Skip to main content

Posts

Showing posts from November, 2021

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

“मुंबईतील श्रीमंत वर्गात वृद्ध माता-पित्यांचा प्रॉपर्टीसाठी मुलांकडून छळ होतोय”, उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता!

वृद्ध मातापित्यांना त्यांच्या मुलांकडून सन्मानजनक वागणूक न मिळण्याची अनेक प्रकरणं आपण आपल्या आसपास देखील पाहातो. अशा अनेक मातापित्यांनी थेट न्यायालयात देखील याविरोधात दाद मागितल्याचं देखील अनेकदा दिसून येतं. मुंबई उच्च न्यायालयानं नुकताच अशाच एका प्रकरणामध्ये निवाडा दिला असून एका वृद्ध पित्याच्या बाजूने निकाल दिला आहे. आपल्याच मुलीकडून छळ होत असल्याची याचिका या वृद्ध पित्यानं न्यायालयात दाखल केली होती. पित्याच्या फ्लॅटवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवून बसलेल्या मुलीला न्यायालयानं तातडीने मालमत्ता खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, यावेळी न्यायालयाने मुंबईत अशी प्रकरणं वाढत असल्याबद्दल चिंता देखील व्यक्त केली. श्रीमंत वर्गामध्ये मुलांकडून छळ होण्याचं प्रमाण जास्त मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. “हा आमचा अनुभव आहे की या शहरात आणि विशेषत: श्रीमंत वर्गामध्ये वृद्ध मातापित्यांना त्यांच्या उतारवयामध्ये त्यांच्याच मुलांकडून त्रास आणि छळ सहन करावा लागतो”, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं. “आमच्यासमोर अशी ...

Video : खाद्यतेलात भेसळ करणाऱ्याला ‘मनसे स्टाईल’ दणका; थेट गोदामात जाऊन केला भांडाफोड!

भेसळयुक्त खाद्यपदार्थ किंवा इतर कोणत्याही बाबींवर FSSAI ची बारीक नजर असते. मात्र, तरीदेखील हे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचं अनेकदा उघड झालं आहे. या प्रकारातून लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचा भयंकर प्रकार हे भेसळ करणारे व्यावसायिक करत असतात. असाच एक प्रकार मनसेनं नालासोपाऱ्यामध्ये उघड केला असून सर्रासपणे खाद्यतेलामध्ये भेसळ केली जात असल्याचं या ठिकाणी दिसून आलं. या गोदामामध्ये मनसे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी संध्याकाळी धाड टाकली. यावेळी गोदाम मालकाला मनसे स्टाईलने ‘शासन’ करण्यात आल्याचा व्हिडीओ अविनाश जाधव यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. नालासोपारा फाट्यावर गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे खाद्यतेलांमध्ये भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. हे खाद्यतेल वसई-विरार परिसरामध्ये वेफर्स, फरसाण बनवणाऱ्या उद्योजकांना विकलं जात होतं. त्यामुळे आपण खात असलेल्या वेफर्स-फरसाणसाठी भेसळयुक्त तेल वापरलं जात असल्याची शक्यता देखील मनसेनं केलेल्या या भांडाफोडीमधून समोर आली आहे. “हा भयानक प्रकार आहे. या कंपनीत तेल पॅकिंग होतं. पण इथल्या एकाच मशीन...

IIT च्या प्राध्यापकांनी सांगितले Twitter CEO पराग अग्रवालच्या यशाचे रहस्य

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पराग अग्रवाल हा खूप हुशार आणि नियोजनबद्ध अभ्यास करणारा विद्यार्थी होता. या पद्धतीमुळेच त्याला हे यश मिळाल्याचे पराग यांना कम्प्युटर सायन्सचे शिक्षण देणारे आयआयटी मुंबईचे ( Bombay) प्राध्यापक सुप्रतिम बिश्वास यांनी मंगळवारी सांगितले. आयआयटी मुंबईचे विद्यार्थी पराग अग्रवाल यांची नुकतीच ट्विटरच्या सीईओपदी () नियुक्ती झाली. त्यानंतर मंगळवारी आयआयटीमधील प्राध्यापकांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या. पराग यांनी २००१मध्ये आयआयटी मुंबईत प्रवेश घेतला आणि २००५ मध्ये ते कॉम्प्युटर सायन्स विभागातून रौप्य पदक घेऊन उत्तीर्ण झाल्याचेही बिश्वास यांनी सांगितले. सुरुवातीपासून पराग विभागातील टॉपर विद्यार्थी होता. तरुण वयातील हे यश नियोजनबद्ध अभ्यासाचे फलित आहे. त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांना २०१९मध्ये यंग 'अलुमनी अचिव्हर पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले होते, असेही ते म्हणाले. हा पुरस्कार स्वीकारताना पराग यांनी हॉस्टेल ४च्या मागे बिहार तलावावर मित्रांसोबत घालवेला वेळ, मित्रांसोबत इंटरनेट शेअर करण्याच्या आठवणी जाग्या केल्या होत्या. आपल्य...

CBSE बारावी टर्म १ परीक्षा आजपासून, समाजशास्त्राचा पहिला पेपर

12th Board Exam 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) बारावी टर्म १ ची परीक्षा १ डिसेंबर २०२१ पासून सुरू होत आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी समाजशास्त्राची परीक्षा होत जात आहे. सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे सीबीएसई टर्म १ परीक्षेचे प्रवेशपत्र (CBSE Term 1 Admit Card) सोबत बाळगणे आवश्यक आहे. सीबीएसईने अधिकृत cbse.gov.in वर प्रवेशपत्र जाहीर केले आहे. वेबसाइटच्या होमपेजवर जाऊन ई-परीक्षा टॅबवर लॉगिन करून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. सीबीएसई टर्म १ बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेच्या ३० मिनिटे आधी नियुक्त केंद्रावर अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणजेच परीक्षा ११.३० पासून सुरू होत असेल, तर तुम्ही तुम्हाला दिलेल्या परीक्षा केंद्रावर ११ वाजता पोहोचले पाहिजे. परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. सीबीएसईद्वारे दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ परीक्षा अंतर्गत टर्म १ परीक्षांचे वेळापत्रक १८ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आले. विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर cbse.nic.i...

