Skip to main content

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

Virtual Learning: आभासी शिक्षण विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषांत मिळण्याची गरज

डॉ. समीर वाळवेकर पारंपरिक पद्धतीने वर्गात अध्यापकांनी शिकवण्याची प्रक्रिया आणि ‘आभासी शिक्षण’, म्हणजेच बहुमाध्यमांच्या साह्याने कोठूनही इंटरनेटद्वारे हवे तेव्हा घेता येणारे शिक्षण, यांतील महत्त्वाचे व भविष्यात सर्वाधिक उपयोगाचे कोणते, हा प्रश्न आपल्याकडे बराच काळ चर्चिला जातो आहे. त्यावर राष्ट्रीय पातळीवरील अनेक शिक्षणतज्ज्ञांमध्ये मोठी मतभिन्नता आढळून येते. शिक्षकांच्या कौशल्यवर्धनासाठी पारंपरिक शिक्षण पद्धतीबरोबरच नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास, प्रादेशिक भाषेतच देण्याची क्रिया अधिक प्रभावी आणि उपयोगी ठरू शकेल, हे राज्यात नव्याने स्थापन होत असलेल्या उच्च शिक्षण आयोगाने लक्षात ठेवूनच भविष्यातील योजना राबविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व शिक्षण व संशोधन संस्थांमध्ये नियोजनबद्ध सुसूत्रता आणली गेली पाहिजे. करोनानंतर उद्भवलेल्या विचित्र परिस्थितीमध्ये, ऑनलाइन व आभासी शिक्षण प्रक्रियेत थेट वर्गात शिकल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना आला नसेलही; पण यात तंत्रज्ञान दोषी नाही. विद्यार्थी किंवा अध्यापकांनाही आभासी तंत्रज्ञानाची सवय नसण्याची दाट शक्यता आहे. नेहमीच्या वर्गात शिकविल्याप्रमाणेच कॅमेऱ्यासमोर येऊन, पाऊण तास फळ्यावर शिकविले की झाले, अशीच धारणा बहुतांश अध्यापकांच्या मनामध्ये रूढ झाल्याचे आढळते. प्रत्यक्षात ती प्रक्रिया तितकी सोपी नसते. आभासी शिक्षण प्रक्रियेमध्ये शिकवताना, टू-डी चित्रे, मुव्हिंग ग्राफिक, अॅनिमेशनचा योग्य त्या ठिकाणी वापर करून घेत, माहिती-तंत्रज्ञानाच्या साह्याने शिकवला गेलेला शैक्षणिक आशय विद्यार्थ्यांना जास्त चांगला आणि लवकर समजतो. तो त्यांच्या दीर्घ काळ लक्षातही राहतो, असे दिसून आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सन २००३पासून देशात केंद्रीय आभासी विद्यापीठ सुरू करता येईल का, याची चाचपणी सुरू केली. हे संपूर्ण नियोजन, प्रत्यक्ष धोरण आखणी आणि ई-कंटेंट कार्यक्रम निर्मिती प्रक्रियेचा सुमारे दहा वर्षे मी प्रत्यक्ष भाग होतो. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अखत्यारीतील, पुण्यातील शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राचा (ईएमआरसी) संचालक असताना, मला देशाच्या कानाकोपऱ्यांत जाऊन आभासी शिक्षण प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे योगदान देता आले. सन २०१०पासून सुरू झालेल्या या कामात, आजवर मागच्या २०-२२ वर्षांमध्ये, सत्तराहून जास्त विषयांचे ई-कंटेंट अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून, यूजीसी आणि सीईसीच्या वेबसाइटवर ते व्याख्यानाच्या स्वरूपात नि:शुल्क उपलब्ध आहेत. कोणत्याही विषयाचा ऑनलाइन अभ्यासक्रम येथे हवा तेव्हा शिकता येतो. त्या व्याख्यानाची शब्दशः तयार संहिता, आवश्यक ती ग्राफिक आणि चाचणीसाठी प्रश्नोत्तरेही समोर असतात. हे सारे आपल्या देशातील शिक्षणसंस्थांच्या वेबसाइटवर नि:शुल्क उपलब्ध आहे, याची किती आणि कोणाला माहिती आहे? किती जण त्याचा वापर करतात, हा फार मोठा प्रश्न आहे. देशात सन २००६ ते २०१२ या कालावधीत ‘डीडी व्यास’ नावाची, शिक्षणाला वाहिलेली २४ तास चालणारी वाहिनी होती. नंतर काही कारणांमुळे तिचे प्रसारण बंद पडले. २०१६नंतर दूरदर्शन; तसेच डिश टीव्ही आणि इतर काही प्लॅटफॉर्मवर सुमारे ३४ ‘स्वयम् शैक्षणिक वाहिन्या’ सुरू झाल्या. केंद्रीय शिक्षण खाते, एनसीईआरटी, यूजीसी; तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठ, सर्व ईएमआरसी, आयआयटी यांच्या प्रयत्नांमुळे तयार केल्या गेलेला शैक्षणिक आशय त्यावर दाखविला जाऊ लागला. प्रत्येक विषयातील अभ्यासक्रमाला वाहिलेली स्वतंत्र वाहिनी! सध्या दूरदर्शन आणि डिश टीव्हीच्या प्लॅटफॉर्मवर वाहिनी क्रमांक २००० ते २०१९वर, ‘स्वयम् उपग्रह शैक्षणिक वाहिन्यां’द्वारे महाविद्यालयातील प्रथम ते तृतीय वर्षांच्या सर्व विषयांचे अभ्यासक्रम व व्याख्याने इंग्रजी भाषेतून उपलब्ध आहेत. ‘स्वयम् वाहिन्या’ क्रमांक २०२१ ते २०३३ या ‘विद्या वाहिन्या’ आहेत. त्यांवर पहिली ते बारावी या वर्षांचे सर्व अभ्यासक्रम हिंदीमध्ये दाखवतात. ‘स्वयम्’ वाहिनी क्रमांक २१०० ते २११५ या १५ डिजिटल वाहिन्या ‘वंदे गुजरात’ या नावाने, गुजराती भाषेतून पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व अभ्यासक्रम दाखवतात. वाहिनी क्रमांक २११६वर ‘डीजीशाला’ या गुजराती भाषेतील वाहिनीवर संगणक आणि माहिती-तंत्रज्ञान या विषयाचे शिक्षण दिले जाते. अतिशय अभिनव व अद्भुत कल्पना वास्तवात आली; पण शैक्षणिक क्षेत्रातील अनेक अध्यापक आणि विद्यार्थ्यांना आजही ‘स्वयम् वाहिनी’ उपक्रमात अशा प्रकारे दिसणाऱ्या, उपलब्ध असलेल्या खजिन्याचा गंधही नाही. याचे कारण, आपल्या केंद्रीय आणि राज्य सरकारमधील शिक्षण संस्थांमध्ये असलेला समन्वयाचा संपूर्ण अभाव. केंद्रीय शैक्षणिक विभागाला जाहिराती किंवा इतर प्रसारमाध्यमांच्या साह्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत हे उपक्रम नेऊन, त्याचा प्रसार-प्रचार करण्यात आलेले संपूर्ण अपयश; तसेच आभासी शिक्षणाविषयी अज्ञानातून किंवा तंत्रज्ञानाबाबत भीतीमधून तयार झालेली अनास्थादेखील याला कारण आहे. यांपेक्षा सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे, राष्ट्रीय स्तरावर मागील वीस वर्षांत हजारो कोटी रुपये खर्च करून तयार केलेला हा आभासी शिक्षणाचा प्रचंड मौल्यवान ऐवज, शैक्षणिक वाहिन्या फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेतच उपलब्ध आहेत. हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा गंध नसलेल्या किंवा गंड असलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग करून घेता येणार नाही, हे भीषण वास्तव आहे. या सर्व शैक्षणिक वाहिन्या त्या त्या राज्यांमध्ये प्रादेशिक भाषेत मिळाल्या, तर हा शैक्षणिक आशय अधिक अध्यापक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. असा प्रयत्न फक्त गुजरातमध्ये सुरू झाला असून, गुजराती भाषेतील ‘वंदे गुजरात’ शैक्षणिक वहिनीचे नियोजन, गुजरातची ‘भास्कराचार्य इन्स्टिट्यूट ऑफ सॅटेलाइट इमेजरी’ ही संस्था करते आहे. ‘वंदे गुजरात’ या शैक्षणिक उपग्रह वाहिनीद्वारे, गुजराती भाषेत पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या वाहिन्यांची शृंखला तयार होऊ शकते, तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेतून स्वतंत्र उपग्रह शिक्षण वाहिनी का होऊ शकत नाही? महाराष्ट्रात आता नव्याने होऊ घातलेला उच्च शिक्षण आयोग आणि या आधीच अस्तित्वात असलेल्या