2021: ICSI प्रोफेशनल, निकाल उद्या म्हणजेच २५ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज, (Institute of Company Secretaries, ICSI) ची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर सीएस प्रोफेशनल, कार्यकारी डिसेंबर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. माहितीनुसार, निकाल उद्या म्हणजेच २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाईल. तर सीएस एक्झिक्युटिव्ह निकाल दुपारी २ वाजता जाहीर केला जाईल. त्यामुळे या परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी उद्या त्यांचा सीएस निकाल पाहू शकतात. उमेदवारांना त्यांचा रोल नंबर टाकून गुण तपासता येणार आहेत. सीएस डिसेंबर निकाल २०२१ ची तारीख आयसीएसआयने १८ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर केली होती. एक्झिक्युटिव्ह प्रोगाम (जुना आणि नवा अभ्यासक्रम) परीक्षांचा औपचारिक ई निकाल आणि गुण उमेदवारांनी डाऊनलोड करण्यासाठी निकालाच्या घोषणेनंतर तत्काळ संस्थेच्या वेबसाइटवर अपलोड केले जातील. निकाल जाहीर झाल्यानंतर ते उमेदवारांना देखील पाठवले जातील. CS December Result 2021: असा पाहा निकाल सीएस प्रोफेशनल, एक्झिक्युटिव्ह डिसेंबरचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट icsi.edu वर लॉग इन करा. होमपेजवर, 'एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) निकाल' किंवा 'व्यावसायिक कार्यक्रम (जुना आणि नवीन अभ्यासक्रम) निकाल' या लिंकवर क्लिक करा. तुमचे लॉगिन क्रेडेंशियल्स टाका आणि सबमिट वर क्लिक करा. तुमचा आयसीएसआय सीएस डिसेंबर २०२१ चा निकाल स्क्रिनवर दिसेल. निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह प्रोगामसाठी पुढील परीक्षा १ ते १० जून, २०२२ पर्यंत आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया २६ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. या परीक्षेला बसू इच्छिमाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधातील अधिक माहितीसाठी उमेदवारांना ऑफिशिअल वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. सीएस एक्झिक्युटिव्ह आणि सीएस प्रोफेशनल डिसेंबर २०२१ ची परीक्षा २१ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत विविध परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालासंबंधीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VbLzdHl

Comments
Post a Comment