शाळा तूर्त बंदच! मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पहिली ते सातवीचे विद्यार्थी घरातच

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दोघेही, 'देशात-राज्यात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही... विनाकारण दहशतीखाली राहू नका', असा धीराचा सूर लावत असताना, आज, बुधवारपासून सुरू होण्याची आशा असलेल्या राज्यातील अनेक शहरांत बंदच राहतील, हे स्पष्ट झाले आहे. ओमायक्रॉनची धास्ती त्यास कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरांतील इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीच्या शाळा आता १५ डिसेंबर वा त्यानंतरच सुरू होऊ शकतील. मुंबईसह राज्यभरातील करोनास्थिती झटाट्याने निवळत असताना पहिली ते सातवी इयत्तांच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू होतील, अशी अपेक्षा होती. तब्बल २० महिने शाळांचे तोंडही न पाहिलेले विद्यार्थी व त्यांचे पालकही शाळांचे दार उघडण्याच्या प्रतीक्षेत होते. शाळा सुरू करताना कोणते नियम पाळावेत, याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही राज्यात जारी करण्यात आल्या होत्या. अर्थात, शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार स्थानिक महापालिका, पालिका यांच्यावर सोपवण्यात आले होते. आणि याच पार्श्व...

माझा छळ आणि अपमानित करण्यात आलं; NIA कोठडीत जबरदस्तीने…; सचिन वाझेंचे गंभीर आरोप

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी माजी न्यायामूर्ती चांदीवाल यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) कोठडीत असताना आपला छळ करण्यात आला. तसंच अपमानित करत जबरदस्तीने कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आली असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. आपण अद्यापही मानसिक धक्क्यात असल्याचं सचिन वाझे यांनी म्हटलं आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने मार्च महिन्यात चांदीवाल आयोग गठीत केला होता. मंगळवारी अनिल देशमुखांच्या वकिलांनी उलटतपासणी केली असता सचिन वाझेंनी आपण एनआयए विशेष कोर्टाकडे स्वाक्षरी केलेल्या कागदपत्रांची मागणी केली असून, अद्याप ती मिळाली नसल्याची माहिती दिली. परमबीर सिंह-सचिन वाझे भेटीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… अनिल देशमुखांच्या वकील अनिता यांनी तुम्ही एनआयए कोठडीत असताना तुम्ही कोणत्या दबावात होतात का? असं विचारण्यात आलं असता सचिन वाझे यांनी म्हटलं की, “हो नक्कीच….ते म...

लसवंतांनाच रिक्षा-टॅक्सी प्रवास ; राज्यातील सर्व ‘आरटीओं’ना परिवहन आयुक्तांच्या तपासणीच्या सूचना

मुंबई : करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबरोबरच रिक्षा-टॅक्सी प्रवासासाठीही लसीकरणाचा नियम लागू करण्यात येणार आहे. लसवंतांनाच रिक्षा-टॅक्सी प्रवासास परवानगी देण्यात येणार असून, यासंदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व ‘आरटीओं’ना सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी एक-दोन दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. दोन लसमात्रा घेतलेल्यांनाच सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ किंवा लसीकरण प्रमाणपत्र असेल तरच प्रवास करता येईल, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची सूचना ‘बेस्ट’ प्रशासनाने सर्व आगारप्रमुख आणि व्यवस्थापकांना दिली. त्यानुसार ‘बेस्ट’कडून नियोजन सुरू असून, वाहक-चालकांना यासंदर्भात सूचनाही दिल्या जात आहेत. आता या नियमाची अंमलबजावणी रिक्षा, टॅक्सीमध्येही होणार आहे. राज्यातील सर्व ‘आरटीओं’ना या नव्या नियमावलीची माहिती देतानाच त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.  ‘आरटीओ’च्या भरारी पथकां...

शाळा १५ डिसेंबरनंतरच ; मुंबई, ठाण्यासह शहरांतील स्थानिक प्रशासनांची प्रतीक्षेची भूमिका

मुंबई : राज्यातील पहिलीपासूनच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असली तरी बहुतांश शहरांतील स्थानिक प्रशासनाने काही काळ प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली. ग्रामीण भागांत मात्र शाळा नियोजनाप्रमाणे आज, बुधवारपासूनच सुरू होणार आहेत. दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर शिक्षण आणि आरोग्य विभागाने पहिलीपासूनचे वर्ग बुधवारपासून (१ डिसेंबर) सुरू करण्यास परवानगी दिली, मात्र करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूच्या भीतीमुळे बहुतेक महापालिकांनी परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील शाळा बुधवारपासून सुरू होणार असल्या तरी शहरी भागांतील पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना मात्र अजून काही दिवस ऑनलाइन वर्गानाच हजेरी लावावी लागणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे जिल्ह्यातील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत, तर नाशिक, नागपूर, औरंगाबाद येथील शहरी भागांतील शाळा १० डिसेंबरनंतर सुरू होणार आहेत. बाधित नसल्याच्या अहवालाचा पेच शिक्षक, कर्मचाऱ्यांना गेल्या ४८ तासांतील करोना चाचणीचा अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षक, कर्मचारी बाधित नसल्याचे निष्पन्...

ममतादीदींचा ‘जय मराठा, जय बांगला’चा नारा ; राजकीय मैत्री वाढविणारी भेट, आदित्य ठाकरे यांचा दावा

मुंबई : मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रिक केल्यावर विविध राज्यांना भेटी देण्याच्या उपक्रमअंतर्गत दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शहरात दाखल होताच ‘जय मराठा, जय बांगला’चा नारा देत शिवसेनेशी राजकीय सहकार्याचे मंगळवारी संकेत दिले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ममतादीदींची भेट घेतली. पश्चिम बंगालमध्ये उद्योजकांना निमंत्रित करण्याकरिता तसेच राजकीय भेटीसाठी ममता बॅनर्जी या मुंबईत दाखल झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची त्यांची योजना होती, परंतु ठाकरे हे रुग्णालयात दाखल असल्याने आदित्य ठाकरे यांनी बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर शिवसेना खासदार संजय राऊत हेसुद्धा होते. ममता बॅनर्जी या उद्या दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. मुंबईत दाखल होताच बॅनर्जी यांनी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केल्याचे सांगत जय मराठा, जय बांगला अशी घोषणा त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात केली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत बंगाली मतदारांची शिवसेने...