राज्य शिक्षणशास्त्र संस्था, अशा संस्थांनी या संधीचा फायदा घेतलाच पाहिजे. त्यासाठी नियोजन, सुसूत्रता आणि नव्याने निर्माण होत असलेल्या राज्य उच्च शिक्षण आयोगामार्फत योग्य समन्वय लागेल. केंद्राकडे अजूनही सुमारे शंभर उपग्रह वाहिन्या देण्याची क्षमता आहे. देशाने तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या प्रचंड प्रगतीचा उपयोग, तांत्रिक क्षमता असूनही अध्यापक आणि विद्यार्थ्यांना होताना दिसत नाही, हे दुर्दैवी वास्तव आहे. खासगी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अशा आभासी शिक्षणासाठी भारतीय शिक्षणपद्धतीतील आशय तयार करायला २०१७च्या सुमारास सुरुवात केली. सरकारी माध्यमांनी, म्हणजे विशेषतः विद्यापीठ अनुदान आयोग, सीसी आणि ईएमआरसी या संस्थांनी ७०हून अधिक विषयांचे आधी तयार केलेले अभ्यासक्रम जास्त अनुभवी अध्यापकांनी केलेले, सरस आणि प्रभावी आहेत, हे या प्रक्रियेचा भाग म्हणून मी ठामपणे सांगू शकतो. आहे त्याचा पूर्ण क्षमतेने आपण वापर कधी करणार? आपल्या उपलब्ध सुविधा तळागाळापर्यंत कधी व कशा पोचवणार? शिक्षणाची परिभाषा, संदर्भ आणि तांत्रिक माध्यम प्रक्रियाच करोनोत्तर काळात बदलली आहे. ती स्वीकारून पुढे जावे लागेल. भविष्यात कोणतेही मानव अथवा निसर्ग निर्मित संकट आले, युद्धे झाली, तरी शिक्षण प्रक्रिया, शिकणे व शिकविणे थांबवताच येणार नाही. ती प्रक्रिया अव्याहत सुरू ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावे लागेल. ज्याला जसे हवे तसे, जे हवे ते, ज्या भाषेत हवे त्या भाषेत, जे शिकायची इच्छा असेल ते, हवे तेव्हा हवे तिथून शिकता आलेच पाहिजे, हा नव्या आभासी शिक्षण प्रक्रियेचा मूलमंत्र आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने फक्त मूलभूत तांत्रिक सुविधा पुरवणारे माध्यम, म्हणजेच ‘फॅसिलिटेटर’ बनले पाहिजे. आभासी शिक्षणासाठी प्रादेशिक भाषांमध्ये हव्या त्या विषयांचा ई-कंटेट निर्माण करणे आता तितकेसे अवघड आणि खर्चिक राहिलेले नाही. अशा शैक्षणिक डिजिटल कार्यक्रम निर्मितीसाठी पूर्वीप्रमाणे कोट्यवधी रुपये लागत नाहीत. जागा उपलब्ध असल्यास ५० ते ७० लाख रुपयांत तो तयार करता येतो. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या निर्मिती यंत्रणा, स्टुडिओ आणि उत्तम संकलन, चित्रीकरण व्यवस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशी किमान पंधरा विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांकडे आहे. अनेक ठिकाणी हव्या त्या विषयावर आभासी शैक्षणिक साहित्याची निर्मिती होत आहे. आशय निर्मितीच्या पुनरुक्तीमुळे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ खर्च होते आहे. नव्याने होऊ घातलेल्या राज्य शिक्षण आयोगाला पुढाकार घेऊन, प्रादेशिक मराठी भाषेला प्राधान्य देत ही सुसूत्रता आणावी लागेल. पुनरुक्ती टाळून, मनुष्य व तांत्रिक गुणवत्ता वाढ करून, आभासी शिक्षण साहित्य प्रक्रिया पुढे न्यावी लागेल. विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून, तळागाळापर्यंत पारंपरिक पद्धतीच्या मदतीनेच आभासी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली, तर विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देऊन, भविष्यात त्यांना समृद्ध करण्यासाठी अशा आभासी शिक्षणाचा निश्‍चितच उपयोग होऊ शकेल. (लेखक माध्यमकर्मी आणि ‘ईएमआरसी’चे माजी संचालक आहेत.)


