मुंबई : महानगरपालिकेला देण्यात येणारे १० लिटरचे ४५ प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे गुरुवारी भायखळा येथील महापौर निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये विभागाचे संचालक आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये महानगरपालिकेने तयार केलेल्या नियमावलीचे मुंबईकर नागरिकांनी पालन केले. करोनाचे संकट अजूनही टळलेले नसून नागरिकांनी नेहमी मुखपट्टी वापर करावा, असे आवाहन किशोरी पेडणेकर यावेळी केले.
The post महापालिकेला १० लिटरचे ४५ ‘प्राणवायू कॉन्सनट्रेटर’ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/2ZGaE80

Comments
Post a Comment