केईएम, कस्तुरबामध्ये सुविधा ; ओमायक्रॉनच्या पडताळणीसाठी परदेशातून आलेल्या बाधितांच्या चाचण्या

शैलजा तिवले, लोकसत्ता मुंबई : आफ्रिकेसह १२ देशांमधून आलेल्या प्रवाशांना ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूची बाधा झाली आहे का याची पडताळणी आता केईएम आणि कस्तुरबा या दोन प्रयोगशाळांमध्ये होणार आहे. एस जनुकाचा वापर केलेली आरटीपीसीआर चाचणी या प्रयोगशाळांमध्ये होणार असून बाधित प्रवाशांचे नमुने येथे चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. करोना विषाणूच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीमध्ये एस, एन, ई आणि ओरएफ हे जनुकीय घटक असतात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, ओमायक्रॉनची बाधा झालेल्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी केल्यास नमुन्यामध्ये एन हा जनुकीय घटक अस्तित्वात नसल्याचे बहुतांश प्रयोगशाळांच्या अहवालात निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा जनुकीय घटक नसल्याचे आरटीपीसीआर चाचणीत दिसल्यास ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समजण्यात यावे, असे सूत्र प्राथमिक पडताळणीसाठी वापरता येईल. परंतु अंतिम निर्णयासाठी जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेिन्सग) चाचण्या करणे आवश्यक आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईत हजाराहून अधिक प्रवासी आफ्रिकेसह ओमायक्रॉनचे रुग्ण आ...

संपामुळे एसटीला ४३९ कोटींचा फटका

मुंबई: विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे ४३९ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील एसटी गाडय़ांची होणारी धाव व कर्मचारी कर्तव्यावर रुजू होण्याचे प्रमाण अद्यापही कमीच आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल कायम असून सर्व मदार खासगी वाहतुकीवरच आहे. एसटीच्या कामगार संघटनांच्या कृती समितीने २७ ऑक्टोबरपासून महागाई भत्ता आणि अन्य मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले. २८ ऑक्टोबरला या मागण्यांसाठी अघोषित संप पुकारल्याने एसटी सेवा बंद झाली. विलीनीकरणाच्या मागणीसाठीही कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला व तो अद्यापही कायमच आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आगारातून खासगी बसगाडय़ा, शालेय बस आणि इतर वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. आणखी ६१० कर्मचारी निलंबित मंगळवारी ६१० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ८ हजार १९५ झाली आहे, तर रोजंदारीवरील ८० कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती केल्याने ही संख्याही १ हजार ८२७ झाली आहे. The post संपामुळे एसटीला ४३९ कोटींचा फटका appeared first on L...

यंदाही चैत्यभूमीवर प्रवेशबंदी

मुंबई : येत्या ६ डिसेंबर रोजी येणाऱ्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनावरही ओमायक्रॉन या करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचे सावट आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनी अनुयायांना चैत्यभूमीवर येण्यास मनाई करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरूनच अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेतर्फे यावर्षीही शिवाजी पार्क मैदान परिसरात अनुयायांसाठी तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्यात येणार नाही. तसेच चैत्यभूमी परिसरात स्टॉल, दुकाने लावण्यासही मनाई करण्यात आली आहे. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येतात.  गेल्या काही दिवसात दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन हा करोनाचा उत्परिवर्तित विषाणू आढळून आल्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. नागरिकांमध्ये या विषाणूचा संसर्ग वेगाने पसरू नये म्हणून सामाजिक कार्यक्रम, तसेच जास्त गर्दी होईल असे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारच्या गृह वि...

सीआयडीकडून सलग दुसऱ्या दिवशी परमबीर सिंह यांची चौकशी ; तीन गुन्ह्यांमधील चौकशी प्रक्रिया पूर्ण

मुंबई: राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह यांची ठाण्यातील कोपरी प्रकरणात मंगळवारी चौकशी केली. सीआयडीकडे सिंह यांच्याविरोधात दाखल तिन्ही प्रकरणांमध्ये सिंह यांचा जबाब नोंदविण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना ६ डिसेंबपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. सलग दोन दिवस सिंह यांची चौकशी करण्यात आली. सीआयडी परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल दोन खंडणीच्या गुन्ह्यांसह तीन गुन्ह्यांचा तपास करत आहे. तिसरा गुन्हा हा  अनुसुचीत जाती व अनुसुचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गंभीर कलमांतर्गत  दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांच्या तक्रारीवरून कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी परमबीर सिंहसह इतर व्यक्ती व अधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला होता.  याप्रकरणी जूनमध्येच सिंह यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. परमबीर सिंह यांच्याविरोधातील खंडणीच्या दोन गुन्ह्यांमध्ये सीआयडी तपास करत आहे.  श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारी...

भारताच्या बुद्धिबळातील प्रगतीचा पट ; ‘सहज बोलता बोलता’मध्ये ग्रँडमास्टर अभिजित कुंटे याच्याशी आज वेबसंवाद

मुंबई : भारताने बुद्धिबळाच्या जागतिक पटावर चौथ्या स्थानी झेप घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रशिक्षक, संयोजक ग्रँडमास्टर अभिजित कुंटे याच्याशी बुधवार, १ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’च्या माध्यमातून देशाच्या बुद्धिबळातील प्रगतीबाबत संवाद साधला जाणार आहे. १९९७ साली वयाच्या २१व्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या कुंटेने भारताचा जागतिक बुद्धिबळातील अगदी तळापासून ते महासत्ता बनण्यापर्यंतचा प्रवास खूप जवळून अनुभवला आहे. कुंटेने खेळाडू आणि मग प्रशिक्षक म्हणून केलेल्या कामगिरीची दखल घेत सरकारने त्याला प्रतिष्ठेच्या ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. त्याच्या मार्गदर्शनात भारताने यंदा ‘फिडे’ ऑनलाइन ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य, तर महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताने रौप्यपदकावर नाव कोरले. या कामगिरीत द्रोणावल्ली हरिकासारख्या अनुभवी खेळाडूसह आर. वैशाली आणि आर. प्रज्ञानंद यांनी बहुमूल्य योगदान दिले. या खेळाडूंच्या कामगिरीबाबतचा आढावा वेबसंवादात घेतला जाईल. ऑलिम्पियाडमध्ये चार वेळा भारताचे प्रतिनिधित्व करणारा कुंटे याला २०००...

