India Post GDS Result 2022: भारतीय पोस्टच्या महाराष्ट्र सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक पदाच्या भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. या भरतीद्वारे महाराष्ट्र टपाल विभागात २४२८ पदांची भरती केली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल() पाहता येणार आहे. या पदांवरील उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीद्वारे (India Post GDS Merit List) दहावीच्या गुणांच्या आधारे करण्यात आली आहे. आता वेबसाइटवर गुणवत्ता यादी अपलोड करण्यात आली आहे. महाराष्ट्र सर्कल (India Post GDS 2021) मध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज प्रक्रिया २७ एप्रिल २०२१ पासून सुरू झाली. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासाठी २९ मे २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. उमेदवार अधिकृत वेबसाइट appost.in वर जाऊन निकालाचा तपशील तपासू शकतात. जीडीएस मेरिट लिस्ट अशी तपासा निकाल पाहण्यासाठी, उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइट- appost.in वर जा. वेबसाइटच्या होम पेजवर महाराष्ट्र भरती रिझल्ट लिंकवर जा. मेरीट लिस्टवर जाऊन निकाल पाहा. लिंकवर क्लिक केल्यावर पीडीएफ ओपन होईल. यामध्ये तुमचे नाव आणि रोल नंबरच्या मदतीने निकाल तपासा. रिक्त जागांचा तपशील जाहीर केलेल्या नोटिफिकिशननुसार महाराष्ट्र पोस्ट सर्कलमध्ये २४२८ पदांची भरती होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी ११०५, आर्थिक दुर्बल घटकासाठी २४६, ओबीसीसाठी ५६५, अनुसूचित जातीसाठी १९१, अनुसूचित जमातीसाठी २४४ आणि पीएच प्रवर्गासाठी ७७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nH6d5G
Comments
Post a Comment