Skip to main content

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

आर्यन खानची सुटका कधी होणार? ऑर्थर रोड जेलचे पोलीस अधीक्षक म्हणाले…

प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणी गुरुवारी (२८ ऑक्टोबर) जामीन मंजूर केला. मात्र, अद्यापही तो तुरुंगाबाहेर निघाला नाहीये. शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) न्यायालयाचा आदेश निघाला त्यानंतर आर्यनची सुटका होईल असं वाटलं मात्र तेव्हाही सुटका झाली नाही. अखेर आज (३० ऑक्टोबर) सकाळपासून आर्यनच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झालेत. आता आर्यनची सुटका कधी होणार याबाबत मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगाचे पोलीस अधीक्षक निती वायचाळ यांना विचारले असता त्यांनी याचं उत्तर दिलंय. ते माध्यमांशी बोलत होते.

ऑर्थर रोड जेलचे पोलीस अधीक्षक नितीन वायचाळ म्हणाले, “आम्हाला आर्यन खानला सोडण्याचे आदेश मिळाले आहेत. त्याला सोडण्याची सर्व प्रक्रिया १ ते २ तासात पूर्ण केली जाईल.”

हेही वाचा : आर्यन खानला १ लाख रुपयांच्या बाँडसह ‘या’ १४ अटींवर जामीन, उच्च न्यायालयाचा निर्णय

एकूणच आर्यन खान तुरुंगाबाहेर येण्यासाठी आज दुपार होऊ शकते. दुपारी १२ पर्यंत आर्यन खान तुरुंगाबाहेर असेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

The post आर्यन खानची सुटका कधी होणार? ऑर्थर रोड जेलचे पोलीस अधीक्षक म्हणाले… appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3nKO6Le

Comments