अजेंद्र सिंग नौदलाच्या पश्चिम विभागाच्या प्रमुखपदी रुजू

मुंबई : व्हाईस अ‍ॅडमिरल अजेंद्र सिंग यांनी मंगळवारी भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. यापूर्वी ते पूर्व विभागाचे प्रमुख होते. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथील गौरवस्तंभ येथे पुष्पहार अर्पण करून जवानांना अभिवादन करून त्यांनी पदभार स्वीकारला. सिंग हे १ जुलै १९८३ पासून नौदलाच्या सेवेत असून दिशानिर्देशाचे तज्ज्ञ आहेत. यूपी सैनिक स्कूल, लखनऊ आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासलाचे ते  माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी वेलिंग्टन येथे स्टाफ कोर्स दरम्यान मद्रास विद्यापीठातून पहिली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यावेळी त्यांना स्कडर पदक प्राप्त झाले. युनायटेड किंगडम येथील क्रॅनफिल्ड विद्यापीठातून त्यांनी २००५ मध्ये ग्लोबल सिक्युरिटीमध्ये पदव्युत्तर पदवीदेखील मिळवली. नौदलाच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक उच्च पदे भूषवली आहेत. पवन मोहिमेत आयएनएस कमोर्टाचे आणि विनाशक आयएनएस रणजितचे ते दिशादर्शक अधिकारी होते. त्यांचे चारही ऑपरेशनल कमांड मुंबई येथील जहाजांवर होते. ते पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी, कोची येथील नेव्हिगेशन अ‍ॅण्ड डायरेक्शन स्कूल आणि डिफेन्स सव्‍‌र्हिसे...

कौशल्य शिक्षणासाठी ‘इन्फोसिस’बरोबर सामंजस्य करार

मुंबई : राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि त्यांची रोजगारक्षमता वाढावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ‘इन्फोसिस’ कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस कंपनी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची माहिती दिली. यावेळी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक डॉ.अभय वाघ, इन्फोसिसचे तिरूमला आरोही, संतोष अंनदापुर, किरण एम. जी. आदी अधिकारी उपस्थित होते. इन्फोसिस पहिल्यांदाच असा करार करत आहे. यामुळे जवळपास ४० लाख विद्यार्थी आणि एक लाख प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना फायदा होणार आहे. हे शिक्षण पूर्णपणे इन्फोसिसकडून मोफत असून याचा राज्य शासनावर आर्थिक भार पडणार नाही, अशी माहिती सामंत यांनी दिली. इन्फोसिसच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) अंतर्गत विविध विषयांवरील आणि विविध कालावधीचे ३,९०० हून अधिक ऑनलाईन अभ्यासक्रम तयार केले असून ते कंपनीच्या स्प्रिंग बोर्ड या ऑनलाईन मंचावर उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम राज्यातील सर्व महाविद्या...

एचआयव्ही निदान आणि उपचार सेवा हळूहळू पूर्वपदावर

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये तुलनेने कमी नुकसान, औषधोपचार पोहोचविण्यात यश, उपचार घेणाऱ्यांत वाढ मुंबई : करोना साथीच्या काळात मुंबईतील एचआयव्ही चाचण्या आणि निदान याचे कमी झालेले प्रमाण हळूहळू पूर्वपदावर येत असून पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये यावर फारसा परिणाम झाला नसल्याचे निर्दशनास आले आहे. करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान टाळेबंदी लागू झाल्यानंतर मुंबईत उपचार घेणाऱ्या एचआयव्हीबाधित रुग्णांपर्यंत पोहोचणे आणि चाचण्या करणे आव्हानात्मक होते. परिणामी, या काळात एचआयव्हीच्या चाचण्या आणि निदानामध्ये जवळपास निम्म्याने घट झाली. त्यामुळे २०१९-२० च्या तुलनेत नव्याने निदान होणाऱ्या एचआयव्हीबाधित रुग्णांच्या संख्येत निम्म्याने घट झाली, परंतु करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांपर्यंत पोहचण्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण विभागाने (एमडॅक्स) केलेल्या वेगवेगळय़ा उपाययोजनांमुळे तुलनेने निदान आणि उपचार सेवा पोहचविण्यावर फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे गेल्या सात महिन्यांत एचआयव्ही निदान आणि उपचार सेवा हळूहळू पूर्वपदावर एक लाख ९० हजार चाचण्या झाल्या असून त्यात १६५९ रुग्णांचे नव्याने निदान झ...

ग्राहकांच्या बेपर्वाईचा व्यापाऱ्यांना भुर्दंड

राज्य सरकारच्या नव्या नियमांवर दुकानदारांची नाराजी इंद्रायणी नार्वेकर मुंबई : ओमायक्रॉन या करोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा धोका निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या नियमावली करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंडाची तरतूद वाढवण्यात आली आहे. मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्याबरोबरच एखाद्या आस्थापनेत ग्राहकाने मुखपट्टी लावली नसल्यास आस्थापनेला दहा हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. या नव्या नियमावलीमुळे दुकानदारांमध्ये नाराजी पसरली आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन हा करोनाचा नवीन विषाणू प्रकार आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या विषाणूचा धोका ओळखून राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यात करोनाचे नियम पाळणे बंधनकारक करण्याबरोबरच दंडाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असाव्यात, अशी अटही घालण्यात आली आहे. नव्या नियमावलीत करोना नियमांचे पालन न करणाऱ्या, मुखपट्टी न लावणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक प्रसंगी ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच दुकाने, मॉल, कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांन...

रंगसफेदीची घाई

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नगरसेवकांची कामे उरकण्यासाठी लगबग निवडणूक येती शहरा.. मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन मतदारांना आकर्षित करण्यासाठी नगरसेवकांमध्ये आता अहमहमिका सुरू झाली आहे. मतदारांना ‘दिसतील’ अशी कामे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी उरकण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी पायवाटांवर लाद्या बसवणे, गटारे, शौचालयांची दुरुस्ती, रस्त्यांवरील दुभाजक नीटनेटके करणे, छोटेखानी उद्यानांच्या सुशोभिकरणाची कामे, रंगरंगोटी सुरू आहे. नगरसेवकांना आपापल्या प्रभागातील छोटी-मोठी नागरी कामे करता यावी यासाठी त्यांना प्रशासनाकडून दरवर्षी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नगरसेवक निधीच्या रुपात एक कोटी रुपये, तर प्रभाग निधीच्या रुपात ६० लाख रुपये निधी देण्यात येतो. या निधीचा वापर करुन अनेक कामे केली जातात. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुका जवळ येताच लोकप्रतिनिधी आपापल्या विभागात नागरी कामांचा सपाटा लावतात. मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांचे नगरसेवक आता वेगाने कामाला लागले ...

