ICT Recruitment: मुंबईतील इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये मुंबई ( Mumbai) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आयसीटी मुंबईमध्ये प्रोजेक्ट टेक्निकल एक्झिक्युटिव्ह (Project Technical Executive), प्रोजेक्ट इंटर्न (Project Intern), प्रोजेक्ट इंजिनीअरिंग (Project Engineer) या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. प्रोजेक्ट टेक्निकल एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून आयटीआय फिटर आणि डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीई केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. प्रोजेक्ट इंटर्न या पदासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि संस्थेतून बीएससी केमिस्ट्रीमध्ये शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ar.adm@staff.ictmumbai.edu.in या ईमेल आयडीवर पाठवायचा आहे. तर cco.ceb@ictmumbai.edu.in या ईमेलला सीसी ठेवावे लागेल. यासाठी ११ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/YJ9gj6u

Comments
Post a Comment