Answer Key: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) ने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University, IGNOU) पीएचडी प्रवेश परीक्षेची तात्पुरती आणि प्रश्नपत्रिका जाहीर केली आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जाऊन उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. एनटीएने २४ फेब्रुवारी रोजी देशभरातील ३० शहरांमध्ये कॉम्प्युटर आधारित (CBT) माध्यमातून पीएचडी प्रवेश परीक्षा आयोजित केली होती. उत्तरतालिकेमध्ये दिलेल्या कोणत्याही उत्तरावर आक्षेप नोंदविण्यासाठी ९ मार्च रात्री ९ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. उमेदवारांना प्रति आक्षेप २०० रुपये शुल्क भरावे लागेल. आक्षेप नोंदवताना सोबत अपलोड केलेल्या कागदपत्रांसह उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची पडताळणी विषय तज्ञांच्या पॅनेलद्वारे केली जाईल. आक्षेप योग्य आढळल्यास उत्तरतालिकेमध्ये बदल करुन अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात येईल. बातमीखाली देण्यात आलेल्या थेट लिंकवरुन इग्नू पीएचडी प्रवेशाची तात्पुरती उत्तरतालिका डाऊनलोड करता येणार आहे. PhD Provisional : अशी करा डाऊनलोड स्टेप १: सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट ignou.nta.ac.in वर जा. स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या उत्तरतालिकेवर क्लिक करा. स्टेप ३: आता अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा. स्टेप ४: तुमची उत्तरतालिका स्क्रीनवर दिसेल. स्टेप ५: आता ते तपासा आणि डाउनलोड करा. एनटी इग्नू पीएचडी हेल्पलाइन(NTA IGNOU PhD Helpline) इग्नू पीएचडी प्रवेश किंवा प्रवेश परीक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती मिळविण्यासाठी, तुम्ही एनटीएद्वारे जाहीर केलेल्या इग्नू हेल्पलाइन ०११-४०७५९००० नंबरवर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही ignou@nta.ac.in वर ईमेल पाठवून देखील संपर्क साधू शकता.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dlYq0iF

Comments
Post a Comment