व्यावसायिक गॅसचे दर कमी करण्याची मागणी

उपाहारगृह व्यावसायिकांचे पंतप्रधानांना पत्र मुंबई : स्वयंपाकाच्या व्यावसायिक गॅसच्या दरवाढीने हैराण झालेल्या उपाहारगृह व्यावसायिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे. ‘स्वयंपाकाच्या व्यावसायिक गॅसवरील वस्तू व सेवा कर १८ टक्क्यांवरून पाच टक्के करावा. जेणेकरून व्यवसायाला दिलासा मिळेल, अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे.  उपाहारगृहात जेवण तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक गॅसच्या दरात महिन्याभरात २६६ रुपये, तर वर्षभरात ७६१ रुपयांची दरवाढ झालेली आहे. या दरवाढीमुळे व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. इंधन महागले तर पदार्थाच्या किमती वाढतील, परिणामी ग्राहकांना दरवाढ सहन करावी लागेल. सद्य:स्थितीत ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्याने असे होणे योग्य नाही. त्यामुळे केंद्र सरकारने गॅसच्या दरात कपात करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असे आवाहन या व्यावसायिकांनी केले आहे. गॅस दरवाढीबरोबरच डिझेल आणि पेट्रोलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आमच्या व्यवसायात वाहतुकीचा महत्त्वाचा वाटा आहे. एकूणच इंधनामध्ये होणारी दरवाढ पाहता जीवनावश्यक वस्...

महाविद्यालयांबाहेरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची निराशा

विद्यार्थी नसल्याने व्यवसायावर परिणाम मुंबई : महाविद्यालये सुरू होऊनही अद्याप विद्यार्थ्यांची उपस्थिती तुरळक आहे. महाविद्यालय सुरू झाल्यानंतर विद्यार्थी येतील आणि व्यवसायाला चालना मिळेल, असा महाविद्यालयांबाहेरील कट्टय़ांवर खाद्यपदार्थ विकून उपजीविका करणाऱ्या विक्रेत्यांचा समज झाला होता. मात्र विद्यार्थ्यांच्या जेमतेम उपस्थितीमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. महाविद्यालयांचे दार खुले झाले असले तरी अद्याप सर्व वर्ग सुरू झाले नाहीत. त्यामुळे मोजकेच विद्यार्थी महाविद्यालायत येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गजबजणारे महाविद्यालयांबाहेरील कट्टे अजूनही सुनेच आहे. परिणामी कट्टय़ांवर विद्यार्थीच नसल्याने तेथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना इतर ग्राहकांवर समाधान मानावे लागत आहे. रुईया, पोद्दार महाविद्यालयाजवळ मिळणारे सुभाष सँडविच, खालसाची फ्रँकी, विलेपाल्र्यातील बाबूचा वडापाव, मिठीबाई शेजारील खाऊगल्ली, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स बाहेरील शेवपुरी अशी निरनिराळी खासियत असलेले खाद्यपदार्थाचे विक्रेते प्रत्येक महाविद्यालयाशी जोडले गेले आहे. वर्षांनुवर्षे हे विक्रेते तिथे व्यवसाय करीत आहे...

परमबीर सिंह-सचिन वाझे भेटीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह सोमवारी निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगापुढे हजर झाले. चौकशी आयोगाने यावेळी परमबीर सिंह यांच्याविरोधात जारी केलेला जामीनपात्र वॉरंट रद्द केला तसंच १५ हजार रुपये दंड ठोठावला. दरम्यान यावेळी परमबीर सिंह आणि सचिन वाझे आमने-सामने आले होते. सुमारे तासभर दोघे एकत्र गप्पा मारत होते. या भेटीवरुन चर्चा रंगली असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सचिन वाझे-परमबीर सिंह भेट ; अनिल देशमुख यांच्या वकीलांची नाराजी दिलीप वळसे पाटील यांनी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीसंबंधी चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, “हे अत्यंत चुकीचं आहे. जेव्हा एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा त्याला कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहेरच्या लोकांना भेटायची अनुमती नसते. मात्र तरीही त्यांनी भेट घेतली याची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तांना सांगण्यात आलं आहे”. चांदीवाल आयोगासमोर हजर होण्यासाठी गेलेल्या परमबीर सिंग या...

देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील ६२२९ रिक्त जागा भरणार

Recruitment: विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यापीठांचे कुलगुरू, संस्था आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासाठी परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकात देशातील विद्यापीठांमधील रिक्त पदांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत, असे यूजीसीने म्हटले आहे. यूजीसीने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, फॅकल्टी (प्राध्यापक) कायमस्वरूपी नियुक्त्यांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्ली विद्यापीठात (DU) १ एप्रिलपर्यंत विविध विभागांमध्ये असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसरची सुमारे ८४६ पदे रिक्त आहेत. तसेच देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक पदाची भरती केली जाणार आहे. शिक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील विद्यापीठांमध्ये एकूण ६२२९ प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. यापैकी १०१२ या एससीसाठी, ५९२ एसटीसाठी, १७६७ इतर मागासवर्गीय (OBC), ८०५ इडब्ल्यूएस आणि ३५० दिव्यांग प्रवर्गाच्या जागा रिक्त आहेत. तसेच उर्वरित सामान्य श्रेणीतील पदे आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली विद्यापीठासह ४४ केंद्रीय विद्य...

दरेकरांकडून १,००० कोटींच्या अब्रू नुकसानीच्या खटल्यावर वक्तव्य, नवाब मलिक म्हणाले, “आ देखें जरा…”

भाजपा नेते मोहित कुंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात १,००० कोटी रुपयांच्या अब्रु नुकसानाचा खटला दाखला केलाय. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी देखील आता नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. त्याला मलिकांनी प्रत्युत्तर देत दरेकरांना आव्हान दिलंय. सोमवारी (२९ नोव्हेंबर) या प्रकरणातच मलिकांना माझगाव कोर्टात हजर राहावं लागलं. तिथं त्यांना जामीन देण्यात आला. नवाब मलिक यांनी प्रविण दरेकर यांचं एक ट्वीट रिट्वीट करत म्हटलं, “आ देखें जरा किसमें कितना है दम”. आ देखें ज़रा किसमें कितना है दम @mipravindarekar https://t.co/hjLkJjc3NN — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 30, 2021 प्रविण दरेकर काय म्हणाले होते? प्रविण दरेकर म्हणाले होते, “महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला फारशी किंमत दिली जात नाही. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा विदर्भात फारसा बेस नाही. काँग्रेसबद्द्ल विदर्भातील लोकांच्या मनात संशय निर्माण करण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून विदर्भात अधिवेशन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. नवाब मलि...

