शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयानं क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणी जामीन मंजूर केला. यानंतर मन्नतवर आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. इतरवेळी शाहरूख खान मन्नतच्या बालकनीत येऊन जमलेल्या चाहत्यांना हात हालवत अभिवादन करताना दिसलाय. मात्र, यावेळी आर्यनच्या जामिनाची बातमी ऐकल्यावर आर्यनचा लहान भाऊ अबराम मन्नतवरील बालकनीकडे धावला आणि त्याने बाहेर जमा झालेल्या चाहत्यांना हात हालवत अभिवादन केलं.
इतर वेळी लाजाळू असणारा आणि माध्यमांपासून, कॅमेरापासून दूर राहणारा अबराम यावेळी मात्र आनंदाने माध्यमांसमोर येताना दिसला. त्यानं बराच वेळ मन्नतच्या बालकनीतून चाहत्यांना हात दाखवत अभिवादन केलं. यानंतर त्याला घरात नेण्यात आलं.
अबराम चाहत्यांना हात हालवत अभिवादन करताना त्याच्यासोबत एक मित्रही होता. ते दोघेही बालकनीत वर चढून खाली जमलेल्या चाहत्यांकडे पाहत होते. यानंतर घरातील दायीने अबरामला खाली उतरवलं. मात्र, त्यानंतरही तो वारंवार बालकनीत येऊन चाहत्यांना अभिवादन करत होता. अबरामचा हा आनंद पाहून दायीलाही आनंद झालेला पाहायला मिळालं.
आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. अनेक चाहत्यांनी तर मन्नतसमोर येऊन फटाके फोडत आनंद व्यक्त केला. इतर ठिकाणी देखील हेच चित्र पाहायला मिळालं.
The post Aryan Khan Bail: मोठ्या भावाला जामीन मिळताच अबरामने मन्नतवरुन मानले चाहत्यांचे आभार, पहा व्हिडीओ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/2ZtTiuA

Comments
Post a Comment