Skip to main content

Creating a better India which provides basic health, Education and Empowerment to every child

रत्नागिरी जिल्हा परिषदेत भरती, ७० हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार

ZP : रत्नागिरी जिल्हा परिषदेत (ratnagiri District Council) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. रत्नागिरी झेपीमध्ये इंजिनीअरिंग स्पेशलिस्ट(Engineering Specialist) आणि इंजिनीअरिंग कोऑर्डिनेटर (Engineer Coordinator) पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत इंजिनीअरिंग स्पेशलिस्टचे १ पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीटेक/बीई सिव्हील/एमटेक/एमईपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवारांकडे संबंधित कामाचा ७ वर्षाचा अनुभव असावा. तसेच कॉम्प्युटरची किमान माहिती असावी. पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. इंजिनीअरिंग कोऑर्डिनेटर पदाच्या २ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीटेक/बीई सिव्हिल, एमटेक/एमई उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांकडे संबिधित कामाचा पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज २५ फेब्रुवारीपर्यंत पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/f8RlCrq

Comments