Skip to main content

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

परमबीर यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटसाठी प्रयत्न

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना गुन्हे शाखेने नोटीस पाठवून १२ ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. या चौकशीला परमबीर सिंग मंगळवारी उपस्थित राहिले होते. आता गुन्हे शाखेने सिंह यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंटसाठी प्रक्रिया सुरु केली आहे. याबाबत न्यायालयाला गुन्हेशाखेकडून अर्ज करण्यात आला आहे. गोरेगावमधील बिमल अग्रवाल या बिल्डरने ९ लाख रुपयांच्या खंडणीचा आरोप करत हा गुन्हा दाखल केला होता. तसेच सचिन वाझेला आत्तापर्यंत एकूण ११ लाख ९२ हजारांचा हप्ता दिल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले होते. परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून त्याप्रकरणात १२ ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सिंह यांना नोटीस बजावण्यात आली आहे.तक्रारीनुसार, जानेवारी २०२० ते मार्च २०२१ पर्यंत ९ लाख वसुलीचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

The post परमबीर यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटसाठी प्रयत्न appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3EqCAeC

Comments