आर्यन खान प्रकरणात आता हॅकर मनिष भंगाळे याने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे . हॅकर मनिष भंगाळे याने असे सागितले की, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हीचे कॉल डिटेल व सीडीआर काढण्याच्या कामाचे मला पाच लाख रुपयांची ऑफर देण्यात आली. तसेच आर्यन खान प्रकरणातील काही संबंधित पुराव्याशी छेडछाड करण्यासाठी सांगितले असा खळबळजनक दावा हॅकर मनिष भंगाळे याने केला आहे.
मनिष भंगाळे याने असा दावा केला की मला अगोदर १०,००० रुपयांची रक्कम दिली गेली. अलोक जैन व शैलेश चौधरी हे दोघे माझ्याकडे आले होते. व त्यांनी काही नंबर सागितले त्यातील एक नंबर पूजा ददलानी हीच्या नावाने सेव्ह होता . मनिष भंगाळे याने पुढे सागितले की मला व्हाटसप्प चॅट मध्ये बदल करण्यास सागितलं. तसेच या दोन व्यक्तीनी मला प्रभाकर साईल च्या नावाने सीमकार्ड काढून मिळेल का असे सुद्धा मला विचारले असल्याची माहिती मनिष भंगाळे याने दिली.
जेव्हा मी ऑफर देणाऱ्याचा नंबर ट्रू कॉलरवर चेक केला तेव्ही तो नंबर सॅम डिसूजा या नावाचा असल्याचा दिसत होता. मनीष भंगाळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या बाबत चौकशीची मागणी केली आहे.
The post आर्यन खान प्रकरण; हॅकर मनिष भंगाळेच्या गौप्यस्फोटानं खळबळ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3Cmu6Vv

Comments
Post a Comment