे असलेल्या अभ्यासक्रमावर क्लिक करा. कोर्स पेज उघडेल. 'Enroll Course on Yourself' वर क्लिक करा. तुमची नोंदणी पूर्ण करा. अधिकृत सूचनेनुसार, 'शिक्षण मंत्रालयाने ९ जुलै २०१७ रोजी मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस (MOOCs) ऑफर करण्यासाठी स्वयंम प्लॅटफॉर्म सुरु केला. एनसीईआरटी अकरावी आणि बारावीच्या शालेय शिक्षण प्रणालीसाठी ११ विषयांमध्ये ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3IBhBYU
Comments
Post a Comment