IOCL Recruitment 2021: जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात आणि फ्रेशर आहात तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited, IOCL) ने अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी आयओसीएलने नोटिफिकेशन जारी केले आहे. IOCL या अंतर्गत एकूण ३४६ पदांवर नियुक्ती करणार आहे. या पदांसाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार IOCL चे अधिकृत संकेतस्थळ ला भेट देऊ शकतात. या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या पदांसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख ७ मार्च २०२१ आहे. महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्जांची सुरुवात ५ फेब्रुवारी २०२१ ऑनलाइन अर्जांची मुदत - ५ फेब्रुवारी २०२१ लेखी परीक्षेची तारीख - २१ मार्च २०२१ आयओसीएलमार्फत जारी नोटिफिकेशननुसार, या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे. कमाल वय २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत २४ वर्ष असावे. याव्यतिरिक्त आरक्षित प्रवर्गाच्या उमदेवारांना नियमानुसार सवलत मिळेल. उमेदवारांची लेखी परीक्षा मुंबई, अहमदाबाद, भोपाळ, रायपूर, पणजी आणि सिल्वासा येथे आयोजित केली जाणार आहे. अप्रेंटिसशिप पोस्टवर उमेदवारांना १२ महिन्यांची प्रशिक्षण दिले जाईल. याव्यतिरिक्त अन्य माहितीसाठी उमेदवारांनी IOCL च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. निवड प्रक्रिया उमेदवारांची निवड लेखी परीक्षेमार्फत होणार आहे. लेखी परीक्षा ९० मिनिटांची असेल. यात १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. हिंदी आणि इंग्रजीत परीक्षा देता येईल. अप्रेंटिसशीप कुठे? या भरतीअंतर्गत टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अप्रेंटिसशीप पदे भरली जाणार आहेत. ही भरती पश्चिम भारत क्षेत्रात होणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि दादरा नगर हवेली या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आयओसीएलच्या शाखांमध्ये ही पदे भरली जातील. चे नोटिफिकेशन पुढीलप्रमाणे -
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37lxSkf

Comments
Post a Comment