Mahapareshan : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये (Maharashtra State Electricity Transmission Company) विविध पदांची भरती केली जाणार आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना यामध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. महापारेषणच्या यवतमाळ विभागामध्ये ही भरती केली जाणार आहे. महापारेषणमध्ये अप्रेंटीस (इलेक्ट्रीशियन) (Apprentice – Electrician)या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अप्रेंटिस इलेक्ट्रीशियन पदाच्या एकूण २४ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त औद्योगिक महाविद्यालयातून इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आयटीआय पूर्ण असणे आवश्यक आहे. अप्रेंटिस इलेक्ट्रीशियन या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी आपले अर्ज कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, आउदा संवयु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ ४४५००१ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/J0vjUQE

Comments
Post a Comment