ICSE, ISC Semester 2 : इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजेच आयसीएसई बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. यानुसार ४ मार्च रोजी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सेमिस्टर २ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन तारखा तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट -cisce.org ला भेट द्यावी लागणार आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा २५ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहेत. यापूर्वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक ३ मार्च रोजी जाहीर करण्यात आले होते. सुधारित वेळापत्रकानुसार, आयसीएसई गणित आणि भूगोल परीक्षा अनुक्रमे २ मे आणि ४ मे रोजी होणार आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, गणिताची परीक्षा ३ मे रोजी आणि भूगोलची परीक्षा ५ मे रोजी होणार होती. इतर काही विषयांमध्ये परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यामध्ये भौतिकशास्त्र, द्वितीय भाषा, आधुनिक परदेशी भाषा, जीवशास्त्र, गट-३ पर्यायी, गट २ पर्यायी विषयांचा समावेश आहे. इयत्ता दहावीची परीक्षा २५ एप्रिलपासून इंग्रजी भाषेच्या पेपरने सुरू होणार आहे तर बारावीच्या परीक्षा इंग्रजी साहित्याच्या पेपरने सुरू होतील. आयसीएसईने याव्यतिरिक्त दहावी किंवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात कोणतीही बदल केलेला नाही. याप्रमाणे वेळापत्रक करा डाउनलोड सुधारित वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी आयसीएसईची अधिकृत वेबसाइट cisce.org वर जा. होमपेजवर उपलब्ध सेमिस्टर २ वेळापत्रकाच्या लिंकवर क्लिक करा. आता एक नवीन पीडीएफ फाइल उघडेल जिथे उमेदवार पूर्ण वेळापत्रक तपासू शकतात. पीडीएफ फाइल डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा. सकाळी दहावीची आणि दुपारी बारावीची परीक्षा आयसीएसईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता दहावीची परीक्षा सकाळच्या शिफ्टमध्ये घेतली जाईल. जी सकाळी ११ वाजता सुरू होईल. मात्र, विद्यार्थ्यांना सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. इयत्ता बारावीचे सर्व पेपर दुपारी २ वाजल्यापासून होतील. ज्यासाठी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी प्रश्नपत्रिका वितरित केल्या जातील. काऊन्सिलने जाहीर केलेल्या च्या वेळापत्रकानुसार, इयत्ता दहावी आणि बारावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी अतिरिक्त १० मिनिटे दिली जाणार आहेत. परीक्षेचा कालावधी १ तास ३० मिनिटांव्यतिरिक्त हा वेळ असेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GqVJT9C

Comments
Post a Comment