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cqN0pTU

Comments

Popular posts from this blog

BPNL Recruitment 2022: पशुसंवर्धन विभागात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

BPNL : भारताच्या पशुपालन निगम लिमिटेडमध्ये (Animal Husbandry Corporation of India Limited, BPNL) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. पशुपालन निगम लिमिटेडमध्ये ट्रेनिंग कंट्रोल ऑफिसर (Training Control Officer), ट्रेनिंग कंट्रोल इंचार्ज (Training Control Incharge),ट्रेनिंग कोऑर्डिनेटर (Training Coordinator), ट्रेनिंग असिस्टंटची (Training Assistant) अनेक पदे भरली जाणार आहेत. बीपीएनएल भरती २०२२ () साठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. बीपीएनएल भरती २०२२ अंतर्गत एकूण ७८७५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पशुपालन निगम लिमिटेड ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या भरतीच्या जाहिरातीनुसार, २१ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. रिक्त जागांचा तपशील ट्रेनिंग कंट्रोल ऑफिसरच्या ७५ रिक्त जागा भरण्यात येणार असून यासाठ...

UPSC ESE पूर्व परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या तपशील

ESE pre-exam 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा परीक्षा (ESE) २०२२ ची तारीख जाहीर केली आहे. आयोगातर्फे अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेची तयारी करणारे उमेदवार वेबसाइटवर वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ईएसई पूर्व परीक्षा २० फेब्रुवारी २०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येतील. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत ही परीक्षा होईल. परीक्षा सुरु होण्यापुर्वी १५ दिवसांच्या आत उमेदवारांना यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा प्रवेशपत्र २०२२ डाउनलोड करता येईल. सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला दिला जातो. मुख्य परीक्षेची तारीख पूर्व परीक्षेनंतर जाहीर केली जाईल. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र असतील. इंजिनीअरिंग सेवा (प्राथमिक/फेज-I) परीक्षेत दोन वस्तुनिष्ठ प्रकारच्या (multiple choice) प्रश्नपत्रिका असतील. ही परीक्षा जास्तीत जास्त ५०० गुणांची असेल. (पेपर १ - २०० गुण आणि पेपर २- ३०० गुण). यूपीएससीतर्फे प्र...

पांढरे विष- साखर - एकदा हा लेख आवर्जून वाचा

साखर ही उसाच्या रसावर रासायनिक प्रक्रिया करून बनविली जाते. प्रोटीन्स व खजिन द्रव्यांचा अभाव साखर ही उसाच्या रसावर रासायनिक प्रक्रिया करून बनविली जाते. प्रोटीन्स व खजिन द्रव्यांचा अभाव असूनही चवीने मधुर व दिसायला पांढरीशुभ्र असणारी साखर लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडते. आधुनिक काळात , तर प्रत्येक तयार पदार्थात साखरेचाच समावेश केलेला असतो. जाम , बिस्किट्स , चॉकलेटस् , केक , मिठाई अशा अनेक पदार्थात साखरेचा सढळपणे वापर केला जातो. साखर बनविण्याची प्रक्रिया   उसाचा रस हा पचनास अतिशय हलका असतो. या रसाला अटविले जाते व त्यात चुना घालून उकळल्याने त्यातील मळ काढून टाकता जातो. नंतर सतत आटवीत राहिल्यामुळे व अनेक रसायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे हाच उसाचा घट्ट रस पचण्यास कठीण होतो. सल्फर डायऑक्साईड वायू , फॉर्मालीन , रिफायिनग व ब्लिचिंग या सर्व रासायनिक प्रक्रियांतून घट्ट रस आटविला जाऊन , पांढरीशुभ्र दाणेदार साखर बनवली जाते. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर साखर एक शुद्ध रासायनिक पदार्थ बनतो व अशी ही साखर वर्षांनुवर्षे टिकते. ती कधीही खराब होत नाही. कारण , रासायनिक...