ICG Recruitment: इंडियन कोस्ट गार्डमध्ये भरती, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Recruitment 2021: भारतीय तटरक्षक दलामध्ये (indian Cost Guard) सहाय्यक कमांडंट (ग्रुप ए) या पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आहेत. सर्व पात्र उमेदवार आयसीजी ग्रुप ए भरती २०२१ (IGC Group A Recruitment 2021) साठी ६ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०२१ पर्यंत अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे, भारतीय तटरक्षक दलात एकूण ५० रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ज्यामध्ये जनरल ड्युटीची ३० पदे, कमर्शियल पायलटची १० पदे, टेक्निकल (इंजिनिअरिंग) ६ पदे आणि टेक्निकल (इलेक्ट्रिकल) ४ पदांचा समावेश आहे. जनरल ड्यूटी आणि टेक्निकल ब्रांचसाठी, उमेदवाराचा जन्म १ जुलै १९९७ ते ३० जून २०२१ दरम्यान झालेला असावा. तर व्यावसायिक पायलट प्रवेशासाठी, उमेदवाराचा जन्म १ जुलै १९९७ ते ३० जून २००३ दरम्यान झालेला असावा. भारतीय तटरक्षक भरतीसाठी उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर निवडले जाणार आहे. उमेदवारांची प्राथमिक परीक्षा होईल. त्यानंतर अंतिम निवड केली जाईल. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार ICG भरती २०२१ साठी ६ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत अधिकृत वेबसाइट joinindianco...

ठरलं; १ डिसेंबरपासून शाळा, शासन परिपत्रक जारी

मुंबई: येत्या १ डिसेंबर पासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज जारी करण्यात आले आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन लसी) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ साठीची ४८ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे. शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठका देखील शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उप...

Video: बापाचं काळीज… लग्नानंतर मुलीची बोळवण करताना संजय राऊतांच्या डोळ्यात आलं पाणी

शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांचा विवाहसोहळा सोमवारी मुंबईमध्ये पार पडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे पूर्वशी यांच्यासोबत आज लग्नबंधनात अडकल्या. अनेक दिग्गजांनी हजेरी लावल्याचं पहायला मिळालं. अगदी पालिका स्तरावरील महत्वाच्या पदावरील व्यक्तींपासून राष्ट्रीय राजकारणात दबदबा असणाऱ्या नेत्यांनी या लग्नाला हजेरी लावली होती. लग्नादरम्यान संजय राऊत हे अनेकांचे अगदी आपुलकीने स्वागत करताना दिसत होते. या लग्नातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत असतानाच राऊत यांची हळवी बाजू दाखवणारा पूर्वशी यांना लग्नानंतर निरोप देतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. पाहा खास फोटो >> मंचावरील गप्पा, सुरक्षा रक्षकांचं कडं अन् सेल्फीसाठी गर्दी…; राऊतांच्या मुलीच्या लग्नात राज ठाकरेंची चर्चा भारतीय राजकारणामध्ये सध्या आक्रमक वक्तृत्व शैली असणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी असणारे आणि त्यासाठी देशभरामध्ये ओळखले जाणारे राऊत आज मुलीच्या लग्नानंतर बोळवणीच्या वेळेस भावुक झालेले दिसले. लग्न अगदी थाटामाटात आणि दिग्गजांच्या उप...

पदभरतीस मुदतवाढ मागणाऱ्या सरकारला न्यायालयाने फटकारले ; राज्य मानवाधिकार आयोगाची रिक्त पदे

मुंबई : वारंवार मुदतवाढ देऊनही राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांसह सदस्य आणि अन्य कर्मचारीवर्गाची रिक्त पदे भरण्यात दिरंगाई करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने सोमवारी फटकारले. मणक्यावरील शस्त्रक्रियेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल असून ते स्वाक्षरीसाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे नियुक्तीच्या पुढील प्रक्रियेसाठी आणखी एक महिन्याचा कालावधी मागणाऱ्या सरकारवरही न्यायालयाने  नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या नियुक्त्यांबाबत आठवडाअखेरीस चित्र स्पष्ट करण्याची हमी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी दिली. या प्रकरणी वैष्णवी घोलावे यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळी आयोगाच्या अध्यक्षांसह सदस्य आणि अन्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे सरकारने अद्याप भरली नसल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. यशोदीप देशमुख आणि अ‍ॅड. विनोद सांगवीकर यांनी न्यायालयाला दिली.  त्यावर मुख्यमंत्री शस्त्रक्रियेमुळे सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणख...

आफ्रिकेतून आलेल्या १०० प्रवाशांच्या पुन्हा चाचण्या ; ४६६ प्रवासी मुंबईत दाखल

मुंबई : गेल्या १५ दिवसांमध्ये आफ्रिकेतील देशांमधून ४६६ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यापैकी १०० जण मुंबईतील असून त्यांच्या पुन्हा चाचण्या करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबईत १२ नोव्हेंबरपासून ४६६ प्रवासी आफ्रिकेतील देशांमधून आले आहेत. यातील १०० प्रवासी मुंबईतील आहेत, तर ३६६ प्रवासी मुंबईबाहेरील आहेत. मुंबईत असलेल्या १०० प्रवाशांपैकी एकालाही करोनाची बाधा झालेली नव्हती. त्यांचा विलगीकरणाचा काळही पूर्ण झालेला आहे. या प्रवाशांना विलगीकरणाच्या कालावधीत करोनाची बाधा झालेली असल्यास किंवा त्यानंतर लक्षणे दिसून आल्याची शक्यता आहे. दक्षता म्हणून यांच्या पुन्हा चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काहींच्या चाचण्या सोमवारी केल्या आहेत. आणखी काही प्रवाशांची यादी मंगळवारी मिळणार असून या प्रवाशांच्याही चाचण्या केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे सहायक आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. ठाण्यात प्रवाशांच्या अहवालाची प्रतीक्षा ठाणे महापालिका क्षेत्रात सात जण दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करून आल्याचे समोर आले आहे. विमानतळावर करण्यात आलेल्या करोना चाचणी अहवालामध्ये त्यांना करोना नसल्याचे स्पष्ट ...

१ कोटी लाभार्थीची दुसऱ्या मात्रेकडे पाठ ; मुंबई, ठाण्यासह पाच जिल्ह्यंमध्येच बहुतांश लसीकरण

शैलजा तिवले, लोकसत्ता मुंबई : राज्यात झालेल्या एकूण लसीकरणापैकी ४४ टक्के लसीकरण मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये झाले आहे, तर सुमारे एक कोटी नागरिकांची दुसऱ्या मात्रेची नियोजित वेळ उलटून गेली तरी अद्याप ते लसीकरणासाठी आलेले नाहीत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात लसीकरण वेगाने होत आहे. असे असले तरी राज्यातील पाच जिल्ह्यांमध्येच बहुतांश लसीकरण आहे. २४ नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण १० कोटी ९२ लाख लसीकरण झाले. यातील सर्वाधिक चार कोटी ८१ लाख लसीकरण मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये झाले आहे. सर्वाधिक म्हणजे १५ टक्के लसीकरण मुंबईत, तर त्याखालोखाल पुणे (१२ टक्के), ठाणे (आठ टक्के), नाशिक (पाच टक्के) आणि नागपूरमध्ये (पाच टक्के) झाले आहे. राज्यात एक कोटी नागरिकांची दुसऱ्या मात्रेची वेळ उलटून गेली आहे. मात्र ते दुसरी मात्रा घेण्यासाठी आलेले नाहीत. यात ८४ लाख नागरिक कोविशिल्ड, तर १४ लाख कोव्हॅक्सिन लस घेणारे आहेत, असे आरोग्य आयुक्तालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये लसीकरणात घट आतापर्यंत राज्यात सप्टेंबरमध्ये सर्व...

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सदस्य संख्येत वाढ ; मंत्रिमंडळाचा निर्णय; हिवाळी अधिवेशनात विधेयक

मुंबई : राज्यातील महानगरपालिकांमधील नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने आता राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींमधील सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची एकूण संख्या दोन हजारांवरून २२४८ तर पंचायत समिती सदस्यांची संख्या चार हजारांवरून ४४९६ होईल. याबाबतचे विधेयक विधिमंडळाच्या २२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल. लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय महिनाभरापूर्वी राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्याच धर्तीवर आता जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या लोकसंख्येनुसार कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ आहे. आता जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीतकमी ५५ व जास्तीत जास्त ८५ करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य निवडणूक आयोग, जिल्ह्यातील निर्वाचक गटांतून थेट निवडणुकीद्वार  निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या निश्चित  करील. वटहुकमाऐवजी विधेयक महानगरपालिकांची सदस्य संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्यावर त्याबाबतचा वटहुकूम काढ...

निलंबित एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार

मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या कायमस्वरूपी एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर आता त्यांच्यावर बडतर्फीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. पहिल्या टप्प्यात एसटीच्या तीन हजार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची नोटीस बजावून आरोपपत्र दाखल केले होते आणि १५ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश होते. त्याची मुदत उलटूनही काही कर्मचाऱ्यांनी अद्यापही उत्तर न दिल्याने आत बडतर्फीची नोटीस देण्याची तयारी महामंडळाने सुरू केली आहे. राज्यात विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. हा संप अद्यापही सुरूच आहे. अखेर एसटी महामंडळाने नियमित कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ८ नोव्हेंबरपासून कारवाईला सुरुवात केली. १० नोव्हेंबपर्यंत एसटीतील ९१८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. २२ नोव्हेंबपर्यंत निलंबितांची संख्या दोन हजार ९६७ झाली. तर २३ नोव्हेंबरला ती तीन हजार ५२ पर्यंत पोहोचली. निलंबनाची नोटीस दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला आपले म्हणणे मांडण्यासाठी महामंडळाकडून १५ दिवसांची मुदत देण्यात येते. काही कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले आहे, तर काही जणांनी त्याकडे...

सचिन वाझे-परमबीर सिंह भेट ; अनिल देशमुख यांच्या वकीलांची नाराजी

मुंबई : गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह सोमवारी निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी आयोगापुढे हजर झाले. यावेळी आयोगाने सिंह यांच्याविरोधात जारी केलेला जामीनपात्र वॉरंट रद्द केला व त्यांच्यावर १५ हजार रुपये दंड ठोठावला. पण यावेळी सचिन वाझे यांची परमबीर सिंग भेट चर्चेचा विषय ठरली. सुमारे तासभर दोघे एकत्र गप्पा मारत होते.  वाझे-सिंह भेटीबद्दल साहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने प्राथमिक चौकशी केली. एक उपनिरीक्षक व तीन शिपायांचे जबाब नोंदवल्यानंतर त्याची कागदपत्रे नवी मुंबई पोलिसांना सुपूर्द करण्यात आली. वाझेंसोबत आलेले पोलीस नवी मुंबई पोलीस दलाला संलग्न असल्यामुळे ही कागदपत्रे पुढील कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांना देण्यात आल्याचे उपायुक्त डॉ. हरी बालाजी यांनी सांगितले. या प्रकरणाची गृह विभागाकडून माहिती घेण्यात आली.  अनिल देशमुख यांच्या वकिलांनी आपली नाराजी न्यायमूर्ती चांदीवाल यांच्यासमोर व्यक्त केली.  आयोगाने सचिन वाझेंना आयोगासमोर हजर करण्याचे आदेश दिले आणि  ताकीद दिली. आमच्याकरता सर्व अधिकारी समान आहेत. यापेक्षा तुम...