गिलोय एक संजीवनी - गिलोय से होने वाले शारीरिक फायदे

Harbayu wellness care Dr.Ravindra Nandedkar गिलोय चूर्ण गिलोय/गुळवेल ज्यूस      राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त डॉ.रविंद्र नांदेडकर द्वारा संशोधित की गयी Diaba-T मैं इस्तेमाल की गई गिलोय/गूलेठी/गुलवेल के नाम भी जाना जाता है। आइये हम गिलोय से होने वाले शारीरिक फायदे की ओर देखें :-      गिलोय एक प्रकार की लता/बेल है, जिसके पत्ते पान के पत्ते की तरह होते है। यह इतनी अधिक गुणकारी होती है, कि इसका नाम अमृता रखा गया है। आयुर्वेद में गिलोय को बुखार की एक महान औषधि के रूप में माना गया है। गिलोय का रस पीने से शरीर में पाए जाने वाली विभिन्न प्रकार की बीमारियाँ दूर होने लगती हैं। गिलोय की पत्तियों में कैल्शियम, प्रोटीन तथा फास्फोरस पाए जाते है। यह वात, कफ और पित्त नाशक होती है। यह हमारे शरीर की रोगप्रतिरोधक शक्ति को बढाने में सहायता करती है। इसमें विभिन्न प्रकार के महत्वपूर्ण एंटीबायोटिक तथा एंटीवायरल तत्व पाए जाते है जिनसे शारीरिक स्वास्थ्य को लाभ पहुँचता है। गिलोय में प्राकृतिक रूप से शरीर के दोषों को संतुलित करने की क्षमता पाई जाती है।      गिलोय एक बहुत...

मधुमेह पुर्ण बरा होतो का?

मधुमेह पुर्ण बरा होतो का? हो मधुमेह हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे आज भारतातील प्रत्येकी तीन व्यक्तीमागे एकास मधुमेह आहे किंवा पुढच्या आयुष्यात कधी तरी होणार आहे. आज हीच गोष्ट कितीतरी मधुमेह तज्ञ व औषधं बनविणाऱ्या उद्योगांसाठी हवी हवीशी वाटत असली तरीही रुग्णांसाठी फारच धोकादायक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ९०%(नव्वद टक्के)रुग्ण याबद्दल जागरूक नाहीत. काहींना तर हा विषयच नकोसा वाटतो. परिणामी पुढे जाऊन आपल्या पदरात काय वाढून ठेवले आहे, ह्याची जरासुद्धा खबरबात ते घेत नाहीत. काही रुग्ण तर फक्त "माझी तज्ञ डॉक्टरांकडे ट्रिटमेंट सुरू आहे आता माझी शुगर नॉर्मल आहे मी फक्त  त्यांचाच सल्ला घेतो आहे" असे म्हणून सर्व जबाबदारी त्यांच्या डॉक्टरांवरच टाकत असतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही कि गोळी सुरू आहे म्हणून कंट्रोल आहे नॉर्मल नाही आणि जरी गोळी सुरू असली तरी त्यांच्या शरीरात झालेला बिघाड हा वाढतच असतो, पण मधुमेह असलेल्या व्यक्तीला याची काहीही कल्पना नसते. मधुमेह हा खालील आजारांना आमंत्रण देतो १)उच्च र...

Regal Assets

Our Company Regal Assets was founded by young entrepreneur and investor Tyler Gallagher. The company started its operations with a small investment and a big vision: to simplify, innovate and rejuvenate the alternative assets investment landscape which was still operating under heavy bureaucracy and unnecessary hurdles. 10 years later, with zero additional startup capital and a lot of persistence, Regal Assets is the highest rated alternative assets firm in the country, with recognition from the likes of  Forbes, Smart Money, the Huffington Post  and many others. The company was also ranked #20 in the U.S. by the famous  INC 500  in the financial services category, and subsequently featured on the prestigious Reuters Sign on Times Square to congratulate them on their victory. Mission Regal Assets aims to be every investor’s one stop shop when it comes to metals and cryptos investing. The company however specializes in helping individual investors add me...