वानखेडे कुटुंबीयांविरोधात वक्तव्य करणार नसल्याची मलिक यांची हमी

मुंबई : केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधातील मानहानीच्या दाव्यात अंतरिम दिलासा देण्यास नकार देणाऱ्या एकलपीठाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी रद्द केला. मलिक आणि वानखेडे यांच्या परस्पर सहमतीनंतर खंडपीठाने हा निर्णय रद्द केला. तसेच प्रकरण अंतरिम दिलासा मिळवण्याच्या मागणीसाठी नव्याने ऐकण्यासाठी पुन्हा एकलपीठाकडे वर्ग  केले.  समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यातील अंतरिम दिलासा देण्याबाबतच्या मागणीवर एकलपीठाकडून निर्णय दिला जाईपर्यंत वानखेडे कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नसल्याच्या हमीचाही मलिक यांच्याकडून यावेळी पुनरुच्चार केला गेला. वानखेडे कुटुंबीयांबाबत समाजमाध्यमावरून केलेली मलिक यांची वक्तव्ये ही द्वेषातूनच असल्याचे नमूद करताना वानखेडे कुटुंबीयांबाबत वक्तव्य न करण्याचे आदेश आम्ही देऊ की तुम्ही तशी हमी देणार, अशी विचारणा न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती मििलद जाधव या...

जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ ; राखीव जागांवरील उमेदवारांना दिलासा

मुंबई: महानगरपालिका,नगरपरिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १२ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सोमवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संदर्भातील वटहुकूम राज्यपालांच्या मान्यतेने काढण्यात येईल. महानगरपालिका,नगरपरिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना नामनिर्देशन पत्रासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. पण इतक्या मोठय़ा प्रमाणातील उमेदवारांना कमी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळणे शक्य नसल्याची व्यावहारिक अडचण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. तसेच जात पडताळणी समितीमधील कामकाज वेगाने व्हावे यासाठी तेथील रिक्तपदे डिसेंबरअखेपर्यंत भरण्याचा निर्णयही घेण्यात आला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिनांकापूर्वी ज्या व्यक्तीने आपल्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल परंतु नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दिनांकाला त्या व्यक्तीस वैधता प्रमाणपत्र मिळाले नसेल अशी व्यक्ती ती निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून १२ महिन्...

मंत्रिमंडळात करोनाबाबत चिंता ; दक्षिण आफ्रिकेतून हजारभर प्रवासी मुंबईत

मुंबई : करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त करत सोमवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या विषाणूचा संसर्ग रोखण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत सतर्क राहण्याच्या व त्यांच्यावर प्रशासन लक्ष ठेवत असल्याबाबत काळजी घेण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तर १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून एक हजाराच्या आसपास प्रवासी मुंबईत आले असून त्यांच्याशी संपर्क साधला जात असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह झालेल्या करोनाबाबतच्या बैठकीची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत दिली. ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचा उद्रेक झाला आहे तेथील लाट मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांमध्ये दररोज ३० हजारांपेक्षा जास्त लोकांना करोनाची लागण होत असल्याचे आढळले आहे. ओमायक्रॉन विषाणूचे ५० पेक्षा अधिक जास्त उत्परिवर्तन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या प्रकाराची लागण असल्यास एस जिन आढळणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मुखपट्टी सर्वात जास्त आवश्यक आहे. ...

मुलांना टप्प्याटप्प्याने शाळांमध्ये प्रवेश ; शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे

मुंबई : शाळा सुरू करताना गर्दी होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय योजण्याची सूचना शिक्षण विभागाने शाळांना केली आहे. यानुसार मुलांना टप्प्याटप्प्याने शाळांमध्ये बोलिवण्यात यावे तसेच शिक्षकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करू नये, अशी खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. राज्यात येत्या बुधवारपासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षां गायकवाड यांनी केले आहे.  शिक्षण खात्याने परिपत्रक सोमवारी जारी केले आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे करोना लसीकरण (दोन्ही लसी) बंधनकारक असून त्यांनाच शाळा व कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा. विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मुखपट्टीने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे, याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे. शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व...

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची जबाबदारी ही केंद्र सरकारची ; राज्य सरकारची न्यायालयात भूमिका

मुंबई : मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाची जबाबदारी ही केंद्र सरकारची असून महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जागा संपादित करणे, ती हस्तांतरित करणे आणि कामावर देखरेख ठेवणे ही कामेच केवळ राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याचा दावा राज्य सरकारतर्फे सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. चौपदरीकरणाच्या कामादरम्यान महामार्गावर पडलेले खड्डे न्यायालयाच्या आदेशानुसार बुजविण्यात आले आहेत व आता केवळ तीन किमीहून अधिक रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम अद्याप शिल्लक असल्याचा दावाही सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने खड्डय़ांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करताना महामार्गाच्या कोणत्या टप्प्यातील काम पूर्ण झाले, कोणत्या टप्प्यातील अद्याप शिल्लक आहे याचा तपशीलवार अहवाल ३ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचए) दिले. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डय़ांमुळे प्रवास करणे धोकादायक बनलेले आहे, असा आरोप करत न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी अ‍ॅड्. ओवेस पेचकर यांनी...

आठवडय़ाची मुलाखत : स्वयंपुनर्विकासाची गरज

चंद्रशेखर प्रभू – ज्येष्ठ नगररचनाकार, नगर नियोजनतज्ज्ञ व स्वयंपुनर्विकासाचे पुरस्कर्ते मुंबईत आजघडीला मोठय़ा संख्येने जुन्या चाळी, उपकरप्राप्त, विनाउपकरप्राप्त इमारती, झोपडपट्टय़ा, पालिका वसाहती, सरकारी वसाहती आणि म्हाडा वसाहती आदींचा पुनर्विकास रखडला आहे. या सर्व इमारती धोकादायक स्थितीत असून त्यांचा लवकरात लवकर पुनर्विकास होणे गरजेचे आहे. मात्र पुनर्विकासासाठी नसलेले ठोस, योग्य धोरण, असलेल्या धोरणांच्या योग्य अंमलबजावणीचा अभाव आदी विविध कारणांमुळे पुनर्विकास रखडला आहे. लवकरात लवकर पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी स्वयंपुनर्विकास, समूह पुनर्विकासाला चालना देत लोकाभिमुख धोरण स्वीकारण्याची गरज आहे. यानिमित्ताने ज्येष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यांच्याशी साधलेला हा संवाद. पुनर्विकास म्हणजे नेमके काय? मुंबईत वास्तव्याची असलेली जागा अथवा इमारतीचा पुनर्विकास करून मूळ रहिवाशांना तेथेच राहण्याची योग्य सुविधा उपलब्ध करणे म्हणजे पुनर्विकास. पुनर्विकासाचे प्रकार कोणते? पुनर्विकासाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील एक म्हणजे जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास. दक्षिण मुंबईत १...